udyogini scheme – शासनाकडून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अनेक योजना शासनाकडून महिलांना सक्षम करण्या करिता शासन चालविते. ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे, महिलांना लघु आणि सूक्ष्म उद्योग उभारणीसाठी या योजनेतून अर्थसाह्य केले जाते. महिलांना व्यवसाय उभारणीसाठी खासगी कर्ज घेण्याची गरज पडू नये, आणि त्यांना व्याज विरहित सुलभ कर्ज मिळावे या उद्देशाने शासनाने सदरील योजना सुरु केलेली आहे. उद्योगिनी योजना काय आहे, आणि या योजनेच्या पात्रता काय आहेत या बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
उद्योगिनी योजना ( udyogini scheme)
2004-2005 पासून सुधारित स्वरुपात udyogini scheme सुरु करण्यात आलेली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील व्यवसाय उद्योग करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना खाजगी कर्ज घेण्याची गरज पडू नये, यासाठी शासन महिलांना बिनव्याजी सुलभ कर्ज उपलब्ध करून देते. त्या सोबतच भरघोस अनुदान सुद्धा देते. महिलांना खासगी कर्जावर व्याज भरावा लागू नये हा उद्देश शासनाचा या योजने मागचाआहे. राज्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, आणि या मधून महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी शासन महिलांना बिनव्याजी कर्ज देते त्या सोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या महिलांना एकूण कर्जावर 30% अनुदान दिले जाते.
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या महिलांना कर्जामधून 50% अनुदान दिले जाते. तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या महिलांना निधी राखीव ठेवल्या जातो.
उद्योगिनी योजने अंतर्गत कर्जाचे स्वरूप
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना युनिटची किमान किंमत रु. 1 लाख ते 3 लाख रुपये आहे. अनुदानाची मर्यादा 50% आहे.
- विशेष श्रेणी आणि सामान्य श्रेणी मधील महिलांना युनिटची कमाल किंमत रु. 3 लाख आहे. अनुदान 30% आहे.
कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर कर्जाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. बँकने ठरवून दिलेल्या कर्ज फेडीच्या हप्त्या नुसार कर्जाची परत फेड करावी लागते. नियमित कर्ज फेड करणाऱ्या महिलांना कर्ज अनुदानाचा लाभ दिला जातो.
Udyogini Scheme Eligibility/ उद्योगिनी योजना पात्रता
- अर्जदार महिला असावी.
- अर्जदाराचे वय सर्व श्रेणीसाठी 18 ते 55 वर्षा दरम्यान असावे.
- अर्जदार हा कोणत्याही वित्तीय शाखेचा थकबाकीदार नसावा.
- सर्वसाधारण श्रेणीतील महिलांना उत्पन्नाची अट ही वार्षिक रु. 1,50,000 आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी उत्पन्नाची अट ही रु. 2,00,000 आहे.
- दारिद्र्ये रेषेखालील, विधवा, निराधार व अपंग यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
- कौशल्य विकास किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
उद्योगिनी योजना अर्ज प्रक्रिया
- व्यवसाय कर्जासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याने पूर्ण कागदपत्रासह जवळच्या बँकेला भेट देवून पुढील प्रोसेससाठी जिल्हा उद्योग केंद्राला अर्ज दाखल करायचा आहे.
- कागदपत्राची पडताळणी झाल्या नंतर अर्ज मंजुत करून तसे प्रपोजल बँकेला पाठविले जाते.
- अर्जदाराची मंजूर रक्कम खातेदाराच्या बँक खात्यात किंवा यंत्रसामग्री खरेदी केलेल्या पुरवठादाराच्या खात्यात जमा केली जाते.
उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- अर्जदाराचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो.
- ज्या उपक्रमासाठी अर्ज केला आहे त्या उपक्रमाचे प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र.
- रेशन कार्ड.
- मतदान ओळखपत्र.
- मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र.
- यंत्र सामुग्री आणि इतर भांडवली वस्तूच्या खर्चासाठी कोटेशन.
सारांश
उद्योगिनी योजना: महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 30% अनुदानावर बिनव्याजी कर्ज या blog मध्ये आपण udyogini scheme काय आहे या विषयी सविस्तर माहिती पाहिली. शासनाकडून महिलांच्या सक्षमी करिता सदरील योजना चालविली जाते. या योजनेतून व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांना बिन व्याजी सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय कर्जावर 30% ते 50% टक्के अनुदान दिले जाते. माहिती आवडली असल्यास गरजू पर्यंत पोहचावा.
हे ही वाचा :-
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online
- सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः चा व्यवसाय उभा करण्याची सुवर्ण संधी /Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra
- Skill India Courses List: Skill India अंतर्गत करता येणारे Free Online Certificate Coursess
- Work From Home Jobs: घरी बसून काम करा आणि कमवा लाखा पर्यंत
- Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा