Ration Card KYC :रेशन कार्डधारकांना केवायसी करणे आवश्यक

Ration Card KYC :रेशन कार्डधारकांना केवायसी करणे आवश्यक;- कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचे दस्तावेज आहे. शासनाच्या अण्णा सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आणि अद्यावत ठेवण्यासाठी e-kyc ( Know Your Customer ) करणे बंधन कारक आहे. रेशन कार्डसाठी e-kyc हा एक महत्वाचा टप्पा आहे, ज्या मुळे शासनाला योग्य लोकांना लाभ पुरविणे सोयीचे होते. आणि यातून होणारी अफरातफर थांबते. आजच्या लेखात आपण Ration Card KYC काय आहे, ती कोठे करायची आणि e-kyc करण्याची शेवटची तारीख किती आहे या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.Ration Card KYC :रेशन कार्डधारकांना केवायसी करणे आवश्यक

Ration Card KYC

रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने e-kyc करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या ७ महिन्यापासून e-kyc करण्याच्या सूचना रेशन दुकानदारांना अन्न पुरवठा विभागा मार्फत देण्यात आलेल्या आहेत. रेशन कार्ड e-kyc च्या मध्यमांतून खऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्न पुरवठा करणे हा शासनाचा उद्देश आहे. रेशन वाटपातील अफरातफर थांबावी आणि लाभार्थ्यांचा माल लाभार्थ्यांना पोहचावा यासाठी शासन प्रत्येक रेशन कार्ड धारक लाभार्त्यांकडून e-kyc करून घेत आहे.

रेशन कार्डधारकांना केवायसी करणे आवश्यक

रेशन कार्ड शासनाच्या प्रत्येक कामात पुरावा म्हणून वापरले जाते. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा म्हटले, तर तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक असते. e-kyc च्या मध्येमातून लाभार्थ्यांच्या कुटुंबाची माहिती शासनाकडे अद्ययावत राहते. त्यामुळे लाभ देणे सोयीचे जाते. Ration Card KYC न केल्यास तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ व्यवस्थित घेता येणार नाही.

शासनाकडून  लाभार्थ्यांना दिला जाणारा अन्न पुरवठा हा सुरळीत लाभार्थ्यांच्या हातात जावा. त्यात कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नाही म्हणून Ration Card KYC करणे आवश्यक आहे. Ration Card KYC न केल्यास तुम्हाला मिळणारे धान्य बंद होईल शिवाय रेशन कार्ड हि बंद केल्या जाईल त्यामुळे Ration Card KYC करणे आवश्यक आहे.

Ration Card KYC च्या मध्येमातून बनावट आणि खोटे लाभार्थी ओळखण्यास मदत होणार, आणि त्यांना मिळणारा लाभ बंद करता येणार. हा उद्देश शासनाचा आहे.

Ration Card KYC कुठे करायची

रेशन कार्ड e-kyc तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन करावी लागेल. तुमच्या गावातील रेशन दुकानदाराला गावातील सर्व रेशन कार्ड धारकांची e-kyc करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. मागील ६ ते ७ महिन्या पूर्वी शासनाने सदरील आदेश रेशन दुकानदाराला दिलेले आहेत.

e-kyc करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबात असलेल्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि स्वतः सदस्य यांनी रेशन दुकानदाराकडे जाऊन, त्यांच्याकडे असणाऱ्या e-pos मशीन वर e-kyc करायची आहे. ही e-kyc विना मूल्य आहे, यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही.

Ration Card KYC शेवटची तारीख;- शासनाने गेल्या ६ -७ महिन्यापासून Ration Card KYC करण्याचे आदेश रेशन दुकानदारांना दिलेले आहेत. या e-kyc साठी शेवटची तारीख ही या महिन्याची ३ ० /१ ० /२ ० २ ४ आहे.

रेशन कार्ड e-kyc करणे आवश्यक आहे अन्यथा रेशन धारकांना रेशन मिळणे बंद होणार आहे. आणि रेशन कार्ड ही बंद होणार आहे.

Conclusion

Ration Card KYC :रेशन कार्डधारकांना केवायसी करणे आवश्यक या blog मध्ये आपण रेशन कार्ड e-kyc काय आहे बद्दल सविस्तर माहिती पहिली शासनाने या महिन्याची ३ ० /१ ० /२ ० २ ४  ही तारीख शेवटची ठरविली आहे. या तारखे अगोदर e-kyc करणे आवश्यक आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर किंवा इथे क्लिक करा.

🟢👇🏻 पुढील लेख अवश्य वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top