TAFCOP मोबाइल नंबर चेक: तुमच्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत चेक करा

आपल्या आधार नंबर किंवा आयडी वर आपण मोबाईलचे सिम घेत असतो.  पण सायबर गुन्हेगार एखाद्याच्या आधार चा किंवा आयडीचा चुकीचा वापर करून सिम खरेदी करतात. आणि त्या मोबाईल नंबर वरून दुसऱ्याची आर्थिक फसवणूक करतात. अशा वेळेस सिम आपल्या नावावर घेतलेले असल्या कारणाने पुढील कार्यवाहीला आपल्याला सामोरे जावे लागते.  TAFCOP हे एक अत्याधुनिक साधन आहे, जे मोबाईल नंबरची सत्यता सुनिश्चित करते. या द्वारे तुमच्या नावे किती मोबाईल सिम आहेत हे तुम्ही तपासू शकता.

TAFCOP मोबाइल नंबर चेक
TAFCOP

TAFCOP मोबाइल नंबर चेक: तुमच्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत चेक करा

दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या आयडी किंवा आधार कार्डचा वापर करत असतो. याच कागदपत्रांच्या आधारे सायबर गुन्हेगार आपल्या नावाने मोबाईल सिम घेऊन इतरांना आर्थिक बाबतीत फसवून गुन्हा करू शकतात. आणि सिम आपल्या नावाने असल्याने पर्यायाने आपल्याला पुढील अडचणीला सामोरे जावे लागते.

तुमच्या नावावर किती मोबाईल सिम आहेत हे कसे चेक करायचे ते आपण पुढे पाहणार आहोत.

TAF-COP ही दूरसंचार विभाग DEPARTMENT OF TELECOMMUNICATIONS ( DOT ) मार्फत फसवणूक आणि ग्राहक संरक्षण सेवा पुरवते. ग्रहाची ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न शील असते. तुमच्या आधार कार्ड किंवा आयडीवर किती सिमकार्ड सक्रिय आहेत हे तपासण्यासाठी तुम्हाला DOT च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला दूरसंचार विभागाच्या http://tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर किंवा संचार साथीच्या  https://tafcop.sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.
  • संचार साथीच्या वेबसाईटवर आल्या नंतर तुमच्या समोर दिसणाऱ्या पेजवर तुम्हाला CITIZEN CENTRIC SERVICES या मेनू बार मधील पर्यायाला निवडायचे आहे.
  • CITIZEN CENTRIC SERVICES या पर्यायावर आल्या नंतर KNOW YOUR CONNECTIONS TAFCOP या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर तुम्हाला पहिल्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • दुसऱ्या रकान्यात दिलेला कॅप्चा भरायचा आहे.
  • कॅप्चा भरून झाल्यावर त्या खालील Validate Captcha या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • Validate Captcha या बटनावर क्लिक करताच भरलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल ती तुम्हाला खालील रकान्यात भरून Login या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • Login या बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल सिम कार्ड नंबर ओपन होतील.
  • तुम्हाला दिसणाऱ्या नंबर पैकी काही नंबर तुमच्या वापरात नसतील तर त्या नंबरची तक्रार तुम्ही DOT कडे करू शकता.
  • Report या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या वापरात नसणाऱ्या नंबरची तक्रार करू शकता.

सायबर फसवणुकी संबंधित तक्रार – REPORT SUSPECTED FRAUD & UNSOLICITED COMMUNICATION/SPAM

संचार साथीच्या पोर्टल वरून तुम्ही तुमच्या सोबत झालेल्या आर्थिक फसवणूक, व्हाट्सअप किंवा sms द्वारे झालेल्या सायबर फ्रॉड ची तक्रार Online करू शकता. सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी तुम्हाला पोर्टल वरील CITIZEN CENTRIC SERVICES मधील REPORT SUSPECTED FRAUD & UNSOLICITED COMMUNICATION/SPAM या पर्यायाला निवडायचे आहे.

  • REPORT SUSPECTED FRAUD & UNSOLICITED COMMUNICATION/SPAM या पर्यायावरती आल्यावर Continue reporting ला क्लिक करायचे आहे.
  • समोर पेन होणाऱ्या पेजवर तुम्हाला तुमच्या सोबत झालेल्या फ्रॉड ची माहिती तसेच तुमची वयक्तिक माहिती इत्यादी बाबी भरून तुमच्या मोबाईल ची OTP देऊन फॉर्म सबमिट करायचा आहे.

अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदविली जाईल. आणि सायबर फ्रॉड विषयी पुढील प्रक्रिया सुरु होईल.

Conclusion

TAFCOP मोबाइल नंबर चेक: तुमच्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत चेक करा या लेखात आपण तुमच्या आयडी किंवा आधार कार्ड वर किती मोबाईल सिम कार्ड सक्रिय आहेत, या बद्दल सविस्तर माहिती पहिली. दूरसंचार विभागाच्या पोर्टल वरती जाऊन तुम्ही तुमच्या नावावर किती मोबाईल सिम रजिस्टर आहेत याची माहिती घेऊ शकता, त्याच बरोबर तुमच्या सोबत एखादा सायबर फ्रॉड झाला तर त्याची तक्रार देखील करू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

🟢🟣🔵 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top