बांधकाम कामगार यादी: अशी चेक करा बांधकाम कामगार यादी

बांधकाम कामगार यादी :- बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्याला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून विविध योजेतून लाभ दिला जातो. कामगाराची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी शासन अनेक योजना राबवीत असते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचे लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते. तुम्ही नोंदणीकृत कामगार असाल आणि तुमच्या कडे मंडळाचे 14 अंकी नंबर असलेले कार्ड असेल तर तुम्ही कामगार योजनांचा लाभ घेवू शकतात. नोंदणी कलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ भेटला असेल, आणि त्याने रिनीव केले नसेल तर पुढील लाभ मिळत नाही. आपण नोंदणीकृत बांधकाम कामगाराची यादी कुठे व कशी पहायची ते पाहणार आहोत. त्यासाठी कोणती वेबसाईट open करावी लागते ते पाहू.बांधकाम कामगार यादी अशी चेक करा बांधकाम कामगार यादी

नोंदणीकृत बांधकाम कामगार

शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडे ज्यांची अध्कृत नोंदणी आहे, अशा लाभार्थ्यांना नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणता येयील. कामगार मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाकडे online नोंदणी करावी लागते. आणि नोंदणी दर 12 महिन्याला रिणीव करावी लागते.

नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी मंडळ अनेक फायद्याच्या योजना राबविते. शेक्षणिक योजना, आर्थिक योजना, सामजिक योजना. आरोग्य विषयीच्या योजना अशा विविध योजना राबविल्या जातात.

✅👉🏻 www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

बांधकाम कामगार यादी: अशी चेक करा बांधकाम कामगार यादी

लाभार्थी हा बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असेल तर mahabocw.in या वेबसाईट वर जावून प्रोफाईल लॉगीन करून आपली नोंदणी Active आहे का नाही हे चेक करू शकतो. त्यासाठी तुम्हाला वेबसाईट वर जावून Construction Worker:Profile Login या पर्यायाला निवडून तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्या नंतर आलेला otp खालील रकान्यात टाकून त्या खालील बटनावर क्लिक करायचे आहे, तुमची प्रोफाईल open होईल.

बांधकाम कामगार यादी

बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून नोंदणीकृत कामगार लाभार्थ्याला अनेक लाभ दिले जातात. कामगार यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कामगार मंडळाच्या mahabocw.in या वेबसाईट वर जावे लागेल, वेबसाईट open होताच मुख्ये पृष्ठावर वरच्या बाजूस तुम्हाला लाभ वितरीत म्हणून पर्याय दिसेल, या पर्याया मध्ये तुम्हाला महामंडळाकडून दिल्या गेलेल्या लाभाची यादी तुम्हाला दिसेल. या यादी मधील वितरीत झालेले एक लाभ निवडून त्यावर क्लिक केल्यास व रकान्यातील माहिती भरल्यास जसे कि, Period- या मध्ये तुम्हाला महिना आणि वर्ष निवडायचे आहे. Select District- या मध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे. Select Taluka- या मध्ये तुमचा तालुका निवडायचा आहे. हे रकाने पूर्ण भरल्या नंतर तुमच्या समोर तुमच्या तालुक्याची यादी Open होईल.बांधकाम कामगार यादी

विविध योजनांच्या लाभाचे वितरण (22/11/2023 पर्यंत) या पर्यायाला निवडून त्या खालील रकान्यात Select District– या मध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे, Beneficiary Name– या मध्ये तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे, Account Number– या मध्ये तुम्हाला तुमचा खाते नंबर टाकायचा आहे, IFSC Code- मध्ये बँकेचा code टाकायचा आहे, त्या नंतर Search या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे कि नाही हे चेक करू शकता.

✅👉🏻 बांधकाम कामगार योजना फायदे

बांधकाम कामगार: ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण असे करा

बांधकाम कामगार यादी मध्ये तुमचे नाव नसल्यास तुम्हाला ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण करावे लागेल. ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण कसे करायचे ते आपण पाहू.

सर्वप्रथम तुम्हाला कामगार मंडळाच्या mahabocw.in या वेबसाईट वर जावे लागेल. वेबसाईट वर गेल्या नंतर Construction Worker Online Renewal हे पर्याय निवडावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि रजिस्टर 14 अंकी नोंदणी नंबर टाकावा लागेल. त्या नंतर आलेल्या OTP ला टाकून Open झालेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत  असताना तुम्ही बांधकाम कामगार आहात म्हणून तुमच्याकडे 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ज्या गुत्तेदाराकडे बांधकाम कामगार म्हणून काम केले त्या गुत्तेदाराकडून घ्यावे लागेल. या प्रमाणपत्रावर तुमच्या ग्रामपंचायत/ नगर पंचायत/ नगर पालिका मधील ग्रामशेवक किंवा तत्सम अधिकाऱ्याची सही आणि जावक दिनांक असणे आवश्यक आहे.सदरील प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

वरील प्रमाणपत्र बरोबर तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

✅👉🏻  बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Conclusion

बांधकाम कामगार यादी: अशी चेक करा बांधकाम कामगार यादी या लेखामध्ये आपण आपण बांधकाम कामगार यादी कशी बघायची या बद्दल सविस्तर माहिती पहिली. महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवीत असते. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top