मोबाईल हरवला किंवा चोरी झाला? Sanchar Saathi पोर्टलवरून त्वरित ब्लॉक करण्याची सोपी पद्धत!

Sanchar Saathi: संचार साथी हा दूरसंचार विभागाचा एक नागरिक-केंद्रित उपक्रम आहे, जो मोबाईल ग्राहकांना सक्षम बनवतो आणि त्या त्याबरोबरच त्यांची सुरक्षाही ही निश्चित करतो. Sanchar Saathi उपक्रमा मार्फत शासन मोबाईल ग्राहकांची होणाऱ्या फसवणुकीवर अंकुश लावण्याचे काम करतो. ग्राहकांची सुरक्षा आणि त्यांच्या हिताचे विविध निर्णय घेण्याचे काम Sanchar Saathi उपक्रमांतर्गत करण्यात येते.Sanchar Saathi

मोबाईल हरवला किंवा चोरी झाला? न घाबरता करा हे काम

मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे ही आजच्या काळात सामान्य समस्या बनली आहे. रस्त्याने जात येत असताना किंवा प्रवासात कुठेही मोबाईल चोरीला जाणे किंवा हरवणे हे तुमच्यासोबत घडू शकते. मोबाईल चोरीला गेल्यास मोबाईलबरोबरच त्यामध्ये असणारी वैयक्तिक (data) असलेली माहितीही चोरीला जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे आपली आर्थिक फसवणूक होण्याची जास्त भीती असते. पण आता घाबरून जाण्याचे कारण नाही, मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास तो मोबाईल ब्लॉक करता येतो, कसे ते आपण खाली स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.

Sanchar Saathi पोर्टल काय आहे

संचार साथी हे शासनाचे मोबाईल ग्राहकांना अतिरिक्त सेवा आणि सुरक्षा पुरवणारे पोर्टल आहे. या पोर्टल मार्फत मोबाईल ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम केले जाते. Sanchar Saathi ही DOT (Department of Telecommunications) ची संकल्पना आहे. दूरसंचार विभागाने मोबाईल ग्राहकांच्या हिताचे रक्षण आणि सुरक्षा याकरता Sanchar Saathi या पोर्टलची निर्मिती केली आहे.

CEIR (Central Equipment Identity Register) हे त्या पोर्टलचा एक भाग आहे, ज्याचा उपयोग मोबाईलचा IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी केला जातो.

मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास घ्यावयाची दक्षता

रोजच्या दैनंदिन जीवनात मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास घाबरून न जाता सुरुवातीला त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. मोबाईल शोधूनही सापडत नसेल तर स्वतःला शांत ठेवून पुढील गोष्टी करा.

  • घाबरून न जाता मानसिक शांतता राखा.
  • सिम कार्ड ब्लॉक करण्याचा प्रयत्न करा.
  • पोलीस स्टेशनला जाऊन मोबाईल हरविल्याची तक्रार नोंदवा आणि तक्रारीची कॉपी घ्या जी तुम्हाला मोबाईलच्या ऑनलाईन तक्रारीसाठी कमी येईल.

Sanchar Saathi पोर्टलवर हरवलेला मोबाईल कसा ब्लॉक करावा?

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास मोबाईल सिम सिमबरोबरच मोबाईल पण ब्लॉक करता येतो, जेणेकरून आपल्या मोबाईलमध्ये असणारी आपली वयक्तिक माहिती कोणाच्या हाती लागणार नाही. हरवलेला मोबाईल कसा ब्लॉक करायचा ते आपण पाहू.

  • हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम Sanchar Sathi (https://sancharsaathi.gov.in) या दूरसंचार विभागाच्या पोर्टलवरती यावे लागेल.
  • Sanchar Sathi या पोर्टलवरती आल्या नंतर पोर्टलवरती खाली आल्यावर Citizen Centric Services मध्ये BLOCK YOUR LOST/STOLEN MOBILE HANDSET (तुमचा हरवलेला/चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करा ) या पर्यायावर जावे लागेल.
  • BLOCK YOUR LOST/STOLEN MOBILE HANDSET: – (तुमचा हरवलेला/चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करा ) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Request for blocking lost/stolen mobile नावाने नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेजवर मोबाईल विषयीची आणि इतर माहिती भरायची आहे.
  • Device Information: मध्ये तुमचा तुमचा मोबाईल नंबर पहिल्या रकान्यात टाकायचा आहे, तसेच दुसऱ्या रकान्यात दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आहे. खालील दोन्ही रकान्यांत IMEI नंबर भरायचा आहे. खालील रकान्यात तुम्हाला मोबाईलची कंपनी निवडायची आहे. शेवटच्या रकान्यात मोबाईलचा मोबाईल नंबर आणि मोबाईल बिल अपलोड करायचे आहे.
  • Lost Information : – या मध्ये मोबाईल कुठे हरवला किंवा चोरीला गेला ते ठिकाण, तारीख, राज्य, जिल्हा, पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन मध्ये केलेली तक्रार अपलोड करायची आहे.
  • Mobile Owner Personal Information: मध्ये मोबाईल कोणाच्या नावावर रजिस्टर आहे त्याचे नाव, पूर्ण पत्ता, ओळखपत्र (आधार, पासपोर्ट किंवा तत्सम कागदपत्रे ) निवडून ते अपलोड करायचे आहे. मोबाईल नंबर टाकून तो सत्यापित करायचा आहे, कॅप्चा कोड टाकून आलेला OTP भरायचा आहे.
  • Declaration: शेवटी Declaration पूर्ण वाचून त्याला टिकमार्क करून Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.

अशा पद्धतीने Sanchar Saathi या पोर्टलवर जावून हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलला ब्लॉक करता येते.

Sanchar Saathi Mobile App / संचार साथी मोबाईल ॲप

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने Sanchar Saathi या पोर्टल पोर्टलबरोबरच आता मोबाईल ग्राहकांच्या सेवेसाठी मोबाईल ॲपदेखील उपलब्ध करून दिले आहे. या मोबाईल ॲपच्या साह्याने मोबाईल विषयीच्या येणाऱ्या समस्या त्वरित सोडविता येणार आहेत. हे मोबाईल ॲप वापरायला देखील सोपे आणि कमी वेळ खाणारे आहे.

प्ले स्टोरवर जाऊन Sanchar Saathi Mobil App असे टाईप करायचे आहे. समोर दिसणाऱ्या app मधून Sanchar Saathi चे लोगो दिसणारे अॅप डाऊनलोड करायचे आहे.

Sanchar Sathi Mobile App: https://play.google.com/store/apps/details?id=com.dot.app.sancharsaathi

सारांश

मोबाईल हरवला किंवा चोरी झाला? Sanchar Saathi पोर्टलवरून त्वरित ब्लॉक करण्याची सोपी पद्धत! या लेखात आपण हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहिली. शासनाच्या दूरसंचार विभागाच्या Sanchar Saathi पोर्टलवरून आणि Sanchar Saathi Mobile App वरून हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करता येतो. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना शेअर करा.

हे हि वाचा :

आमच्या सोशल मीडिया मार्फत नवनवीन माहिती मिळविण्यासाठी खालील सोशल मीडिया लिंकवर जा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top