ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव – ग्रामीण भागात ग्रामपंचायत एक मिनी मंत्रालय म्हणून समजले जाते. सरपंच या मिनी मंत्रालयाचा प्रमुख असतो. आज शासनाचा जास्तीत जास्त भर ग्रामपंचायत विकास कामावर आहे. ग्रामपंचायत ला १५ वा वित्त आयोग लागू करण्यात आलेला आहे, शासन गावस्तरावरील विकास कामांना मुबलक फंड उपलब्ध करून देत आहे. पूर्वी सरपंच हा निवडून आलेल्या सदस्या मधून निवडला जायचा, पण आता सरपंच डायरेक्ट जनतेतून निवडला जात आहे. त्यामुळे सहाजिकच सरपंचाच्या अधिकारात वाढ करण्यात आलेली आहे. गावातील सर्वेसर्वा म्हणून सरपंचाकडे पहिले जाते. सरपंचाने ठरवले तर तो गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. आज आपण सरपंचाची पात्रता, आणि सरपंचावरील अविश्वास ठराव या बद्दल माहिती घेणार आहोत. ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव

सरपंच पदाविषयी माहिती

ग्रामपंचायत मध्ये प्रमुख घटक सरपंच असतो. पहिले सरपंच हा निवडून आलेल्या सद्स्यामधून निवडला जायचा, पण आता शासनाच्या नवीन नुसार सरपंच हा डायरेक्ट जनतेतून निवडला जात आहे. गावातील लोकसंखे नुसार शासन गावातील ग्रामपंचायत सदस्य संख्या ठरवीत असते. लोकसंख्या वाढली कि सदस्य संख्या वाढविली जाते. ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम

जनतेतून निवडून येणारा सरपंच हा ग्रामपंचायत स्तरावरील सर्व समित्याचा कायम अध्यक्ष असतो. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व निर्णय हे सरपंचाच्या अद्यक्षतेखाली घ्यावे लागतात. गावाचा प्रथम नागरिक या नात्याने सरपंच हा गावाचा सर्वेसर्वा असतो. गावातील अनेक विकासकामे सरपंचाच्या अधिपत्याखाली होतात.

ग्रामपंचायत माहितीसाठी शासनाच्या वेबसाईट ला भेट दया

सरपंच होण्यासाठी आवश्यक पात्रता

सरपंच होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता खालील प्रमाणे आहेत.

  • सरपंच पदासाठी निवडणूक लढवणारा व्यक्ती त्या गावाचा रहिवाशी असावा.
  • ज्या गावातून निवडणूक लढवायची आहे, त्या गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे.
  • सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय वर्ष २५ पूर्ण असावे.
  • १९९५ नंतर चा जन्म असेल तर कमीत कमी ७ पास असावे.
  • ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.

✅👉🏻 Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम

ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान होणारा व्यक्ती खालील खालील काही गोष्टीत आढळून आल्यास शासन निर्णया प्रमाणे तो सरपंच पदावरून अपात्र होतो.

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम :-

  1. सरपंच पदावर कार्यरत असतांना जर अस्पृश्यता कायदयानुसार किंवा दारूबंदीच्या कायद्यानुसार दोषी आढळल्यास किंवा या सारख्या इतर कायद्यात दोषी आढळल्यास तो सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरवला जातो.
  2. सरपंचपदी निवडून आलेल्या व्यक्तीचे वय वर्ष २५ पूर्ण होत नसतील ता तो सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरते.
  3. ज्या व्यक्तीला न्यायालयाने बुद्धिभ्रंश ठरवले ती व्यक्ती सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरते.
  4. ज्या व्यक्तीला शासकीय नोकरीत असतांना बडतर्फ करून ५ वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशी व्यक्ती सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरते.
  5. जी व्यक्ती पंचायतीचे एखादे लाभाचे पद भूषवित असेल अशी व्यक्ती सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरते.
  6. पंचायतीच्या आर्थिक कारभारात सरपंचाचा प्रत्येक्ष किंवा अप्रत्येक्ष हितसंबंध गुंतला असल्यास, ती व्यक्ती सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरते.
  7. जी व्यक्ती शासकीय शेवेतआहे, अशी व्यक्ती सरपंच पदावर राहण्यसास अपात्र ठरते.
  8. सरपंच पदावर असतांना तिसरे अपत्य जन्माला आल्यास ती व्यक्ती सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरते.
  9. सरपंच पदावर कार्यरत असतांना घरी स्वच्छालय नसल्यास सरपंच अपात्र ठरतो.
  10. ग्रामपंचायत कर थकबाकीदार असल्यास सरपंच पद अपात्र होते.
  11. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीचा खर्च नाही भरल्यास पद अपात्र होते.
  12. लगातार ६ महिने ग्रामपंचायतीच्या बेठकीला गैर हजर राहिल्यास सरपंच पद अपात्र होते.
  13. ग्रामपंचायत ग्रामसभा/मासिक बैठका न घेतल्यास पद अपात्र होते.
  14. नियमा प्रमाणे वार्षिक चार ग्रामसभा पैकी एक जरी ग्रामसभा घेण्यास कसूर केल्यास पात अपात्र होते.
  15. ग्रामपंचायत च्या मालमत्तेचा किंवा निधीचा अपव्यय केल्यास पद अपात्र होते.
  16. शासकीय जमिनीवर किंवा गायरान जमिनीवर किंवा गावठाण जमिनीवर ताबा केल्यास सरपंच पद अपात्र होते.
  17. ग्रामपंचायत देयक स्वतः च्या किंवा कुटुंब सदस्याच्या नावे घेतल्यास पद अपात्र होते.
  18. ग्रामपंचायत विकास कामात भ्रष्टाचार केल्यास कारवाई होऊन पद रिक्त होते.

✅👉🏻 रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार

सरपंच अविश्वास ठराव

ग्रामपंचायत सद्स्यामधून निवडल्या जाणाऱ्या सरपंचावर अविश्वास हा पूर्णतः ग्रामपंचायत सदस्य आणू शकत होते. सदस्यांनी अविश्वास आणून तो पास झाल्यास सरपंच अपात्र होत होता. सरपंचाच्या विरोधात एक तृतीयांश मतदान सदस्यांचे आवश्यक होते.

पण नवीन नियमानुसार जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल कण्याचे नियम वेगळे आहेत. पूर्वीच्या नियमानुसार ६ महिन्यात अविश्वास ठराव दाखल करता येत होता, त्या मुळे सारख्या येणाऱ्या अविश्वास ठरावा मुळे गावाच्या विकासकामाला खीळ बसत होती. त्यामुळे शासनाने नवीन नियमानुसार जनतेतील सरपंचावर अविश्वास आणण्याचा कालावधी वाढवून आता २ वर्ष करण्यात आलेला आहे. सरपंचाने पदभार स्वीकारल्या पासून पुढील दोन वर्ष सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करता येत नाही.

ग्रामपंचायत ने दोन वर्ष कालावधी पूर्ण केल्या नंतर अविश्वास ठराव दाखल करता येतो. अविश्वास धाखल करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या एक तृतीयांश संखेने अविश्वास प्रस्ताव तहसील कार्यालयाला दाखल करावा लागतो. प्रस्ताव दाखल केल्या नंतर तहसीलदार ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच आणि सदस्य यांची मिटिंग घेतात. तशी नोटीस सर्व ग्रामपंचायत पदाधिकार्यांना पाठवतात. मिटिंग च्या दिवशी अविश्वास ठराव पास झाल्यास तो प्रस्ताव नवीन नियम नुसार ग्रामसभा घेवून जनते समोर ठेवला जाते, आणि त्या प्रस्तावावर मतदान घेतले जाते. जर सरपंचाच्या विरोधातील मतदान त्याच्या बाजूने असणाऱ्या मतदाना पेक्षा जास्त असेल तर तहसीलदार सरपंचाचे पद रिक्त करून सरपंचाचा अतिरिक्त कारभार उपसरपंच कडे सोपवतात.

नवीन सरपंचाची निवडणूक हि पुन्हा जनतेतून घेतली जाते, नवीन सरपंच निवडणूक गावातील कोन्हाही व्येक्तीला लढवता येते. नवीन सरपंच निवडून येई पर्यंत ग्रामपंचायत चा कारभार उपसरपंच पाहतात.

अविश्वास ठराव ग्रामसभेत मतदानासाठी मांडल्यावर सरपंचाच्या बाजूने बहुमत झाल्यास तो अविश्वास ठराव रद्द ठरवला जातो. अविश्वास ठराव रद्द ठरविण्यात आल्यावर पुढील १ वर्ष परत नवीन अविश्वास ठराव सदस्यांना धाखल करता येत नाही.

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव च्या अधिक माहितीसाठी कायदे तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Conclusion

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव सदरील blog मध्ये आपण सरपंच अपात्रता नियम या बद्दल माहिती पाहिली. सरपंच हा गावातील विकास कामांचा दुवा आहे. शासनाकडून मनमानी कारभार करणाऱ्या सरपंचांना चाप बसावी यासाठी अनेक नियम व कायदे बनवण्यात आलेले आहेत. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

🟢🔵🟣  आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top