Yellow Mosaic Virus: सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण

Yellow Mosaic Virus: सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण:-  शेतकरी मित्रानंसाठी अत्यंत चिंतेचा विषय असलेला येल्लो मोज्याक वायरस हा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी निदर्शनास येत आहे. साधारणतः उन्हाळ्यानंतर झालेल्या पहिल्या पेरणीच्या पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जाणवतो. मग सोयाबीन असेल युग असेल उडीद असेल अशा शेंगा वर्गीय पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव लवकर होतो. या रोगाने पिकाचे अतोनात नुकसान होते. पेरणीचा खर्च करून उत्पन्नासाठी पिकांवर खतांचे आणि फवारणीचे खर्च करणारा शेतकरी, पिकावरील या रोगामुळे हतबल होऊन जातो. बऱ्याच वेळेस हाताशी आलेली पिके या रोगामुळे नष्ट होतात. आणि शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास निघून जातो. Yellow Mosaic Virus या रोगाचा प्रादुर्भाव कसा होतो आणि या रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे या बद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.Yellow Mosaic Virus सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण

Yellow Mosaic Virus काय असतो

येल्लो मोज्याक वायरस हा असा रोग आहे, जो पिकांना ८० ते ९०% नष्ट करते. या रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याने पिकाच्या उत्पन्नासाठी केलेला खर्च वाया जातो, शिवाय मेहनत ही वाया जाते. पिवळ्या रंगाचा दिसणारा हा रोग सुरुवातील हळू-हळू पसरणारा रोग पूर्ण सोयाबीन आणि इतर डाळ वर्गीय पिकांवर पसरतो. आणि पूर्ण क्षेत्र नष्ट करतो. एकदा हा रोग पूर्ण पाने पसरला तर मग काहीच करता येत नाही. या पिकाचे वेळीच नियंत्रण होणे अत्यंत आवश्यक आहे.

Yellow Mosaic Virus Symptom/पिवळा मोझॅक व्हायरची लक्षणे

डाळ वर्गीय पिकांवर येणार हा रोग पिकांवर हळू-हळू पसरतो मात्र याची नुकसान करण्याची टक्केवारी ८० ते ९०% आहे. सोयाबीन या पिकावर हा रोग आल्यास सुरुवातीस पूर्ण क्षेत्रामध्ये एखाद्या झाडाचे पाने पिवळी दिसायला सुरुवात होते. आणि हेच प्रमाण वाढून सोयाबीनचे पूर्ण क्षेत्र पिवळे पडते.

येल्लो मोज्याक वायरसची लक्षणे

  • सुरुवातीला सोयाबीनची पानावर पिवळट डाग पडणे.
  • झाडाची पाने निस्तेज होणे आणि पिवळी झालेली पाने गळून पडणे.
  • झाडाच्या खोडावर पुरळ येणे.
  • रोगग्रस्त झाडे खुंटतात
  • संक्रमित बिया अंकुर वाढू शकत नाहीत किंवा ते रोगग्रस्त रोपे तयार करतात.

✅👉🏻 माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

Yellow Mosaic Virus Spreding/ पिवळा मोझॅक व्हायरसचा प्रसार

Yellow Mosaic Virus चा प्रसार हा साधरणतः पांढऱ्या माशी पासून होतो. व्हायरस ग्रस्त झाडावरून निरोगी झाडावर पांढरी माशी गेल्याने या रोगाचा प्रसार होतो. बाधित झाडांच्या पानावर व्हायरस चे विषाणू असतात, ते विषाणू पांढऱ्या माशीला चिकटून दुसऱ्या झाडावर जातात. या मुले निरोगी झाडांना हि सदरील व्हायरस ची लागण होते. त्याच बरोबर इतर उडणारे किटक हि या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात.

✅👉🏻 मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी करा अर्ज Online

Yellow Mosaic Virus/ पिवळा मोझॅक व्हायरसचे व्यवस्थापन

येल्लो मोझॅक वायरस ने बाधित झाडे आपल्या सोयाबीन वा इतर पिकांमध्ये दिसताच, त्या झाडांना त्या ठिकाणावरून उपटून त्यांना जाळून टाकावीत. आणि शेतात पांढऱ्या माशीचे प्रमाण वाढलेले दिसल्याच पांढरी माशी नियंत्रणासाठी लगेच फवारणी घ्यावी. पिवळा मोझॅक व्हायरस च्या नियंत्रणासाठी पूर्व नियोजन करणे हि फायद्याचे ठरते. विशेषतः बियाणांची निवड, व्हायरस प्रतिकारशक्ती असणारे वाण या गोष्टी करता येतात.

✅👉🏻 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024: 7.5 HP कृषी पंपांना मोफत वीज मिळणार

Yellow Mosaic Virus संक्रमण झाल्या नंतर व्यवस्थापन

निरोगी/प्रमाणित बियाणे वापरा. शेत तणमुक्त ठेवावे. संक्रमित झाडे काढून टाका आणि जाळून टाका  पिवळा मोझॅक व्हायरस नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 आणि 45 दिवसांनी थायामेथॉक्सम 25 डब्ल्यूजी @ 100 ग्रॅम/हेक्टर किंवा मिथाइल डेमेटॉन 800 मिली/हेक्टरच्या दोन पर्णासंबंधी फवारण्या कराव्यात. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य कीटक नाशक निवडून फवारणी करावी.

Conclusion

Yellow Mosaic Virus: सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण या blog मध्ये आपण महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या सोयाबीन आणि इतर डाळवर्गीय पिकांवर येणाऱ्या येल्लो मोझॅक वायरसच्या लक्षणे आणि नियंत्रणांविषयी सविस्तर माहिती पहिली. शेतकऱ्यांसाठी अत्यंत नुकसानदायक असणारे येल्लो मोझॅक वायरस हे पिकांसाठी घातक आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top