अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme

आज वाढत्या कुटुंब संखे मुळे दिवसन-दिवस शेतीचे क्षेत्रफळ कमी-कमी होत चालेले आपल्याला दिसत आहे. वडील-आजोबांकडे असलेले क्षेत्र आज आपल्याकडे राहिले नाही त्याचे तुकडे-तुकडे होऊन अगदी कमी-कमी क्षेत्र वाट्याला येत आहे, आणि या क्षेत्रफळात कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविणे अगदी कठीण झाले आहे. बहुभूधारक शेतकरी आज अल्प-अत्यल्पभूधारक शेतकरी झाला आहे. अशा अत्यल्प-अल्पभूधारक शेतकर्यासाठी व त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे, जेणेकरून त्यांचे दरडोई उत्पन्न वाढेल आणि आर्थिक गरजा भागतील. आज आपण या लेखा मध्ये अल्पभूधारक शेतकरी योजना कोणत्या आहेत या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शासन कोणकोणत्या योजना राबविते त्या योजनांची पत्रात आणि निकष या बाबी आपण जाणून घेणार आहोत.अल्पभूधारक शेतकरी योजना

Table of Contents

अल्पभूधारक शेतकरी योजना

अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्याच्या नावे 1 हेक्टर पेक्षा जास्त पण 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन नाही अशा शेतकर्यांना अल्पभूधारक शेतकरी म्हणतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शासन वेगवेगळ्या विभागातून योजना राबविते जसे कि कृषी विभाग, पंचायत समिती विभाग, पशुसंवर्धन विभाग इत्यादी वेगवेगळ्या विभागातून शासन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निनिराळ्या योजना राबवीत असते. अल्प भूधारक शेतकऱ्याला अतिशय कमी जमीन क्षेत्रात, उत्पन्न काढून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे असते. त्यामुळे कमी जमिनीत हि चांगले उत्पन्न काढता यावे यासाठी शासन अल्पभूदारक शेतकऱ्याला शासकीय योजनेतून अनेक सदने उपलब्ध करून देत असते. 

अल्पभूधारक शेतकरी कोरडवाहू असेल तर शासन शेतकऱ्याला सिंचनाचे सधन निर्माण करून देते, त्याच बरोबर अल्प भूधारक शेतकऱ्याला शेती बरोबरच जोड धंद्यासाठी शासन मदत करते. शेतकऱ्याला शेती बरोबर शेती पूरक व्यवसाय करता यावा यासाठी शासन अनेक योजना राबवीत असते. शेती बरोबर दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन व्यवसाय असेल, कुक्कुट पालन व्यवसाय असेल, शेती बरोबर ट्रक्टर व्यवसाय असेल या सर्व व्यवसायासाठी शासन अनुदान देते. यातील काही योजना आपण खल पाहणार आहोत.

Mahadbt Portal मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना

महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार Mahadbt Portal मार्फत अल्पभूधारक शेतकर्यांसाठी विविध योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सिंचनाची साधने, फळबाग लागवड, शेती उपयोगी आधुनिक यंत्र सामुग्री, ट्रक्टरसाठी अनुदान, शेततळे, शुक्ष्म सिंचन साधने इत्यादी योजना या पोर्टलद्वारे राबविल्या जातात.

कृषी यांत्रिकीकरण योजना

अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती उपयोगी असलेली विविध यंत्र सामग्री उपलब्ध करून डेली जातात. कमी खर्चात अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करता यावी आणि उत्पादनात वाढ व्हावी हा या मागचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेतून खालील यंत्र सामुग्री शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात.

  • ट्रक्टर ( वेगवेगळ्या HP मध्ये निवड करू शकता. )
  • पावर टिलर/ पावर टिलर चलित औजारे .
  • बैल चलित यंत्र/ मनुष्य चलित यंत्र.
  • प्रक्रिया संच.
  • काढणी पश्चात तंत्रज्ञान.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून लाभ न घेता येणाऱ्या शेतकऱ्यांनसाठी कृषी विभागातून Mahadbt Portal मार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविली जाते. सदरील योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला फळबागसाठी अनुदान तीन टप्प्यात देण्यात येते. पहिल्या वर्षी पहिल्या टप्प्यात ५०% अनुदान फळबाग लागवडीसाठी दिले जाते. दुसऱ्यावर्षी दुसर्या टप्प्यात ३०% अनुदान दिले जाते तर तीस्र्यावर्षी २०% अनुदान दिले जाते. दुसर्या आणि तिसर्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला झाडाच्या एकूण प्रमाणाच्या जीवित ९०% प्रमाण ठेवणे आवश्यक असते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 👉भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

सिंचन साधने

जमिनीमध्ये कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी सिंचन साधने अत्यंत महत्वाची असतात. ज्याद्वारे तुमच्या पाण्याची बचत होते व कमी पाण्यात जास्त पिके काढता येतात.Mahadbt Portal मधून तुम्ही सिंचन साधने जसे कि ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन साधनांचा लाभ घेवू शकतात. या साधनांवर तुम्हाला शासनाकडून भरपूर अनुदान दिले जातात.

माघेल त्याला शेततळे

Mahadbt Portal मधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना माघेल त्याला शेततळे अंतर्गत शेततळ्यासाठी ५० हजार अनुदान व प्लास्टिक अस्तारीकरनासाठी 1 लाख पर्यंत अनुदान देते.

Mahadbt Portal मार्फत अल्पभूधारक शेतकर्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनान विषयी आदिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा👉MahaDBT Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी माहात्मा गांधी रोजगार हमी योजना

अल्पभूधारक शेतकरी योजना मध्ये शासन माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विविध लाभ शेतकर्यांना उपलब्ध करून देते. माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर योजना, फळबाग लागवड योजना, शेततळे योजना इत्यादी महत्वपूर्ण योजना राबविल्या जातात.

सिंचन विहीर योजना 

अल्पभूधारक शेतकरी योजना मध्ये शासन माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीला ओलिताखाली आणण्यासाठी शासन सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून देते. पूर्वी माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीसाठी मिळणारे अनुदान हे कमी होते मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार त्यात वाढ करून ४ लाख रुपये करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव तयार करून तुम्ही सदरील योजनेचा लाभ घेवू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ह अल्पभूधारक असायला पाहिजे. तुमच्या कडची जमीन ५ एकर पेक्षा जास्त नसावी. निधीवितरण अकुशल व कुशल अशा दोन टप्प्यात मिळतो.

अधिक माहितीसाठी👉महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना

अल्पभूधारक शेतकरी योजना माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो, तुम्ही किती क्षेत्रावर फळबाग लागवड करता त्या नुसार निधी उपलब्ध करून देण्यात येतो. निधीचे वितरण हर फळबाग लागवडीच्या टप्प्या टप्प्यावर जसे कि लागवड, देखभाल , फळ लागण्याचा टप्पा अश्या टप्प्यानुसार निधी दिला जातो. अकुशल आणि कुशल अशा दोन स्वरुपात निधी मिळतो.

अल्पभूधारक शेतकरी योजना -Mregs अंतर्गत शेततळे

अल्पभूधारक शेतकरी योजना ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनाचे साधन उपलब्ध नाही, किंवा उपलब्ध सदन पुरेसे नाही अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेततळ्यासाठी भरगोस अनुदान दिले जाते. शेततळे कितीबाय-कितीबाय चे घेता त्या नुसार निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याच सोबत प्लास्टिक अस्तरीकरनासाठी देखील निधी दिला जातो. ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव तयार करून सदरील योजनेचा लाभ घेता येतो. अकुशल आणि कुशल अशा दोन टप्यात निधी वितरीत केले जातो.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 

अल्पभूदारक शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोरडवाहू क्षेत्र असणाऱ्या आणि पाणी टंचाई असणाऱ्या गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला या प्रकल्प मध्ये समाविष्ठ गावांना विविध योजना राबविण्यात आल्या, त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहीर, सिंचन साधने, शेड नेट हाउस, नाला खोलीकरण, शेत तळे, शेत तळे अस्तरीकरण अशा योजनांन मधून कोरडवाहू शेतकऱ्यांना ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या योजना.

अल्पभूधारक शेतकरी योजना या मध्ये पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना राबविल्या जातात. ज्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला जोड धंद्याची जोड मिळावी म्हणून शासन पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाच्या योजना राबविते. सदरील योजनेसाठी ७/१२ जोडावी लागते.

  • शेली मेंढीचे गात वाटप.
  • १००० मसल कुकुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाह्य.
  • पशुपालकांना दुध डेअरी, शेळीपालन, पोल्ट्री फार्म या पैकी ज्या बाबीमध्ये अर्ज कार्याचा आहे ती सुविधा धेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी 👉 पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

Cunclusion

अल्पभूधारक शेतकरी योजना घेण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आम्ही सदरील blog मधून आपल्याला दिलेली आहे. या माहितीच्या आधारे आपण शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून लाभ घेवू शकता. अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या योजना आहेत. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, माहिती शेअर केल्याने एखाद्या गरीब गरजू व्यक्तीचा नक्कीच फायदा होईल. आमच्या blog ला subskrib करा bel बटनावर क्लिक करा.

Scroll to Top