www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल :-  शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अनेक योजना या बांधकाम कामगाराच्या कल्याणासाठी राबविल्या जातात.सामाजिक सुरक्षा योजना,आरोग्यविषयक योजना, शैक्षनीक योजना, आर्थिक योजना योजनांमधून कामगाराचा सामाजिक स्तर उंचावण्याचा हेतू शासनाचा आहे. भारतात असंघटीत कामगाराची संख्या जास्त आहे. त्यामध्ये बांधकाम कामगार येतात. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची संख्या जास्त आहे, मजुरांना समाजातील इतर घटका बरोबर आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामगार मंडळाची स्थापना केली आहे. या मांडला कडून कामगाराच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केल्याच्या नंतर तुम्ही सदरील योजनेचा लाभ घेवू शकता. कामगार मंडळामध्ये केलेली नोंदणी हि तुम्हाला प्रत्येक वर्षी Renew करावी लागते, त्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत.www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

✅👉🏻माझी नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/ The Best Tips For Job

www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

कामगार मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या लाभार्थ्याला दरवर्षी आपली नोंदणी Renew करावी लागते. कामगार म्हणून नोंदणी करत असताना दिलेल्या कागद पत्रामधील 90 दिवस काम केल्याचे गुत्तेदाराचे प्रमाणपत्र हे परत नव्याने Renew करतांना अपलोड करावे लागते, तुम्ही अजून बांधकाम कामगार आहात का हे बघण्यासाठी मंडळ तुम्हाला सदरील प्रमाणपत्र माघते. त्याचा बरोबर तुम्हाला आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

✅👉🏻 Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा

Online Renewal कसे करायचे

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणाऱ्या कामगाराला प्रत्येक वर्षी मंडळाच्या साईटवर जावून आपले Registration Renew करावे लागते. कसे करायचे ते आपण पाहू.

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या वेबसाईट वर जावे लागेल. mahabocw.in  या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्या नंतर इतर पर्याय मधून Construction Worker Online Renewal या पर्यायाला निवडावे लागेल.

Construction Worker Online Renewal हा पर्याय निवडल्या नंतर New Renewal आणि Update Renewal हे पर्याय दिसतील. नवीन Renew करणाऱ्या लाभार्थ्याला New Renewal हा पर्याय निवडायचा आहे, हा पर्याय निवडल्या नंतर त्याखालील रकान्यात तुमचा Registration नंबर टाकायचा आहे. Registration नंबर टाकल्या नंतर तुमच्या Registred मोबाईल नंबर वर एक otp येयील तो otp रकान्यात भरल्या नंतर तुमच्या समोर Online Renewal चे पेज open होईल.

Online Renewal पेज open झाल्या नंतर तुम्हाला तुमची भरलेली माहिती दिसेल. पेज च्या शेवटी तुम्हाला कागदपत्रे अपलोड चे पर्याय दिसेल तिथे जाऊन तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. अपलोड केल्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमचे Renewal पूर्ण होईल.

✅👉🏻 Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

onstruction Worker Online Renew कागदपत्रे

Online Renewal साठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते करण तुम्ही नोंदणी करतांना सर्व कागदपत्रे दिलेली असतात. कामगार मंडळ तुमच्या कडून दर 12 महिन्याला Renew करून घेते, करण तुम्ही आज रोजी बांधकाम कामगार आहात किंवा तुम्ही बांधकाम मजूर म्हणून काम करत नाही, हे पाहण्यासाठी तुमच्या कडून Renewal करून घेतले जाते. Renewal करतांना तुमच्या कडून 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र घेतले जाते.

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र :-

बांधकाम कांगार म्हणून नोंदणी करत असतांना महत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार आहात याचे प्रमाणपत्र. तुम्ही वर्षातून कमीत कमी 90 दिवस तरी बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहजे तेव्हांच तुम्ही बांधकाम कामगार म्हणून गृहीत धरले जातात. जर तुम्ही तुम्ही वर्षातून 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करत नसाल तर तुम्हाला कामगार मंडळाची नोंदणी करता येणार नाही.

90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ज्या गुत्तेदाराकडे काम करत आहात त्यांच्या कडून  आणि तुमच्या गावाचे ग्रामशेवक यांच्या कडून घ्यावे लागते. दोघांचे सही-शिक्के त्यावर असतात. Online Renewal करताना तुहाला 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागते.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

www mahabocw in renewal status/ ऑनलाईन रिनीवलची स्थिती तपासा

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्या नंतर तुम्हाला दरवर्षी Online Renewal करावे लागते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या www.mahabocw.in या वेबसाईट जावे लागेल. वेबसाईट वर गेल्या नंतर तुम्हाला दिसणाऱ्या पर्याय मधून Construction Worker:Profile Login या पर्यायाला निवडावे लागेल.

Construction Worker:Profile Login हा पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला समोरील रकान्यात तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. आधार नंबर व मोबाईल नंबर टाकल्या नंतर सबमिट करायचे आहे, त्या नंतर तुमच्या मोबाईल वर 6 अंकी otp येयील ती तुम्हाला समोरील रकान्यात टाकायची आहे.

Otp भरल्या नंतर तुमच्या समोर तुमची Profile open होईल, त्या मध्ये Renewals ला क्लिक करा. क्लिक करताच तुम्हाला तुमचे renewal status दिसेल.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

Conclusion

www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल या लेखा मध्ये आपण बांधकाम कामगार यांच्या Online Renewal ची स्थिती कसी तपासायची हे पाहिले आहे. बांधकाम मंडळाची Online Renewal ची स्थिती तुम्ही अशा पद्दतीने पाहू शकतात. माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा.

🟢🔵🟣  आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top