नरेगा जॉब कार्ड नंबर चेक ऑनलाईन लिस्ट, भारत सरकारने 2005 मध्ये ग्रामीण भागातील अकुशल कामगारासाठी एक कायदा बनवला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या कायद्या अंतर्गत ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे. MGNREGA अंतर्गत कामगारांना गावात 100 दिवस रोजगाराची हमी या कायद्यातून शासन देते. केंद्र सरकार या कायद्यान्वे ग्रामीण भागातील प्रत्यक प्रोढ व्यक्तीला 100 दिवसाच्या अकुशल कामाची हमी देते. काम मागणी करून जर 100 दिवस काम मिळाले नाही तर, बेरोजगार भत्ता शासनाकडून दिला जातो. या योजनेत पत्र होण्यासाठी तुमच्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे आवश्यक असते.
आजच्या लेखा मध्ये आपण जॉब कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे चेक करायचे त्याच बरोबर नवीन जॉब कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत.
नरेगा जॉब कार्ड नंबर काय आहे
केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी कायद्या अंतर्गत अकुशल कामगार म्हणून काम करण्यासाठी तुमच्या कडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. जॉब कार्ड म्हणजे MGNREGA योजने अंतर्गत अकुशल कामगार म्हणून तुम्हाला दिला गेलेला ऑनलाईन नंबर जो कि तुम्हाला MGNREGA site वर ऑनलाईन अर्ज केल्या नंतर मिळतो. पुस्तका सारखे दिसणारे हे जॉब कार्ड तुम्हाला रोजगार हमीच्या अनेक योजना आणि कामांना वापरता येते, त्यावर तुमच्या रोजगार शेवक आणि ग्रामशेवक ची सही असते. महाराष्ट्रातील जॉब कार्ड नंबरची सुरुवात MH ने होते त्या नंतर तुमचा ऑनलाईन नंबर असतो.
नरेगा जॉब कार्ड नंबर असा चेक करा
अकुशल कामगार म्हणून तुमची नोंदणी झाली असतांना तुमचे जॉब कार्ड जर हरवले असेल तर तुम्ही तुमचा जॉब कार्ड नंबर ऑनलाईन मिळवू शकता. त्या साठी तुम्हाला शासनाच्या https://nrega.nic.in या ऑनलाईन site वर जावे लागेल. या site वर गेल्या नंतर प्रथमतः तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे, त्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्या नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि शेवटी तुमचे गाव निवडून तुम्हाला पेज वर असणाऱ्या एकूण पर्याय पैकी Job Card/Employment Register या पर्याया वरती क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील सर्व लोकांची नरेगा जॉब कार्ड लिस्ट open होईल त्या मध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे.
महाराष्ट्रातील लाभार्त्यांनी नरेगा जॉब कार्ड नंबर चेक करण्यासाठी इथे क्लिक करा.
नरेगा जॉब कार्ड लिस्ट पहा
महात्मा गांधी रोजगार हमी कायद्या अंतर्गत, लाभार्थ्याला दिल्या जाणाऱ्या नरेगा जॉब कार्ड नंबर मिळवण्यासाठी ची ऑनलाईन पद्धत आपण वर पहिली त्या पाधातीने तुम्हाला तुमच्या गावाची नरेगा जॉब कार्ड नंबरची लिस्ट चेक करता येते. जॉब कार्ड नंबर नुसते MGNREGA योजने साठीच नाही तर इतर हि योजने मध्य शासन पुरावा म्हणून ग्राह्य धरीत आहे, त्य मुळे तुमच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. https://nrega.nic.in site वर जावून तुम्ही तुमचे नाव नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये आहे किंवा नाही हे चेक करू शकता. जर तुमचे नाव सदरील लिस्ट मध्ये नसेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून तुमचे जॉब कार्ड मिळवू शकता.
महात्मा गांधी रोजगार हमी कायद्या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्यक प्रोढ व्यक्तीला महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत जॉब कार्ड व अकुशल कामगार म्हणून काम माघनीचा अधिकार आहे.
महात्मा गांधी नवीन नरेगा जॉब कार्ड ऑनलाईन प्रोसेस
केंद्र सरकारने 2005 मध्ये निर्माण केलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक अकुशल कामगाराला शासनाला 100 दिवस काम मागण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शासन 100 दिवस काम उपलब्ध करून देवू शकले नाही तर अकुशल कामगाराला भत्ता देणे शासनाला बंधन कारक आहे. या योजनेतून गावातील सार्वजनिक कामा बरोबरच वयक्तिक लाभाच्या योजना हि राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे नरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. नरेगा जॉब कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत.
अधिकृत वेबसाईट वर जावून नोंदणी करा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीला करू शकतात. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रोजगारशेवक कडून तुम्हाला जॉब कार्ड मिळून जाईल. ऑनलाईन अर्ज करतांना तुम्हाला सर्व प्रथम MGNREGA च्या ओफिशियल वेबसाईट वर जावे लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम UMANG वेबसाईट वर जावून तुमच्या मोबाईल नंबर द्वारे OTP घेवून LOGIN करावे लागेल, लॉगीन केल्या नंतर SEARCH BOX मध्ये MGNREGA टाकून सर्च करा, त्यानंतर तुमच्या समोर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अधिकृत वेबसाईट दिसेल त्या वेबसाईट ला क्लिक केल्यावर site OPEN होईल. वेबसाईट open झाल्यावर तुम्हाला 4 पर्याय दिसतील. 1. Applay For Job Card 2. Download Job Card 3. Track Job Card Status 4. FAQs/Circulars या पर्याय पैकी 1 नंबर च्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही नवीन जॉब कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
नवीन जॉब कार्ड नोंदणीसाठी तुम्हाला खलील कागदपत्रांची आवश्यकता असते.
- लाभार्थी कुटुंब प्रमुख असल्यास त्याचे आधार कार्ड.
- कुटुंबातील सर्व प्रोढ सदस्यांचे आधार कार्ड.
- कुटुंब परानुखाचे बँक पासबुक.
- कुटुंब सदस्यांचे बँक पासबुक.
- कुटुंबाचे रेशन कार्ड.
इत्यादी कागदपत्रें नरेगा जॉब कार्ड च्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जसाठी लागतात.
Conclusion
नरेगा जॉब कार्ड नंबर ऑनलाईन लिस्टमध्ये चेक करा या लेखामध्ये आपण नरेगा जॉब कार्ड नंबर ऑनलाईन कसा काढायचा या बद्दल पूर्ण माहिती पहिली आहे. या लेखाद्वारे तुम्ही तुमचे नरेगा जॉब कार्ड नंबर ऑनलाईन लिस्ट मध्ये चेक करू शकता, त्या सोबतच नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.