अतिवृष्टी नुकसान भरपाई: 2020-2022 थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर

महाराष्ट्रात 2020-2022 या वर्षात अतिवृष्टीने अनेक शेत पिंकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानभरपाई साठी पंचनामे करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या पिंकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. पण करोना काळात हे प्रस्ताव प्रलंबित राहिले होते, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासमन्धित शासन निर्णय 05/06/2023 रोजी घ्याण्यात आला होता. सदरील निर्णयाची अंमलबजावणी होऊ न शकल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने शेतकऱ्याचे प्रलंबित असलेल अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2020-2022 च्या अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नवीन निर्णया नुसार अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे. सदरील अतिवृष्टी नुकसान भरपाई 2020-2022 अनुदान वितरण करण्यास निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाचा GR पुढे दिला आहेअतिवृष्टी नुकसान भरपाई 2020-2022 थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर

2020-2022 थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर

शासनाच्या नवीन निर्णयानुसार 2020-2022 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी अनुदान उपलब्ध झाले आहे. 2020-2022 हा कोरोना काळ असल्यामुळे सदरील नुकसान भरपाई च्या प्रास्तावावर काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी शासनाला करता आली नाही. निधीच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा कोरोना च्या नियोजनात म्हणा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बाकी होती ती आता शासनाच्या नवीन निर्णया नुसार मिळणार आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय

सन 2020-2022 या कलावधीत झालेल्या अतिवृष्टी मुले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी रु. १०६६४.९४ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरील निधी DBT द्वारे सरळ बाधित शेतकऱ्याच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहे.

शेतीपिके व बहुवार्षिकपिके नुकसासाठी खालील प्रमाणे मदत केली जाणार आहे.

  • प्रचलित नियमानुसार शेतीपिके/ बहुवार्शिक फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ३३% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाईसाठी त्या-त्या कालावधीसाठी विहित दराने व विहित मर्यादेत अनुद्नेय राहील.
  • कृषी साह्यक, ग्रामशेवक व तलाठी यांच्या सहीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तहसीलदार यांनी विहित नमुन्यात संगणीकृत माहिती भरावी.
  • बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात सरळ रक्कम जमा करण्यात येणार आहे.
  • मदतीची रक्कम जमा करतांना कोणत्याही बँकेने  कोणत्याही प्रकारची वसुली सदरील रकमेतून करू नये.

अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाचा नवीन GR

अतिवृष्टी मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वर्ग करण्यासाठी शासनाने नवीन GR काढला आहे. 2020-2022 या वर्षातील बाधित शेतकऱ्यांना सदरील अनुदान वाटप करण्यात येणार आहे. शेती पिकांसाठी आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी शासनाने निकष ठरवलेले आहेत त्या निकषानुसार अनुदानाचे वाटप सरळ बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यांमध्ये होणार आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Conclusion

शासनाच्या नवीन निर्णयानुसार 2020-2022 अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई  देण्यात येणार आहे. या blog मध्ये आपण त्याविषयी माहिती पहिली आहे. शासनाच्या नवीन योजना आणि निर्णय पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top