token yantra बियाणे पेरणी टोकन पद्धतीने करतांना जास्तीचे मजूर आणि वेळ कमी करण्यासाठी आधुनिक टोकन यंत्राची निर्मिती झाली आहे. या यंत्राने कमी मजुरात आणि सुयोग्य पद्धतीने बियाणांची पेरणी करता येते. सोयाबीन, मका, भुईमुग, सुर्यफुल, कापूस, तूर इत्यादी पिकांची पेरणी या टोकन यंत्राने करता येते. 5 इंच, 10 इंच, आणि 15 इंच अशा अंतराने बियाणे लागवड टोकन यंत्राने करता येते. महाराष्ट्र शासनाच्या mahadbt पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना टोकन यंत्र अनुदानावर दिले जात आहे.
Token Yantra mahaDBT Yojna:- महाडीबीटी टोकन यंत्र ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या mahadbt पोर्टल अंतर्गत यांत्रिकीकरण मधून शेतकऱ्यांना अनेक आधुनिक यंत्र सामुग्री पुरविली जातात. शेतकऱ्यांचे उतपन्न वाढून त्याच्या वार्षिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने शासन सदरील योजना राबवीत असते. यांत्रिकीकरण बाबी अंतर्गत अनेक आधुनिक यंत्रसामुग्री बरोबरच बियाणांच्या लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे token yantra ही शेतकऱ्यांना अनुदानामध्ये उपलब्ध करून देत आहे. या टोकन यंत्रासाठी mahadbt वर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या mahadbt पोर्टल वरती लॉगीन करावे लागेल. आधार नंबरच्या किंवा बनविलेल्या आयडी आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगीन करता येते.
टोकन यंत्र ऑनलाईन अर्ज प्रोसेस
- सर्वप्रथम mahadbt पोर्टल वरती आपल्या आधार किंवा आयडी वरून लॉगीन करावे लागेल.
- लॉगीन केल्या नंतर अर्ज करा वरती क्लिक करा, पुढील पेज वर कृषी यांत्रिकीकरण या बाबी समोरील बटनवर क्लिक करा.
- नंतर मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र ओजारांच्या खरेदीसाठी अर्थ साह्य या पर्यायाला निवडा.
- तपशील मध्ये मनुष्य चलित औजारे हा पर्याय निवडा.
- यंत्र सामुग्री अवजारे/उपकरणे मध्ये टोकन यंत्र निवडा.
- खालील चेक बॉक्स वर टिक मार्क करून, जतन करा या बटनावर क्लिक करा.
- या नंतर मुख्य मेन्यू मध्ये जावून अर्ज सदर करा या पर्यायावर जा आणि केलेल्या अर्ज्वर टिक करून फीस भरा.
अशा पद्धतीने तुमचा अर्ज दाखल होईल तसा म्यासेस तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर प्राप्त होईल. अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर टच करा :- https://mahadbt.maharashtra.gov.in
सारांश
Token Yantra mahaDBT Yojna:- महाडीबीटी टोकन यंत्र ऑनलाइन अर्ज या लेखात आपण टोकन यंत्रासाठी अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली. शासनाच्या mahadbt पोर्टल वरती जावून टोकन यंत्र या बाबीसाठी ऑनलाईन अर्ज स्वतः करता येतो. स्वतः च्या मोबाईल किंवा PC वरून घर बसल्या अर्ज करता येतो. token yantra हे 100% अनुदानावर शासनाकडून दिले जाते. माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. आणि अश्याच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
हे ही वाचा ;-
- MAHADBT ट्रॅक्टर योजना: ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ONLINE अर्ज
- सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025-2026 (MAHADBT): 100% अनुदानावर चार्गिंग पंपासाठी असा करा अर्ज
- Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी
- MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना
- MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान
- शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला
- ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024-2025 ; नवीन अर्ज, लाभ आणि कागदपत्रे