UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा

UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा बँकेच्या आर्थिक व्यवहार तसेच इतर शासकीय कामासाठी आपले आधार बँक अकॉउंट शी लिंक असणे आवश्यक आहे. आधार बँक अकॉउंट शी लिंक नसेल तर बऱ्याच वेळेस येणारे अनुदान किंवा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. डिजिटल व्यवहार करण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे. विना बँक आधार सीडींग तुम्ही डिजिटल व्यवहार करू शकत नाही. आज आपण UIDAI NPCI Link Status कसे करायचे या बद्दल माहिती पाहणार आहोत.

बँक सीडिंग स्थिती

UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा
NPCI Link Status

भारत सरकारने देशात डिजिटल पेमेंट संकल्पना चालू केली. आज आपल्याला प्रत्येक व्यवहार हा डिजिटल रूपात करता येतो. शासनाकडून येणारी मदत, अनुदान किंवा शिष्यवृत्ती ही सरळ DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होते. मात्र यासाठी तुम्हाला तुमचे आधार हे बँक अकॉउंट शी संलग्न करावे लागते. यालाच बँक सीडींग असे म्हणतात. बँक सीडींग कशी करायची ते आपण पाहणार आहोत.

UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा

National Payment Corporation of India/ NPCI ही भारत सरकारची आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणारी शासकीय संस्था आहे. सगळे Online आर्थिक व्यवहारावर या संस्थेचे नियंत्रण असते. तुमच्या बँक आधार सीडींग ची नोंदणी  NPCI कडे होत असते. UIDAI NPCI Link Status बँक अकॉउंट ला तुमचे आधार लिंक आहे किंवा नाही, हे कसे चेक करायचे हे आपण खाली पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या MY  AADHAR या पोर्टल वर जावे लागेल.
  • या पोर्टल वरती आल्या नंतर AADHAR SERVICES या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
  • Aadhaar Services वरती आल्या नंतर तुम्हाला AADHAR LINKING STATUS वर क्लिक करायचे आहे.
  • नवीन पेज वर Check Aadhaar Validity मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून लॉगिन करायचे आहे.
  • या नंतर Bank Seeding Status वरती क्लिक करून आधार आणि कॅप्चा भरून घ्या.
  • आलेला OTP त्या खाली भरून LOGIN करा.
  • LOGIN केल्या नंतर Bank Seeding Status वरती क्लिक करा, तुमच्या समोर आधार नंबर शी लिंक असलेल्या बँकेचे STATUS ओपन होईल.

    UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा
    NPCI Link Status

अशा प्रकारे तुम्ही UIDAI च्या मध्येमातून  NPCI Link Status चेक करू शकता.

PVC आधार कार्ड ऑर्डर करा /Order Aadhaar PVC Card

MY  AADHAR पोर्टल वरून तुम्ही इतर सुविधा बरोबरच तुमच्या कडे असणाऱ्या कागदी आधार कार्ड ऐवजी PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता. PVC आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • My Aadhar पोर्टल लॉगिन केलेल्या नंतर  PVC आधार कार्ड ऑर्डर/ Order Aadhaar PVC Card वरती क्लिक करा.
  • पुढील पेज वर तुमचे डीटीएल येईल.
  • Next वर क्लिक करताच तुम्हाला PVC कार्डसाठी ५ ० रु. पेमेंट करायला सांगितले जाईल.
  • पेमेंट करताच तुमच्या आधार कार्ड वर असणाऱ्या पत्त्यावर तुमचे PVC आधार कार्ड येऊन जाईल.

अशा प्रोसेस ने तुम्ही तुमचे PVC आधार कार्ड ORDER करू शकता.

Conclusion

UIDAI NPCI Link Status: बँक सीडिंग स्थिती तपासा या लेखत आपण NPCI Link Status कसे चेक करायचे या बद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पहिली. तसेच PVC आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे, या बद्दल हि सव्हिसेर माहिती पहिली. तुम्ही may aadhar पोर्टल वरील सर्व सेवा विना मूल्य आपल्या मोबाईल वरून मिळवू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया गृप मध्ये सामील व्हा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी किल्क करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top