ग्रामपंचायत निधी माहिती: ग्रामीण भागात ग्रामपंचायतला मिनी मंत्रालय म्हणतात अनेक विकास कामे ग्रामपंचायत च्या मध्येमातून होतात. शासन गावातील विकासासाठी निरनिराळ्या योजना राबवित असते. ग्रामपंचायतला येणार हक्काचा निधी म्हणजे वित्त आयोगाचा निधी, आज १५ वित्त अयोग महाराष्ट्रात लागू आहे. गावातील लोकसंख्येच्या संख्येनुसार गावाला १५ वय वित्त आयोगाचा निधी मिळतो. तसेच गावातील मागासवर्गीय लोकांच्या लोकसंख्येवर हि हा निधी अवलंबून असतो. मागासवर्गीय लोकसंख्या जास्त असल्यास निधी वाढून मिळतो. ग्रामपंचायत च्या कारभारात बऱ्याच वेळेस गावकऱ्यांना विश्वासात न घेता वित्त आयोगाचा निधी खर्च करील जातो. मग अशावेळेस आलेल्या निधीची माहिती कशी घ्यायची ते आपण जाणून घेणार आहोत. ग्रामपंचायत ला येणार निधी किती आहे, आणि तो कोणत्या कामासाठी राखीव आहे. हे कसा पाहायचं ते आपण पाहू.
ग्रामपंचायतला निधी किती येतो ?
ग्रामपंचायत ला येणार निधी हा त्या गावाच्या लोकसंख्येवर आधारित असतो. तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे, आणि त्यामध्ये मागासवर्गीय लोकांची लोकसंख्या किती आहे. या नुसार तुमच्या गावाला १५ वय वित्त आयोगातून निधी मिळतो. पूर्वी गावाच्या येणाऱ्या निधीची माहिती घ्यायची झाल्यास तालुका पंचायत समितीला खेटे मारावे लागत असे, पण आता मात्र तुम्ही घर बसल्या तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत ला येणार निधीची माहिती घेऊ शकता.
ग्रामपंचायत ला येणाऱ्या निधी बरोबरच तुम्ही गावात कोणत्या योजनेला किती निधी आला आणि तो त्याच कामाला खर्च झाला किंवा नाही हे पण माहित करून घेऊ शकता. ग्रामपंचायत स्तरावर १५ व्य वित्त आयोगाबरोबरच इतर विभागातून हि विकास कामासाठी निधी मिळतो. त्या विभागाकडे ग्रामपंचायत मार्फत तशी मागणी करावी लागते.
✅👉🏻MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना
ग्रामपंचायत निधी माहिती
गावातील ग्रामपंचायत ला येणारा निधी हा कोणत्या योजनेतून आला, आणि किती आला हे पाहण्यासाठी प्रथमतः आपल्याला शासनाच्या https://egramswaraj.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. e – ग्रामस्वराज हि वेबसाईट Open केल्या नंतर वेबसाईटच्या खाली Reports मध्ये तुम्हाला Planning या पर्यायाला क्लिक करावे लागेल.
Planning Report Dashboard म्हणून हे पेज Open होईल. त्यानंतर Planning या पर्यायाला क्लिक करायचे आहे. Planning ला टच केल्यानंतर खाली दिसणाऱ्या पर्याया मधून Approved Plan Wise Activity Details या वर क्लिक करा. त्या नंतर Select Plan Year- मध्ये वित्तीय वर्ष निवडायचे आहे. State- राज्य निवडायचे आहे. त्यानंतर तीन कलर मध्ये दिसणाऱ्या बॉक्स मधून तिसऱ्या पर्यायी बॉक्स ला क्लिक करायचे आहे. Village Panchayat Equivalent त्या नंतर येणाऱ्या टेबल मध्ये तुम्हाला तुमचा District Panchayat Equivalent आणि Block Panchayat & Equivalent मध्ये जिल्हा आणि तालुका असलेल्या लाईन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर Open होणाऱ्या टेबलवर Village Panchayat Equivalent तुमचे गाव निवडायचे आहे.त्या नंतर View ला क्लिक करा.
View ला टच केल्यावर तुमच्या समोर ग्रामपंचायतच्या सर्व योजना Open होतील. त्या Open होणाऱ्या योजनेला टच करून तुम्ही एक-एक योजनेची माहिती घेऊ शकता.
- Activity Details
- Fund Allocation
- Technical Approval Detials
- Admimistrative Approval Details
- Physical Praogress Details
- Expenditure Details
वरील पर्याय मधून पर्याय निवडून तुम्ही एक-एक योजनेची माहिती घेऊ शकता. ग्रापंचायत ला येणार निधी, योजनेचे नाव, योजनेला भेटलेली तांत्रिक मान्यता, झालेले काम इत्यादी गोष्टी तुम्हाला सरळ साईट वर पाहता येतात.
✅👉🏻 Annasaheb Patil Loan Apply Online: अण्णासाहेब पाटील ऑनलाईन कर्ज नोंदणी
Conclusion
ग्रामपंचायत निधी माहिती: जाणून घ्या ग्रामपंचायतला किती निधी येतो या लेखामध्ये आपण गावातील ग्रामपंचायतला कोणत्या कोणत्या योजनेला किती निधी येतो, आणि तो कसा खर्च होतो. या बद्दल माहिती पहिली. शासनाच्या e – ग्रामस्वराज या वेबसाईट वरून ग्रामपंचायत च्या विविध योजनांची आणि त्या योजनांना येणाऱ्या निधीची माहिती घेऊ शकतो. माहिती आवडली असल्यास शेअर करा.
🟢🔵🟣 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.