महाराष्ट्र कामगार नोंदणी: कामगार नोंदणी करा मोबाईल वरून

महाराष्ट्र कामगार नोंदणी: कामगार नोंदणी करा मोबाईल वरून;- महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारे असंघटित कामगार हे बांधकाम क्षेत्रात आढळतात. बांधकाम कामगारांना स्वतःचे पोट भरण्यासाठी कामाच्या शोधात अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागते. एका ठिकाणी वास्तव्यास राहून बांधकाम कामगारांचे भागात नाही. पहिल्या ठिकाणचे काम पूर्ण होताच नवीन ठिकाण शोधावे लागते. अशा सतत कामाच्या शोधात फिरत राहणाऱ्या कामगारांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात अली. या मंडाळाकडून बांधकाम कामगाराच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न केले जातात. कामगार हिताच्या अनेक योजना या कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबविल्या जातात. आज आपण महाराष्ट्र्र कामगार नोंदणी कशी करायची या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.महाराष्ट्र कामगार नोंदणी: कामगार नोंदणी करा मोबाईल वरून

महाराष्ट्र कामगार योजना

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आढळणारा असंघटित कामगार वर्ग म्हणजे बांधकाम कामगार, विखुरलेल्या अवस्थेत असणारा हा कामगार वर्ग सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबी मध्ये मागासलेला आहे. कामाच्या शोधात सतत स्थलांतर करत असल्यामुळे अनेक सोयी सुविधेपासून वंचित असतो. अशा असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत या असंघटित बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केली जातात.

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महामंडळाकडून त्यांच्या उन्नत्तीसाठी अनेक सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक योजना राबविल्या जातात. ज्यातून बांधकाम कामगारांना त्यांच्या सुरक्षेतेची हमी दिली जाते.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

कल्याणकारी योजना

A ) सामाजिक योजना

 1. नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,००० मदत
 2. मध्यान्न भोजन योजना
 3. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
 4. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
 5. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
 6. पूर्व शिक्षण ओळख योजना

B ) शैक्षणिक योजना

 1. इयत्ता १ ली ते ७ वि विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रतिवर्षी रु. २,५००
 2. इयत्ता ८ वि ते १० वि च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. ५,००० शिष्यवृत्ती
 3. इयत्ता १० वि ते १२ वि मध्ये किमान ५०% किंवा अधिक गन प्राप्त झाल्यास रु. १०,००० शिष्यवृत्ती
 4. इयत्ता ११ वि व १२ वि च्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. १०,००० शिष्यवृत्ती
 5. पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु.२०,००० शिष्यवृत्ती कामगाराच्या पत्नीसह लागू
 6. वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रु. १ लाख शिष्यवृत्ती
 7. अभियांत्रिकी पदवी करिता प्रातिवर्षी रु. ६०,००० शिष्यवृत्ती, कामगाराच्या पत्नीसह लागू
 8. शासनाच्या पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु. २०,००० शिष्यवृत्ती
 9. शासनमान्य पदव्यत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु. २५,००० शिष्यवृत्ती
 10. नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती

C ) आरोग्य विषयक योजना

 1. नेसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,००० मदत
 2. शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,००० ( दोन अपत्यासाठी )
 3. गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु. १ लाख कामगाराच्या कुटुंबियांसाठी मदत
 4. एका मुलीच्या जन्म नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षा पर्यंत रु. १ लाख मदत ठेव
 5. कायमचे अपंगत्व आल्यास रु. २ लाख मदत
 6. महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना
 7. आरोग्य तपासणी करणे

D ) आर्थिक योजना

 1. कामगाराचा कामावर असतांना मृत्यू झाल्यास रु. ५ लाख त्याच्या कायदेशीर वारसास मदत
 2. कामगाराचा नेसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २ लाख त्याच्या कायदेशीर वारसास मदत
 3. अटल बांधकाम कामगार दिवस योजना ( शहरी भागासाठी २ लाख रुपये )
 4.  अटल बांधकाम कामगार दिवस योजना ( ग्रामीण भागासाठी २ लाख रुपये )
 5. कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी रु. १०,००० मदत ( वय ५० ते ६० वर्ष )
 6. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा विधुर पतीस रु. २४,००० ५ वर्ष करिता मदत
 7. गृह कर्जावरील रु. ६ लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रु. २ लाख परतावा

✅👉🏻 Education Portal: SWAYAM Free Online Education, इयत्ता 9 वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व अभ्यासक्रम तुम्हाला कधीही, कुठेही प्रवेश करता येतो

महाराष्ट्र कामगार नोंदणी

बांधकाम कामगाराच्या विविध योजनेचा लाभ घेण्यसाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधीकृत वेबसाईटवर जाऊन तुमची महाराष्ट्र कामगार नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर तुम्ही कामगार मंडळाच्या अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता.

बांधकाम कामगार: नोंदणी

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या https://mahabocw.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला खाली दिसणाऱ्या पर्यायांमधून बांधकाम कामगार: नोंदणी-Construction Worker:Registration या पर्यायाला क्लिक करायचे आहे.

बांधकाम कामगार: नोंदणी-Construction Worker:Registration या पर्यायाला क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला तुमचे VFC ठिकाण म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्या खालील रकान्यात तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि शेवटच्या रकान्यात तुम्हाला तुमचा नेहमी वापरात असणारा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे रकाने पूर्ण केल्या नंतर शेवटी दिसणाऱ्या SUBMIT ला क्लिक करायचे आहे, त्या नंतर तुमचं समोर नवीन फॉर्म OPEN होईल.

OPEN झालेल्या नवीन फॉर्मवर तुमाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुमचे नाव आणि तुमचे आधार नंबर त्या फॉर्म वर आधीपासून असेल, बाकीची माहिती तुम्हाला त्या फॉर्मवर भरायची आहे. जसे कि तुमचे कामाचे ठिकाण, तुम्ही काम करत असलेल्या विकासकाची आणि ग्रामपंचायतीची माहिती, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, त्यांचे शिक्षण आधार नंबर इत्यादी माहिती तुम्हाला भरायची आहे.

वैयक्तिक माहिती भरल्या नंतर तुम्हाला फॉर्म च्या शेवटी तुमचे कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्या मध्ये तुमचे आधार कार्ड, तुमचा पासपोर्ट आईज फोटो, तुम्ही ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागद पात्रांची मूळ प्रत तुम्हाला वेबसाईटवर विचारलेल्या ठिकाणी अपलोड करायची आहे.

महाराष्ट्र कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागतात.

 • बांधकाम कामगारांचे आधार कार्ड
 • कामगाराच्या सर्व कुटुंबाच्या सदस्यांचे आधार कार्ड
 • कामगाराचा पासपोर्ट साईज फोटो
 • कामगाराने ९० बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र

✅👉🏻 Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती अशी तपासा

कामगार नोंदणी करा मोबाईल वरून

महाराष्ट्र्र कामगार नोंदणी तुम्ही मोबाईल च्या साह्याने हि करू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये क्रोम ब्राऊजर वर जाऊन https://mahabocw.in सदरील लिंक टाईप करायची आहे. हि वेबसाईट ओपन झाल्यावर वरती दिलेल्या माहिती प्रमाणे तुमची माहिती भरून, आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून तुम्ही तुमची बांधकाम कामगार नोंदणी करू शकता.

आवश्यक असलेल्या कागदपत्रांची pdf मोबाईल मध्ये शेव करून तुम्ही नंतर ते अपलोड करू शकता. PC/ लॅपटॉप वर जशी नोंदणी केली जाते तशीच नोंदणी तुम्ही मोबाईलवरून करू शकता.

महाराष्ट्र कामगार नोंदणी प्रोसेस हि ऑनलाईनच करता येते. ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर तुम्हाला नोंदणी पूर्ण होण्यासाठी जवळ जवळ २ महिने लागू शकतात. मंडळाकडून तुमच्या ऑनलाईन फॉर्म ची माहिती टप्या टप्याने SMS द्वारे तुम्हाला दिली जाते. आणि शेवटी प्रोसेस पूर्ण झाल्यावर मंडळाची फीस भरण्यासाठी एक लिंक पाठविली जाते त्यावर जाऊन मंडळाची फीस तुम्हाला मोबाईल ऍप्प द्वारे भरता येते. फीस भरल्या नंतर तुम्हाला कामगार मंडळाकडून १२ अंकी नोंदणी क्रमानं दिला जातो ज्याद्वारे तुम्ही कामगार मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.

Conclusion

महाराष्ट्र कामगार नोंदणी: कामगार नोंदणी करा मोबाईल वरून या लेखामध्ये आपण महाराष्ट्र्र कामगार नोंदणी कशी करायची या बद्दल सविस्तर माहिती पहिली. हि नोंदणी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे हि करू शकता. महाराष्ट्र्र शासनाच्या कामगार मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कामगार मंडळाकडे असणे आवश्यक आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्य सामील होण्यासाठी क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top