renewal of driving licence:- शासनाच्या नियमानुसार वाहन चालविणाऱ्या प्रत्येक माणसाकडे ड्रायविंग लायसेन्स असणे बंधनकारक आहे. लायसेन्स काढल्या नंतर त्याची एक्सपायरी डेट असते, त्या एक्सपायरी डेट च्या पुढील 30 दिवसामध्ये तुम्हाला ते रिनिव करावे लागते, दिलेल्या तारखेच्या आत रिनिव न केल्यास पुनः नव्याने प्रस्ताव तयार करावा लागतो. ड्रायविंग लायसेन्स रिनिवल करण्यासाठी तुम्हाला RTO फीस च्या व्यतिरिक्त जास्तीचे पैसे मोजावे लागतात. पण आता तुम्ही ड्रायविंग लायसेन्स रिनिव ऑनलाइन प्रक्रिया आपल्या घरून करू शकतात. ड्रायविंग लायसेन्स रिनिव कसे करावे ? त्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत.
ड्रायविंग लायसेन्स रिनिव करणे का आवश्यक आहे
ड्रायविंग लायसेन्स काढल्या नंतर त्याची वैधता साधारणतः 20 वर्ष असते. हा कालावधी संपल्या नंतर तुम्हाला तुमचे ड्रायविंग लायसेन्स रिनिव करावे लागते. वैधता 30 दिवसाच्या आत तुम्हाला ड्रायविंग लायसेन्स रिनीव करावे लागते. जर रिनिवल ला या पेक्षा जास्त कालावधी लागला तर तुम्हाला नवीन ड्रायविंग लायसेन्ससाठी अर्ज करावा लागतो.
ड्रायविंग लायसेन्स रिनिव केलेले नसेल तर वाहन चालवीत असतांना RTO ऑफिस तुमच्याकडून दंड आकारु शकते. किंवा कार्यवाही झाल्यास कोर्टाच्या तारखा करण्याची वेळ येऊ शकते. त्या मुले ड्रायविंग लायसेन्स वेळेत रिनिव करणे फायद्याचे ठरते, शिवाय तुमचा वेळ आणि पैसा ही वाचतो.
ऑनलाइन ड्रायविंग लायसेन्स रिनिवल प्रक्रिया / renewal of driving licence
renewal of driving licence तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता. ऑनलाइन पद्धतीने तुमचा वेळ आणि जास्तीचा खर्च वाचू शकतो. Renewal of Rriving Licence ऑनलाइन पद्धतीने कसे करायचे या विषयी माहिती आपण पाहणार आहोत.
- ऑनलाइन ड्रायविंग लायसेन्स रिनिवल करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://parivahan.gov.in वरती जावे लागेल .
- वेबसाईटवर आल्या नंतर मेन्यू बार मध्ये डाव्या बाजूने दिसणाऱ्या Online Services या पर्यायावर जावे लागेल. Online Services वरती आल्या नंतर Rriving Licence Related Services या पर्यायाला निवडावे लागेल.
- त्या नंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुम्हला तुमचे राज्य निवडावे लागेल.
- राज्य निवडल्या नंतर पेज वर Aplly For DL Renewal या पर्यायाला निवडायचे आहे.
- या नवीन पेजवर दिलेली पूर्ण माहिती वाचून, फॉर्म-1 A भरण्यासाठी Continue या बटनावर क्लिक करा.
- या मध्ये तुमचे ड्रायविंग लायसेन्स नंबर, तुमची जन्म तारीख, कॅप्चा टाकून Get DL Details वरती क्लिक करा.
- तुमचे ड्रायविंग लायसेन्स माहिती ओपन होईल, पुढे RTO कार्यालय निवडून Proceed वरती क्लिक करून तुमची माहिती सत्यापित करा.
- त्या नंतर त्या खालील Rriving Licence Renewal निवडा,
- या मध्ये तुमची पूर्ण माहिती भरा आणि तुमची पावती मिळवा.
- तुमच्या जवळचे ओरीजनल ड्रायविंग लायसेन्स, भरलेला फॉर्म न. 9, मेडिकल प्रमाणपत्र, 3 पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची पावती इत्यादी घेवून RTO ऑफिस ला भेट देवून कागदपत्रे सबमिट करा आणि ऑनलाईन फीस भरून प्रस्ताव सबमिट करा.
- अर्जदाराचे वय जर 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर फॉर्म न. 1 A आणि फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अशा पद्धतीने तुम्ही renewal of driving licence साठी ऑनलाईनअर्ज करू शकता.
ऑफलाईन ड्रायविंग लायसेन्स रिनिवल प्रक्रिया / renewal of driving licence
renewal of driving licence प्रीक्रीये मध्ये तुम्हाला RTO कार्यालयला जावून अर्ज करावा लागतो. ड्रायविंग रिनिवल प्रस्ताव तयार करून to ऑफिस ला सबमिट करावा लागतो.
- फॉर्म न.1 पूर्ण भरलेला.
- फॉर्म न.9.
- जवळील ओरीजनल ड्रायविंग लायसेन्स.
- अर्जदाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असल्यास फॉर्म न.1 A आणि फिटनेस प्रमाणपत्र.
- 2 पासपोर्ट साईज फोटो.
- रिनिवल फीस इत्यादी कागदपत्रे सोबत घेवून RTO ऑफिसला जावून अर्ज करावा लागतो.
ड्रायविंग लायसेन्स रिनिवल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- ओरीजनल ड्रायविंग लायसेन्स.
- फॉर्म न. 1 , फिजिकल फिटनेस प्रमाणपत्र.
- फॉर्म न 1 A ( मेडिकल प्रमाणपत्र ) 40 वर्षावरील व्यक्तीस आवश्यक.
- अर्जदाराचा पूर्ण भरलेला फॉर्म न. 9.
- जवळील 2 पासपोर्ट साईज फोटो.
- रिनिवल फिस.
ड्रायविंग लायसेन्स रिनिवल स्थिती कशी चेक करायची
renewal of driving licence आपण केलेल्या अर्जाची स्थिती आपण जाणून घेवू शकतो. आपला अर्ज मंजूर झाला किंवा नाही हे आपल्याला वेबसाईट वर जावून चेक करता येते.
सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या parivahan या वेब पोर्टल वरती जावे लागेल. या पोर्टल वरती आल्या नंतर तुम्हाला Online Services मध्ये Rriving Licence Related Services या पर्यायाला निवडावे लागेल.
- त्या नंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुम्हला तुमचे राज्य निवडावे लागेल.
- राज्य निवडल्या नंतर मेन्यू बर मध्ये उजव्या बाजूला दिसणाऱ्या Application Status वर क्लिक करावे लागेल.
- या नंतर त्या पेजवर तुम्हाला Application Number ( जो तुम्हाला फॉर्म भरल्या नंतर पावती वर असणारा नंबर ), तुमची जन्म तारीख, आणि कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- सबमिट बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या अर्जाची स्थिती ओपन होईल.
सारांश
वाहन चालविण्याचे ड्रायविंग लायसेन्स रिनिव कसे करावे ? जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया या लेखात आपण ड्रायविंग लायसेन्स ( renewal of driving licence ) रिनिवल कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. भारत सरकारच्या parivahan पोर्टल वरून आपण आपल्या ड्रायविंग लायसेन्ससाठी ऑनलाईनअर्ज करू शकतो. तसेच ड्रायविंग लायसेन्स विषयीच्या इतर सेवा ही या पोर्टल वरून आपल्याला मिळतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- Driving Licence Status By Application Number: तुमच्या अँप्लिकेशन नंबरवरून ड्रायविंग लायसेन्स ची स्थिती तपासा
- Driving Licence Download Pdf: ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स PDF डाउनलोड प्रक्रिया
- Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा
- Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,अर्ज करा Online
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रूप मध्ये सामील होण्यसाठी खालील लिंक टच करा.