बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड/Construction Worker Smart Card

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड हे महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यान मंडळ यांच्याकडून बांधकाम कामगारांना दिले जाते. असंघटीत बांधकाम कामगारांनाच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी शासनाचे महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यान मंडळ काम करते. कामगारांच्या सामाजिक, आर्थिक, शेक्षनीक सुरक्षेसाठी मंडळामार्फत वेगवेगळ्या स्तरावर अनेक योजना तयार केल्या जातात. या योजनांमधून कामगारांना त्यांच्या सुरक्षेची हमी मंडळामार्फत दिली जाते. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाल्यावर या सर्व योजनाचा लाभ घेता येतो. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी ची प्रोसेस शासनाने आता Online केली आहे. शासनाच्या महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यान मंडळ च्या पोर्टल वर जावून तुम्ही तुमची कामगार म्हणून नोंदणी करू शकतात. नोंदणी झाल्या नंतर शासन तुम्हाला स्मार्ट कार्ड देते, ज्या द्वारे तुम्ही मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेवू शकतात.

आज आपण बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड काय आहे, बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे असते ते कुठून आणि कधी मिळते या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड/Construction Worker Smart Card

आज आपण आपल्याकडे असणारे विविध कार्ड जसे कि इलेक्शन कार्ड, A.T.M. कार्ड, क्रेडीट कार्ड हे सर्व वापरतो त्याच प्रमाणे कामगार मंडळामार्फत बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड हे बांधकाम कामगारांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पूर्वी बांधकाम मंडळामार्फत कामगाराची नोंदणी झाल्यावर एक पुस्तक दिल्या जायचं ज्यात तुमची कामगार म्हणून पूर्ण माहिती भरलेली असायची, पण कागदी पुसक असल्यामुळे बर्याच वेळेस वापरायला अडचणी यायच्या आता मात्र कामगार मंडळ तुम्हाला स्मार्ट कार्ड देत असल्यमुळे ते तुम्ही तुमच्या खिशात, किंवा पाकिटात इतर कार्डा प्रमाणे ठेवू शकता.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड काय आहे

बांधकाम कामगारांना Online नोंदणी झाल्या नंतर पूर्वीच्या पुस्तका एवजी तुम्हाला कामगार मंडळाकडून स्मार्ट कार्ड दिले जाते. त्यालाच आपण बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड म्हणतो,त्यात तुमच्या पुढील नोंदी असतात.बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड/Construction Worker Smart Card

  • नोंदणी क्रमांक :- तुमचा 12 अंकी नोंदणी क्रमांक.
  • नाव :-तुमचे नाव.
  • लिंग :- तुमचे लिंग ( स्त्री/पुरुष ).
  • जन्मतारीख :- तुमची जन्मतारीख.
  • भ्रमणध्वनी क्रमांक :- Online करतांना दिलागेलेला तुमचा मोबाईल नंबर.
  • कामाचा प्रकार :- जे काम तुम्ही करताय किंवा जय कामाची नोंध तुम्ही कामगार म्हणून मंडळाकडे केली आहे त्या कमचे नाव.
  • नोंदणीचे ठिकाण :- जिथे तुम्ही नोंदणी कर्ली आहे ते तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्याचे ठिकाण.
  • नोंदणी तारीख :- तुम्ही नोंदणी करताना तुमच्या फॉम वरील नोंदणीची तारीख.
  • उजव्या बाजूला तुमचा फोटो असतो.

इत्यादी नोंदी तुमच्या बांधकाम कामगार स्मार्ट कार्डवर असतात. त्याच बरोबर एक बारकोड हि असतो ज्यात तुमची माहिती असते. कामगार मंडळाच्या विविध योजनासाठी या कार्डची तुम्हाला नेहमी आवश्यकता असते.

👉रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी /Ration Card New Name Registration Process

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे असते

 स्मार्ट कार्ड साधारणतः तुमच्या A.T.M. कार्ड सारखे असते त्यावर कामगार म्हणून आवश्यक असलेली तुमची पूर्ण माहिती व त्या सोबतच तुय्मचा 12 अंकी नोंदणी क्रमांक असतो.बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड

बांधकाम कामगाराच्या विविध योजनानसाठी या कार्डचा उपयोग होतो. आणि जवळ ठेवायला अतिशय सोपे आहे. आपल्या A.T.M. कार्ड आणि इतर कार्ड सोबत आपण ठेवू शकतो.

👉जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कोठून व कसे मिळते

स्मार्ट कार्ड हे तुम्ही महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यान मंडळ च्या पोर्टल वर Online फॉम भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्या नंतर मिळते. बांधकाम कामगार महामंडळाच्या पोर्टलवर फॉम भरल्यानंतर तुमचा 12 नोंदणी क्रमांक तुम्हाला sms द्वारे प्राप्त होतो, आणि त्या नंतर महामंडळाच्या कार्यालयाकडून तुमचे कार्ड तयार होऊन आल्यावर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल वर फोन करून कळविले जाते, फोन आल्यावर तुम्हाला तुमच्या जिल्हा कामगार कार्यालयावर जावून कार्ड आणावे लागते. त्यसाठी Online पावती व आधार कार्ड झेरोक्स सोबत न्यावे लागते अशा पद्धतीने तुमचे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड तुम्हाला मिळते.

Conclusion

वरील blog मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे तुमचे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड तुमच्या पर्यंत येते.बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला तुमचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळू शकते. एकदा बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळाले कि त्याचा फायदा बांधकाम कामगार मंडळाकडून मिळणाऱ्या योजनांसाठी होतो. माहिती आवडली असल्यास शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेज फोलो करा bel बटनावर क्लिक करा. व आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top