पेरणीला योग्य सोयाबीन बियाणांची निवड कशी करायची ? संपूर्ण माहिती

soybean seed variety:- सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख पिकांमधून एक आहे. कमी कालावधीत आणि प्रतिकूल वातावरणामध्ये चांगले उत्पन्न देणारे हे पिक आहे. महाराष्ट्रात सगळ्यात क्षेत्रात सोयाबीन पिक घेतले जाते. अनेक प्रक्रिया उद्योगात सोयाबीनला मागणी असल्याने या पिकाचे भाव चांगल्या प्रमाणात मिळतात. गोडतेल ते अनेक अशे पदार्थ आहेत जे सोयाबीन पासून बनविले जातात. सोयाबीन पिकात अनेक वेगवेगळ्या जातीचे बियाणे आज मार्केट मध्ये उपलब्ध आहेत, पण योग्य बियाणांची निवड ही अधिक उत्पन्न घेण्यासाठी फायद्याची ठरते. आज आपण सोयाबीन च्या वेगवेगळ्या जातीच्या ( Variety ) बद्दल माहिती पाहणार आहोत.Soybean Seed Variety

Soybean/सोयाबीन

सोयाबीन हे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त घेतले जाणारे पिक आहे. अगदी कमी दिवसात निघणारे सोयाबीन उतारासाठी चांगले पिक आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न या पिकांपासून मिळते. अनेक प्रक्रिया उद्योगात वापर होत असल्यामुळे या मालाचे भाव जास्त खाली जात नाहीत. सोयाबीन हे द्विदल पिक आहे, आणि कोणत्याही जमिनीत येणारे पिक आहे. मात्र पावसाळी पिक असल्या कारणाने वातावरणाचा परिणाम पिकावर होतो. वातावरणाचा परिणाम सोयाबीन पिकावर होऊ नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. नवीन आलेला येलो मोज्यक हा रोग सोयाबीन पिकाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान करत आहे.

सोयाबीन पिकाची पेरणी करण्या अगोदर योग्य बियाणाची निवड करणे महत्वाचे ठरते, कारण जमिनीच्या माती गुणधर्मावर देखील पिकांचे उत्पन्न अवलंबून असते. जमीन चीभड्णारी असेल किंवा पाणी धरून ठेवीत असेल अशा ठिकाणी कोणत्या जातीच्या सोयाबीन बियाणाची निवड करावी हे ही महत्वाचे ठरते. सुपीक किंवा काळभोर जमिनीत कोणते बियाणे जास्त उत्पन्न देते ही निवड गरजेची आहे. हेच निकष खडकाळ किंवा मुरमाड जमिनीच्या बाबतीत ही महत्वाचे आहेत.

Soybean Seed Variety – शासनाने महाराष्ट्रासाठी घोषित केलेल्या सोयाबीन जाती 

शासनाने प्रत्येक राज्यातील बदलते हवामान आणि जमिनीच्या गुणधर्मानुसार वेगवेगळ्या Soybean Vatiety सूचित केलेल्या आहेत. ज्या राज्यात जी सोयाबीन ची जात सुचविली आहे त्यानुसार सोयाबीन वाणाची निवड केल्यास शेतकऱ्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्यास नक्कीच मदत होईल.

महाराष्ट्रासाठी सुचविलेल्या Soybean Vatiety विषयी माहिती आपण खाली पाहणार आहोत.

विधर्भ आणि मराठवाडा Soybean Vatiety ( सोयाबीन वान).

  1. अहिल्या -1 (NRC 124).
  2. JS -335.
  3. JS- 71-05.
  4. JS- 93-05.
  5. JS-80-21.
  6. MACS-58.
  7. परभणी सोना-(MAUS-47).
  8. प्रतिष्ठा ( MAUS-61-2 ).
  9. शक्ती (MAUS-81 ).
  10. MACS- 13.
  11. मोनेत्ता.
  12. प्रसाद (MAUS-32).
  13. PK -472.
  14. TAMS-38.
  15. फुले कल्याणी (DS 228).

दक्षिण महाराष्ट्र soybean seed variety ( सोयाबीन वान).

  1. MACS-124.
  2. MACS-450.
  3. पंत सोयाबीन -1029.
  4. पूजा (MAUS 2 ).
  5. प्रतिकार (MAUS 61).
  6. प्रसाद ( MAUS 32 ).
  7. MACS -13.
  8. मोनेत्ता आणि फुले कल्याणी (DS -228 )
जिल्ह्यानुसार soybean seed variety ( सोयाबीन वान).
बीड, चन्द्रपूर, परभणी, पुणे, हिंगोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, यवतमाळ, लातूर MACS-124, MACS -450, पंत सोयाबीन-1029, पूजा (MAUS 2 ), प्रतिकार (MAUS 61 ), प्रसाद ( MAUS 32 ), MACS -13, J S-335, J S -80-21, MACS -58, आणि मोनेत्ता 
अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गोंदिया, जालना, नागपूर, नाशिक, नंदुरबार, वर्धा व वाशीम.

J S-335,  J S 93-05,  J S 80-21, MACS -58, परभणी सोना (MAUS 47 ), प्रतिष्ठा ( MAUS 61-2 ), शक्ती (MAUS 81), MACS -13, मोनेत्ता, प्रसाद (MAUS 32 ), पूजा ( MAUS 2 ), समृद्धी ( MAUS 71 ), TAMS-38, आणि फुले कल्याणी (DS 228).

वरील प्रमाणे राज्यातील जिल्ह्यानुसारsoybean seed variety निवडता येतात. वरील सोयाबीन वान हे शासनाने निर्देशित केलेले आहेत. अधिक माहितीसाठी शासनाच्या iisrindore.icar.gov.in या वेब पोर्टल ला अवश्य भेट द्या.

सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी 

सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी योग्य बियाणांच्या soybean seed variety निवडी बरोबरच इतर ही काही बाबी आवश्यक असतात. जसे की, शेतीची योग्य मशागत, पिकामधील तन नियंत्रण, खतांचा योग्य वापर, पिकांच्या वाढी नुसार आणि वातावरणानुसार योग्य कीटक नाशक फवारणी अशा काही गोष्टी जर योग्य वेळी करण्यात आल्या तर सोयाबीनच्या उत्पन्नात हमखास वाढ होते.

सारांश 

पेरणीला योग्य सोयाबीन बियाणांची निवड कशी करायची ? संपूर्ण माहिती या लेखात पेरणी पूर्वी सोयाबीनच्या soybean seed variety निवड कशी करायची या बद्दल आपण सविस्तर माहिती पहिली. पेरणी पूर्वी योग्य बियाणांची निवड केल्यास सोयाबीन च्या उत्पन्नात नक्कीच वाढ होते. माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा.

अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

हे ही वाचा ;-

आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top