MAHADBT शेतकरी योजने अंतर्गत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. महाराष्ट्र शासनाच्या MAHADBT पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना एका पेक्षा अधिक योजनांचा लाभ घेता येतो. या पोर्टल वर एकदा अर्ज केला की, त्या योजनेचा लाभ मिले पर्यंत तुम्हाला परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही. सध्या शासनाने सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (solar sprayer pump) या बाबीसाठी अर्ज करण्याचे अवाहन शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत केलेले आहे. सदरील योजना ऑनलाईन स्वरुपाची असून MAHADBT या पोर्टल वरती जाऊन अर्ज करायचा आहे. योजना काय आहे आणि अर्ज कसा करायचा ते आपण खाली पाहणार आहोत.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2024-2025 (MAHADBT)
महाराष्ट्र शासनाच्या MAHADBT पोर्टल अंतर्गत शेतकरी हिताच्या अनेक योजना शासनाकडून राबविल्या जातात. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रांचा लाभ मिळावा आणि शेतकऱ्याचे शेतीतील उत्पन्न वाढावे हा हेतू शासनाचा या माघचा आहे. MAHADBT अंतर्गत मागील वर्षा प्रमाणेच या वर्षी सन 2024-2025 साठी शेतकऱ्यांना सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (solar sprayer pump) या बाबीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. MAHADBT च्या पोर्टल वर जावून शेतकरी या बाबीसाठी अर्ज करू शकतात.
100% अनुदानावर चार्गिंग पंपासाठी असा करा अर्ज
MAHADBT च्या पोर्टल वर जाऊन तुम्हाला सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (solar sprayer pump) या बाबीसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कसा करायचा ते आपण पाहू.
MAHADBT शेतकरी नोंदणी/Mahadbt farmer Registration
MAHADBT पोर्टल वरती लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्याची नोंदणी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याची अगोदर नोंदणी झालेली असेल तर परत नोंदणी करण्याची गरज नाही. LOGIN करून तुम्ही हव्या असलेल्या बाबीला अर्ज करू शकता. पण जर नवीन असाल तर तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे.
नवीन अर्जदार नोंदणी
- सर्वप्रथम तुम्हाला पोर्टल वरील उजव्या कोपर्यात दिसणाऱ्या नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर अर्जदाराला त्याची ID आणि password बनवून घ्यायचा आहे.
- तसेच खालील रकान्यात तुमचा e-mail असेल तर आणि मोबाईल नंबर टाकून OTP घेवून व्हेरीफाय करायचे आहे.
- त्या नंतर दिलेला कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर तुम्हाला तुमची एकूण जमीन तुमचे बँक खाते इत्यादी माहिती भरायची आहे.
अशा पद्धतीने प्रोसेस पूर्ण करून तुम्ही अर्जदार नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज हा लेख वाचा
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (solar sprayer pump) साठी अर्ज कसा करायचा
- सर्वप्रथम तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या घटकाला निवडायचे आहे.
- मुख्य घटक या मध्ये तुम्हाला कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसाह्य हा पर्याय निवडायचा आहे.
- तपशील मध्ये मनुष्य चलित औजारे हा पर्याय निवडायचा आहे.
- यंत्रसामग्री, औजारे/उपकरणे या मध्ये तुम्हाला पिक संरक्षण ओजरे हा पर्याय निवडायचा आहे.
- मशीनचा प्रकार या मध्ये सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडायचा आहे.
- त्या नंतर त्या खालील सूचनेवर टिक मार्क करायचे आहे, आणि खालील जतन करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुम्हाला अजून काही बाबी निवडायच्या असतील तर निवडा किंवा नाही या बटनावर क्लिक करा.
- मुख्य मेनूवर आल्यावर अर्ज सबमिट करा या प्रयायला क्लिक करून अर्ज सबमिट करा.
- पोर्टल वरील फीस भरून अर्ज दाखल करा.
अशा पद्धतीने तुम्ही सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (solar sprayer pump) या बाबीसाठी अर्ज करू शकता, आणि या योजनेचा लाभ मिळवू शकता.
सारांश
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2024-2025 (MAHADBT): 100% अनुदानावर चार्गिंग पंपासाठी असा करा अर्ज या लेखात आपण सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (solar sprayer pump) या योजने बद्दल माहिती आपण पहिली. शासनाने शेतकऱ्यांना MAHADBT मार्फत सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2024-2025 अर्ज करण्याचे आवाहन केलेले आहे. सध्या online अर्ज चालू आहेत. माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी
- अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme
- MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान
- शेतकरी ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला
- पावर टिलर सब्सिडी: पावर टिलर खरेदी करा 50% सब्सिडीवर
- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज
- ऑनलाइन सातबारा बघणे: ONLINE 7/12 कसा काढायचा
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यसाठी खालील लिंक टच करा.