मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 – नवीन अर्ज, लाभ आणि कागदपत्रे

अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना याच योजनांच्या धर्तीवर शासनाने नवीन मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 सुरु केली आहे. ज्या शेतकर्‍यांना आटा पर्यंत सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळाला नाही अशे सर्व शेतकरी या योजने अंतर्गत अर्ज करू शकणार आहेत. पहिल्या योजनांना एक ठराविक कोटा देण्यात आलेला होता त्यामुळे, बऱ्याच शेतकर्‍यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता आला नाही. परंतु आता शासनाने नवीन योजना मागेल त्याला सौर कृषी पंप अंतर्गत अर्ज करणाऱ्या प्रत्येक शेतकर्‍याला सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. आज आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 या नवीन योजने बद्दल जाणून घेणार आहोत.सौर कृषी पंप योजना 2024

सौर कृषी पंप योजना

शेतकर्‍यांना सिंचनाचे साधन उपलब्ध असताना केवळ वीज जोडणी नसल्यामुळे आपले आपल्या जमिनीचे क्षेत्र ओलिता  खाली आणण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे. अशा शेतकर्‍यांसाठी शासनाने सौर कृषी पंप योजना सुरु केलेली आहे.

अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या तिन्ही योजनांमधून बऱ्याच शेतकर्‍यांनी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे, परंतु या योजनेतून सौर कृषी पंप वाटपाला काही मर्यादा होत्या, त्यामुळे अर्ज करणाऱ्या सगळ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ भेटत नव्हता. वेबसाईटवर नवीन अर्ज चालू होताच अगदी काही दिवसात योजनेचा कोटा पूर्ण व्हायचा त्यामुळे बरेच शेतकरी सौर कृषी पंप योजनेपासून वंचित राहत असत. पण आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 अंतर्गत अर्ज करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेतून सौर कृषी पंपाचा लाभ मिळणार आहे.

✅👉🏻 Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज

योजनेची वैशिष्ट्ये:

  1. शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचन सुविधेसाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना.
  2. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संचाचा लाभ.
  3. अनुसूचित जाती – जमातींच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के.
  4. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान.
  5. जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप उपलब्ध करून देणार.
  6. शेतकऱ्यांना मिळालेल्या सौर कृषी पंप याची पाच वर्षांची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्स.
  7. वीजबिल नाही आणि लोडशेडिंगची चिंता नाही.
  8. सिंचनासाठी सौर कृषी पम्पा मार्फत दिवसा वीज पुरवठा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 अंतर्गत दिला जाणारा लाभ

  • २.५ एकरापर्यंत शेतजमीन असणार्‍या  शेतकऱ्यास ३ अश्व शक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप.
  • २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास ५ अश्व शक्ती क्षमतेचे सौर कृषीपंप.
  • ५ एकरावरील शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास ७.५ अश्व शक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील.
  • तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.

✅👉🏻 PM Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदी करा अर्ध्या किमतीत,शासन देतंय भरघोस सब्सिडीवर

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा

सौर कृषीपंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 https://www.mahadiscom.in या पोर्टल वर जावे लागेल.

  • पोर्टल वरती आल्यावर मेनू बार मध्ये दिसणार्‍या लाभार्थी सुविधा या पर्यायावर जावे लागेल.
  • लाभार्थी सुविधा या पर्यायांमधून अर्ज करा या पर्यायाला क्लिक करा.
  • अर्ज करा वर गेल्या नंतर तुमच्या समोर पारेषण विरहित सौर कृषि पंप ऑनलाइन अर्ज (नमुना-ए१) हा फॉर्म ओपन होईल. या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरायची आहे. त्यामध्ये ग्राहक तपशील,  वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील,रहिवाशी पत्ता व ठिकाण, जलस्तोत्र आणि सिंचन माहिती, कृषी तपशील, विद्यमान पंप तपशील, आवश्यक पंप तपशील, बँक तपशील इत्यादी माहिती भरून घोषणा पत्रावर टिक मार्क करायचे आहे.
  • फॉर्म पूर्ण भरल्यावर शेवटी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे आहे.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता भासेल.

  1. १. ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) सातबारा उतार्‍यावर एकापेक्षा जास्त नावे ( सामायिक क्षेत्र ) असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे.
  2. शेतकऱ्याचे आधार कार्ड.
  3. शेतकऱ्याचे बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक.
  4. शेतकऱ्याचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
  5. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला.
  6. शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
  7. शेतकरी मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास अनुसुचित जाती/जमातीचे प्रमाणपत्र.

वरील कागदपत्रे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 योजनेसाठी अर्ज करतांना आवश्यक आहेत.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

Conclusion

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 – नवीन अर्ज, लाभ आणि कागदपत्रे या लेखात आपण शासनाने नवीन सुरु केलेल्या सौर कृषी पंप योजने विषयी सविस्तर माहिती पाहिली. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरु असून, अर्ज कसा करायचा आणि लागणारी कागदपत्रे कोणती आहेत या विषयी स्टेप बाय स्टेप माहिती सदरील लेखात आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top