Work From Home Jobs: घरी बसून काम करा आणि कमवा लाखा पर्यंत

Work From Home Jobs :- आज वाढत्या महागाईमध्ये दैनंदिन खर्च आणि गरजा भागविणे अवघड झालेले आहे. घरात एक कमावता व्यक्ती असला आणि बाकी सदस्य त्यावर अवलंबून असले तर अशा वेळेस घर खर्च आणि इतर गरजा भागविणे शक्य होत नाही. अशा वेळेस घरातील इतर सदस्य कुटंब प्रमुखाला आर्थिक हातभार लावीत असतील तर आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतात. देशात झपाट्याने वाढत असलेले आधुनिकीकरण आणि मनुष्यबळाची आवश्यकता यातून बेरोजगारांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत. बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना Work From Home ची सुविधा देत आहेत. विशेष करून कोरोना काळापासून घरून काम करण्यावर जोर दिला जात आहे. आज आपण तुम्ही घरी बसून काम करण्याची संधी कशी आणि कोठून मिळवू शकता, या बद्दल माहिती पाहणार आहोत.Work From Home Jobs

घरी बसून काम करण्याची संधी

वाढत्या औद्योगिकरण आणि इंटरनेट मार्केटिंग च्या काळात बरेच JOBS आहेत जे तुम्हाला घर बसल्या करता येतात. आणि यातून तुम्ही महिन्याला चांगली कामे करता येते. कोरोना काळात आपण पाहिले बऱ्याच कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तेंव्हा पासून घरून पण कामे करता येतात, ही एक नवीन संधी निर्माण झाली.

अनेक कंपन्यांकडून तसेच इतर उद्योगातून लोकांना घरबसल्या काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. कॉम्पुटर तसेच लॅपटॉप वरून करता येणारे कामे ही आता घरूनच करता येत आहेत. तसेच अनेक कंपन्या आपले प्रॉडक्ट ची प्याकिंग सारखी कामे घरबसल्या लोकांना पोहचवून करून घेत आहेत.

घरी बसून काम करण्याचे फायदे/ Benefits of Working From Home

  • घरबसल्या काम करण्याची संधी उपलब्ध झाल्यास स्वतः ची कुठली ही गुंतवणूक ना करता, महिन्याला पैसे कमवता येतात.
  • Work From Home मध्ये तुम्ही घराची कामे उरकून आर्थिक कमाई करू शकता.
  • काम शोधण्यासाठी तुम्हाला इतर ठिकाणी चकरा मारण्याची आवश्यकता नाही.
  • घरातील सर्व सदश्यांना सोबत घेऊन तुम्ही घरच्या घरी काम पूर्ण करू शकता.
  • कंपनी कडून मिळणाऱ्या प्याकिंग सारख्या कामात, नगावर रक्कम ठरवून जास्तीत जास्त नग तयार करून जास्तीची रक्कम कमावता येते.
  • ऑनलाईन सारखी कामे तुम्ही तुमची दुकान किंवा घर इत्यादी सांभाळून घरच्या घरी करू शकता.

Work From Home Jobs आवश्यक कौशल्य

घरबसल्या काम मिळवण्यासाठी तुमच्याकडे त्या कामाविषयी काही कौशल्य असेल तर तुमच्यासाठी ते काम मिळवण्यात आणि करण्यात सोयीचे ठरते.  त्यामुळे Work From Home Jobs ची निवड करत असताना तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार त्या कामाची निवड करावी.

कॉम्पुटर ज्ञान असेल तर अनेक कंपन्यांकडून तुम्हाला JOBS ऑफर केले जातात. जे तुम्ही घर बसल्या करून पगार मिळवू शकता. तसेच तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक ज्ञान असेल तर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविणाऱ्या कंपन्या तुमच्या कडून घरबसल्या त्यांचे काही प्रॉडक्ट बनवून घेऊ शकतात. अनेक कंपन्या आपल्या वास्तुच्या प्याकिंग चे कामे तुमच्या कडून घरबसल्या करून घेतात.

संभाषण कौशल्य/ Communication Skills

तुमच्या कडे जर उत्कृष्ट संभाषण कौशल्य असेल तर अनेक मोबाईल सिम कंपन्यांकडून तुम्हाला घर बसल्या जॉब्स दिले जातात. तुम्ही घरबसल्या ग्राहकांशी संपर्क करून मोबाईल सिम कंपन्यांकडून पगार मिळवू शकता. यासाठी तुम्हाला ग्राहकाशी चांगल्या प्रकारे संभाषण करता आले पाहिजे.

घर बसल्या करता येणारे काही लोकप्रिय कामे/  Popular Work From Home Job Categories

Work From Home Jobs मध्ये अनेक कामे आहेत, पण काही लोकप्रिय कामे आहेत जे लोकांना जास्त पैसे कमवून देऊ शकतात. आणि ही कामे करताना कमी मेहनत आणि वेळ लागतो शिवाय या मधून मिळणारा आर्थिक लाभ हा जास्त असतो.

Customer Service/ ग्राहक सेवा प्रतिनिधी

देशातील मोबाईल सिम कार्ड च्या कंपन्यांचे जाळे पाहता, या कंपन्या मध्ये ग्राहकांना योग्य सेवा पुरविण्यासाठी ग्राहक सेवा प्रतिनिधी ची आवश्यकता असते. प्रत्येक टेलिकॉम कंपनी कडून आपल्या ग्राहकांसाठी Customer Service सेंटर चालविली जाते. तुम्ही या गोष्टीत पारंगत असाल तर कंपनी तुम्हाला या कामासाठी घर बसल्या चांगला पगार देते.

Data Entry

अनेक मोठं मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांच्या ऑनलाईन कामांसाठी प्रशिक्षित ऑपरेटर ची आवश्यकता असते. कंपनी Data Entry चे काम करणाऱ्या ऑपरेटर ला घर बसल्या या कामासाठी चांगला पगार देते. शिवाय कंपनीच्या इतर सेवांचा लाभ देखील घेता येतो.

Digital Marketing

आजच्या डिजिटल युगात कुठले ही प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी असुद्या सगळ्या कंपन्यांची ओढ ही Digital Marketing कडे आहे. आपल्या प्रॉडक्ट ला जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचविण्यासाठी कंपनी Digital Marketing चा वापर करत आहे. या Digital Marketing मधून तुम्ही घर बसल्या चांगले पैसे कमवू शकता. प्रॉडक्ट च्या विक्रीवर कंपनी चांगले कमिशन तुम्हाला देते.

Online Classes

आजच्या काळात तुम्ही विद्यार्थ्यांना online शिकवण्याचे काम आपल्या घरून करू शकता. विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस शहराच्या ठिकाणी जाऊन क्लासेस लावणे शक्य नसतात, मग अशा वेळेस त्यांची ओढ ऑनलाईन क्लासेस कडे असते. अशा वेळेस तुम्ही जर ऑनलाईन क्लासेस घेत असाल तर तुम्हाला त्यामधून चांगले इन्कम मिळू शकते.

Creative Fields (Writing,Graphic Design.)

डिजिटल काळात तुम्ही अनेक प्लॅटफॉर्म वरती जाऊन तुम्ही घर बसल्या काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठे ही जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या कडे जर लेखन कौशल्य असेल तर तुम्ही घर बसल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप च्या साह्याने blog writing करू शकता. स्वतः आपली वेबसाईट बनवून पैसे कमवू शकता किंवा इतर blogger ला ठराविक पैसे घेऊन blog लिहून देऊ शकता.

ग्राफिक तयार करण्याचे कौशल्य असेल तर Graphic Design करून तुम्ही घरच्या घरी पैसे कमवू शकता. स्वतः च्या कॉम्पुटर वरून तुम्ही हे काम करून दुसऱ्या कडून पगार मिळवू शकता किंवा स्वतः हा व्यवसाय करू शकता.

Work From Home Jobs असा करा अर्ज

शासनाने लोकांना घर बसल्या नोकरी मिळावी आणि त्यांच्या आर्थिक गरजांना मदतीचा हात लागावा, यासाठी National Career Service हे Ministry of Labour & Employment विभागाचे पोर्टल विकसित केले आहे. या पोटाला द्वारे तुम्हाला शासनाकडून किंवा खासगी कंपन्यांकडून जॉब उपलब्ध करून दिले जातात.

Work From Home Jobs
Work From Home Jobs

तुम्हाला हव्या असलेल्या Work From Home Jobs साठी तुम्हाला शासनाच्या www.ncs.gov.in या पोर्टल वरती जाऊन तुमची नोंदणी करावी लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला NCS या पोर्टल वरती जावे लागेल, या पोर्टल वरती आल्या नंतर Search Jobs या पेजवर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
  • या पेज वर तुम्हाला हव्या असलेल्या जॉब्स ची निवड करावी लागेल.
  • तुम्हाला हवी असलेली पगार तुम्हाला निवडावी लागेल.
  • तुम्हाला जॉब चा प्रकार निवडावा लागेल तुम्हाला गोव्हरमेंट जॉब पाहिजे कि प्रायव्हेट.
  • तुम्ही काम करण्यास इच्छुक असलेला एरिया किंवा तुम्ही घरून काम करणार आहेत ही माहिती तुम्हाला भरायची आहे.
  • तुम्हाला असलेला अनुभव टाकायचा आहे.
  • तुम्ही पूर्ण वेळ काम करणार किंवा पार्ट टाइम काम करणार हे तुम्हाला पोर्टल वरती निवडायचे आहे.
  • तुमचे वय तुमचे शिक्षण, लिंग, कास्ट क्याटेगिरी, अपंग असाल तशी माहिती इत्यादी माहिती तुम्हाला पोर्टल वरती भरायची आहे.

Jobseeker

शासनाच्या NCS या पोर्टल वर Jobseeker पर्यायाला क्लिक करून तुम्हला हव्या असलेल्या Work From Home Jobs ची माहिती तुम्ही लगेच घेऊ शकता. त्यासाठी पोर्टल वर आल्या नंतर इतर पर्याया मध्ये दिसणार्‍या Jobseeker या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक करून दिसणार्‍या रकान्यात तुम्हाला हव्या असलेल्या जॉब्स विषयी माहिती भरून तुम्ही त्या जॉब्स च्या उपलब्धते विषयी माहिती मिळवू शकता.

Conclusion

Work From Home Jobs: घरी बसून काम करा आणि कमवा लाखा पर्यंत या लेखात आपण घर बसल्या कोण -कोणती कामे करता येतात या विषयी तसेच Work From Home Jobs मिळवण्यासाठी शासनाच्या पोर्टल वर कुठे अर्ज करायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली आहे. शासनाच्या NCS पोर्टल वर जाऊन तुम्ही तुम्हाला हवे असलेले काम मिळवू शकता, आणि घर बसल्या करून चांगले पैसे कमवू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

🟢🟣🔵 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक टच करा. किंवा इथे क्लिक करा.

👇🏻 हे ही वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top