पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना या योजनेतून घरकुलसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाते. शासनाकडून बेघरांना घर देण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात, पण यादीत नाव असून ही स्वतःची जागा नसल्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. विशेषतः केंद्र शासनाकडून पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून बेघर असल्याल्यांना घर देण्यासाठी अतिशय वेगाने आमल बजावणी चालू आहे. त्याच बरोबर इतर योजनेतून हि बेघर असलेल्या लोकांना घर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रमाई आवास घरकुल योजना, शबरी आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि पंतप्रधान आवास घरकुल योजना इत्यादि योजनेतून बेघरांना घर शासन देते.

पण घराची आवश्यकता असतांना आणि वरील घरकुल यादीत नाव असतांना ही केवळ स्वतःची जागा विकत घेण्याची कुवत नसल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. यासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य हि योजना सुरु केली आहे.पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना 

प्रत्येक बेघर व्यक्तीला स्वतःच घर असावे, अशा उद्देशाने शासन वेगवेगळ्या घरकुल योजना राबवित असते. सर्वांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजना असेल किंवा मागासवर्गीयांसाठी राबविल्या जाणाऱ्या इतर योजना असतील. या योजनांमधून शासन बेघरांना घर देण्यासाठी कटीबद्ध आहे. घरकुल बांधणीसाठी कमीत कमी 500 चौरस मीटर सहान जागेची आवश्यकता असते. पण बऱ्याच लाभार्थ्यान कडे कधी कधी स्वतःची जागा उपलब्ध नसते, त्यांची परिस्थिती नसते कि ते स्वतः जागा विकत घेवू शकतील. अशा लाभार्थ्यांना शासन पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना या योजनेतून घरकुलसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाते. जागा विकत घेण्यासाठी अर्थसाह्य केले जाते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेतून देण्यात येणारा लाभ

बेघर भूमिहीन घरकुल यादीत पात्र असणार्या  लाभार्थ्यांना या योजनेतून घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते, घरकुल योजनेत पात्र असलेले पण बांधकामासाठी स्वतःची जागा नसलेले भूमिहीन लाभार्थी यांना या योजनेचा लाभ दिला जातो, पूर्वी या योजनेतून 50 हजाराची मदत केली जात हिती पण शासनाच्या नवीन बेठकी मध्ये हि रक्कम वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. घरकुल बांधणीसाठी लागणारी 500 चौरस मीटर सहान जागा खरेदी करण्यासाठी सदरील रक्कम भूमिहीन घरकुल लाभार्थ्याला दिली जाणार आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेसाठी कुठे करायचा अर्ज 

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी रीतसर प्रस्ताव तयार करावा लागतो. सदर प्रस्ताव तयार करण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावून तुम्हाला सरपंच/ग्रामाशेवक यांच्या मार्फत कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यांची जुळवा जुळव करून सदरील प्रस्ताव पंचायत समिती मध्ये दाखल करावा लागतो. प्रस्ताव मंजुरी नंतर प्रस्तावित रक्कन तुमच्या खात्यावर जमा होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 

  1. घरकुल मंजूर यादीत तुमचे नाव असावे.
  2. ग्रामपंचायत नमुना न.8 मध्ये तुमच्या नावे नोंद नसावी.
  3. तुमच्या नावे कुठेही जमिनीची नोंद नसावी.
  4. आधार कार्ड.
  5. बँक पासबुक.
  6. रेशन कार्ड.
  7. पासपोर्ट साईज फोटो.

इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

Conclusion

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना या blog मध्ये आम्ही तुम्हाला शासनामार्फत बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठी जागा घेण्यासाठी अर्थसाह्य केले जाते त्या विषयी माहिती दिली आहे आवडली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजूंना शेअर करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top