Customer Service Center: Apply Online to Avail SBI Customer Service Center. आज आर्थिक व्यवहाराचे मुख्य केंद्र बनलेले ग्राहक सेवा केंद्र हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक बनले आहे. आज कुठला ही आर्थिक व्यवहार करायचा झाला म्हणजे ग्राहक सेवा केंद्र सोपे वाटते, कमी वेळात आणि लवकर सेवा मिळत असल्यामुळे बँके ऐवजी लोकं ग्राहक सेवा केंद्राला जास्त पसंती देतात. डिजिटल इंडिया च्या युगात कुठल्याही बँके कडून ग्राहक सेवा केंद्र म्हणजे CSP घेऊन आपल्या गावात सुरू करता येते. ग्राहक सेवा केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारावर बँक चांगले कमिशन CSP सेंटर चालविणाऱ्या मालकाला देते. आपण SBI ग्राहक सेवा केंद्र कसे मिळवायचे, यासाठी कुठे अर्ज करायचा, कागदपत्रे कोणती लागतात, यासाठी तुमच्याकडे कोणती साधन सामुग्री असावी लागते या बद्दल पुढील लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
ग्राहक सेवा केंद्र
ग्राहक सेवा केंद्र म्हणजे CSP हे एक ग्रामीण भागातील छोटे खाणी बँकिंग केंद्र आहे. ग्रामीण भागातील लोकांना बँके विषयीच्या सर्व सेवा गावातच उपलब्ध करून देते. बँकेतून पैसे काढणे, बँकेत पैसे टाकणे, नवीन बँक खाते उघडणे, लोण हप्ते भरणे, विमा हप्ते भरणे इत्यादी सेवा गावात उपलब्ध करून देते. बँकेचे कर्ज उपलब्ध करून देणे, शासनाच्या योजना विविध योजना ग्रामीण भागात राबविणे इत्यादी सेवा CSP मार्फत दिल्या जातात.
✅👉🏻 कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून
ग्राहक सेवा केंद्रासाठी आवश्यक साधन सामुग्री
गावात ग्राहक सेवा केंद्र खोलण्यासाठी तुमच्या कडे CSP लागणारी काही सामुग्री असणे आवश्यक असते.
- तुमच्या कडे 250 ते 300 square फिटचे बांधकाम असलेली जागा ( दुकान ) असणे आवश्यक आहे.
- तुमच्या दुकानात एक काउंटर असणे गरजेचे आहे.
- तुमच्या कडे कॉम्पुटर किंवा लॅपटॉप असावा.
- तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असावी.
- तुमच्या कडे वरील साधने चालवण्यासाठी वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
✅👉🏻 Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती
SBI ग्राहक सेवा केंद्र मिळवण्यासाठी Online अर्ज
ग्रामीण भागात ग्राहक आणि बँक यांच्या मधील महत्त्वाचा दुवा म्हणजे ग्राहक सेवा केंद्र. ग्राहकांना बँकेच्या सर्व सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यात CSP महत्त्वाची भूमिका बजावतात. CSP साठी Online अर्ज कसा करायचा ते आपण पाहू.
SBI CSP मिळविण्यासाठी तुम्ही Online किंवा Offline अर्ज करू शकता.
SBI CSP Online अर्ज
CSP मिळविण्यासाठी Online अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला DIGITAL INDIA च्या पोर्टल www.digitalindiacsp.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेब साईटवर आल्या नंतर तुम्हाला Online Register वरती क्लिक करायचे आहे. Online Register वर क्लिक करताच तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला भरायचा आहे. त्या मध्ये दिलेल्या रकान्यात खालील माहिती भरावी लागते.
- तुमचे पूर्ण नाव
- तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव
- आधार नंबर
- इ मेल
- मोबाईल नंबर
- जन्म तारीख
- तुमचे झालेले शिक्षण
- तुमचा सामाजिक वर्ग
- लिंग
- तुम्ही जॉब ला आहेत का होय / नाही
- तुमचे महिन्याचे एकूण उत्पन्न
- तुमच्या कडे ग्राहक सेवा केंद्रासाठी उपलब्ध असलेली जागा square फिट मध्ये
- तुम्ही बँकेत भरलेल्या पैस्याची पावती
- तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे
- तुमचे गाव
- तुमचा तालुका
- तुमचे पोस्ट
- जिल्हा
- राज्य
- पिनकोड क्रमांक
- CSP साठी निवडलेली बँक नॅशनलाईज बँक आहे
- CSP साठी निवडलेली बँक प्रायव्हेट बँक आहे
- पूर्ण फॉर्म भरल्या नंतर शेवटी SUBMIT बटनावर क्लिक करायचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही CSP साठी अर्ज Online अर्ज करू शकता. अर्ज SUBMIT केल्या नंतर बँके कडून तुम्हाला फोन येईल, आणि तुम्हाला केलेल्या अर्ज विषयी माहिती विचारली जाईल. आणि नंतर पुढील प्रोसेस पूर्ण होईल. हे सगळं करत असतांना online फॉर्ड ची दक्षता घ्यायची आहे.
SBI CSP Offline अर्ज
SBI ग्राहक सेवा केंद्रासाठी Offline अर्ज करता येतो, त्यासाठी तुम्हाला आपले जवळच्या बँकेत जाऊन बँक म्यनेजर शी संपर्क करावा लागेल. CSP साठी आवश्यक असणारे सगळे कागद पत्रे जमा करून व्यवस्थित भरलेला अर्ज सोबत असायला हवा.
Offline अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
- तुमचे आधार कार्ड
- तुमचे बँकेत असलेल्या खात्याचे पासबुक
- शिक्षणाचा पुरावा
- उत्पन्न प्रमाण पत्र
- ग्राहक सेवा केंद्रासाठी उपलब्ध असलेल्या जागेचे नमुना न.८
- पासपोर्ट साईज फोटो
- इलेक्शन कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला SBI किंवा इतर बँकेचे CSP मिळविण्यासाठी आवश्यक असतात.
✅👉🏻 Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट
Conclusion
ग्राहक सेवा केंद्र: SBI ग्राहक सेवा केंद्र मिळवण्यासाठी असा करा Online अर्ज या लेखात आपण CSP कसे मिळवायचे आणि त्यासाठी Online व Offline अर्ज कसा करायचा या बद्दल संपूर्ण माहिती पहिली. CSP साठी DIGITAL INDIA या पोर्टल वरून Online अर्ज करता येतो. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा, आणि गरजवंता पर्यंत पोहचवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.