वाहनाच्या नंबर प्लेट वरून शोधा वाहन मालकाचे नाव आणि वाहनाचा संपूर्ण तपशील

vehicle owner details by number:- भारत सरकार रस्ते वाहतूक खात्या मार्फत वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या वाहनाचा एक पासिंग नंबर ( RTO ) रजिस्टर करून देते. हा पासिंग नंबर  हा त्या व्यक्तीने खरेदी केलेल्या वाहनाची मालकी ही त्या व्यक्तीच्या नावाने आहे, तसेच वाहनाच्या पासिंग नंबर सोबत खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा अड्रेस जातो. वाहन कायद्या नुसार वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या कडे RC – रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे आवश्यक असते. तसेच वाहन चालविणाऱ्या व्यक्तीकडे ड्रायविंग लायसेन्स आणि वाहनाचे इन्शुरंस असणे बंधन कारक आहे. vehicle owner details by number

वाहनाला नंबर प्लेट का असते

भारत सरकारच्या रसे वाहतूक आणि राज मार्ग मंत्रालया मार्फत देशातील वाहतूक नियंत्रण आणि वाहनाविषयी कायदे बनविले जातात. शासनाच्या RTO विभागामार्फत देशातील वाहनासाठी पासिंग नंबर दिला जातो. तसेच तुमच्या वाहनाची आणि तुमची माहिती ही RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) वर दिली जाते.

वाहनाच्या नंबर प्लेट वर असणारा नंबर म्हणजे ते वाहन कोणच्या नावाने रजिस्टर आहे, त्या वाहनाचा मालकी हक्क, तसेच वाहनाची इतर माहिती या सगळ्या गोष्टी त्या नंबर प्लेट वरील नंबरशी निगडीत असतात. नंबर प्लेट वरील नंबरच्या आधारे (vehicle owner details by number) त्या वाहनाच्या मालकाची व वाहनाची संपूर्ण माहिती मिळविता येते. ही माहिती कशी मिळवायची याची माहिती आपण स्टेप-बाय-स्टेप पाहणार आहोत.

वाहनासोबत येणाऱ्या RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) मध्ये कोणती माहिती असते

वाहन खरेदी केल्या नंतर वाहन मालकाला वाहनाची पासिंग करणे आवश्यक असते. वाहनाची पासिंग झाल्या नंतर वाहन मालकाला RTO ऑफिस कडून RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) दिले जाते. हे RC टू-व्हीलर पासून ते अवजड वाहनापर्यंत अशा सर्व रोडवर चालणाऱ्या वाहनाला दिले जाते. RC हे वाहना विषयीचे अत्यंत महत्वाचे दास्तावेज आहे.

RC मध्ये वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, वाहन तयार झाल्याचे वर्ष, वाहनाचे इंजिन नंबर-चासिस नंबर आणि वाहन मालकाचे संपूर्ण नाव व अड्रेस इत्यादी महत्वपूर्ण तपशील RC वर असतो. RC हे वाहनाचे संपूर्ण तपशील प्रधान करते जसे कि वाहनाचा विमा आणि वाहनाची वैधता कालावधी अशा पद्धतीने वाहनाला रोड वर चालविण्यासाठी RC हे एक महत्वाचे दस्तावेज म्हणून उपयोगी पडते.

वाहनाच्या नंबर प्लेट वरून मालकाचे नाव आणि वाहनाचा तपशील कसा शोधायचा (vehicle owner details by number)

जुने वाहन खरेदी विक्री करत असतांना किंवा रोड वर वाहन चालवीत असतांना एखादा अपघात झाल्यास हिट & रन केस मध्ये आपल्याला त्या वाहनाचा आणि मालकाचा तपशील हवा असतो. मग अशा वेळेस जर त्या वाहनाच्या नंबर प्लेट वरून नंबर नोंद करून घेतलेला असेल तर त्या नंबर वरून आपण त्या मालाचे आणि त्या वाहनाचे तपशील काढू शकतो. नंबर प्लेट वरून मालकाचा आणि वाहनचा तपशील (vehicle owner details by number) आपण शासनाच्या ‘एम परिवहन’ वेबसाईट वर जावून काढू शकतो, नंबर प्लेट वरील नंबर वरून ‘एम परिवहन’ अॅप वरून आपण मालकाचा व वाहनाचा तपशील कडू शकतो, तसेच RTO विभागाच्या मोबाईल नंबरवर मॅसेज करून आपण तपशील मिळवू शकतो.

वाहनाचा सर्व तपशील हा तुमच्या विभागातील RTO ऑफिस कडे असतो, त्यामुळे विभागीय RTO कार्यालयाकडून आपण अपघात प्रसंगी किंवा इतर बाबीमध्ये वाहनाचा तपशील मिळवू शकतो. आपण वाहनाचे तपशील मिळविण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व पर्याय एक-एक करून पाहू.

‘परिवहन सेवा’ या पोर्टल वरून मालकाचा आणि वाहनाचा तपशील कसा मिळवायचा

vehicle owner details by number-मालकाचा आणि वाहनाचा तपशील परिवहन पोर्टल वरून काढण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://parivahan.gov.in वर जावे लागेल. वाहना विषयीच्या सर्व कार्यालयीन सुविधा शासनाने आता या वेबसाईट वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुमच्याकडे मोबाईल किंवा PC असणे आवश्यक आहे.

वेबसाईट वर आल्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला मेन्यूबार मधील डाव्या बाजूला दिसणाऱ्या Informational Services वरती जावे लागेल, आणि त्यामध्ये दिसणाऱ्या know Your Vehical Details वरती क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि आयडी बनवावी लागेल. तुच्याकडे पहिली आयडी असल्यास नवीन बनविण्याची गरज नाही. आयडी तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर वरून किंवा e-mail आयडी वरून बनवू शकता.

RC STATUS मिळविण्यासाठी तुम्हाला वाहन नंबर व त्या खालील कॅप्चा टाकून त्याखालील  Vahan Search या बटनावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक करताच वाहनाचे सर्व तपशील तुमच्या समोर ओपन होईल.

अशा प्रकारे एम परिवहन पोर्टल वरून तुम्ही वाहनाचा आणि वाहन मालकाचा संपूर्ण तपशील मिळवू शकता.

एम परिवहन अॅप वरून मालकाचा आणि वाहनाचा तपशील मिळविणे

vehicle owner details by number वाहनाचा तपशील मिळविण्यासाठी तुम्ही एम परिवहन अॅप चा वापर करू शकता. प्ले स्टोर वर mParivahan हे परिवहन वेबपोर्टल चे अॅप उपलब्ध आहे. हे अॅप डाउनलोड करून या अॅप वर लॉगीन करावे लागेल.या अॅप वरून वाहनाचा संपूर्ण तपशील मिळवू शकता.

Vehicle या पर्यायाला निवडून Informational Services जावे लागेल. know Your Vehical Details वरती जावून वाहनाचा नंबर टाकून वाहन आणि मालक दोन्हीचे तपशील मिळवू शकता.

mParivahan अॅप डाउनलोड करण्यासठी पुढील लिंक टाचा करा https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.mparivahan

मोबाईल मॅसेजद्वारे वाहनाचा व मालकाचा तपशील मिळविणे

vehicle owner details by number तुमच्या भागातील RTO कार्यालयाकडे असलेल्या वाहनाच्या नोंदणीवरून तुम्ही कार्यालयाच्या ऑफिस ला मॅसेज करून वाहन मालकाचा व वाहनाचा तपशील मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबर वर मॅसेज करावा लागेल. मॅसेज करताच तुम्हाला दिलेल्या वाहनाच्या नंबर वरून वाहनाचा तपशील मिळेल.

मॅसेज करून वाहनाचा तपशील मिळविण्यासाठी तुम्हाला  7738299899 या नंबरवर मॅसेज करावा लागेल.

  • Type VAHAN ( space) वाहन रजिस्ट्रेशन नंबर उदा: VAHAN MH21AB1234
  • Send to 7738299899.

vehicle owner details by number तुम्हाला मालकाचे व वाहनाचे संपूर्ण तपशील मिळून जाईल.

SMS सेवेद्वारे नेहमीच वाहनाचे तपशील मिळेल असे नाही. तुम्ही परिवहन पोर्टल वरून योग्य व अचूक माहिती मिळवू शकता. पोर्टल शासकीय असल्यमुळे तुम्हाला अचूक व विश्वसनीय माहिती मिळू शकते.

सारांश

वाहनाच्या नंबर प्लेट वरून शोधा वाहन मालकाचे नाव आणि वाहनाचा संपूर्ण तपशील या लेखात आपण वाहनाच्या नंबर प्लेट (vehicle owner details by number) वरून वाहन मालकाचा आणि वाहनाचा तपशील कसे काढायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. शासनाच्या परिवहन पोर्टल वरून तुम्ही वाहनाच्या सर्व सुविधा ऑनलाईनमिळवू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

हे ही वाचा :-

अशीच नवीन माहितीटच मिळविण्यासाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा, सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top