माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या योजनेसाठी कागदपत्रांची लगबग दिसते. राज्यातील महिलांना राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५,०० रुपये देण्याचे ठरले आहे. मध्यप्रदेश सरकारकडून चालू असलेल्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहात मदत व्हावी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पाल्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे या उद्देशाने शासनाने सदरील योजना सुरु केली आहे. सुरुवातीला Ofline असलेली योजना आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन करता येणार आहे. सुरुवातीच्या नियमामध्ये आणि कागदपत्रांमद्ये बदल करण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

राज्यशासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण योजना हि राज्यातील महिलासाठी सुरु करण्यात आलेली आहे. महिलांना दरमहा १५,०० रुपये या योजनेतून त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये टाकले जाणार आहेत. तसेच या योजनेतून महिलांना वर्षातून ३ गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. वयवर्षे २१ ते ६५ असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजना जाहीर झाल्यापासून कागदपत्रांसाठी महिलांच्या रांगा लागलेल्या आपण पाहत होतो, पण आता मात्र शासनाकडून जुन्या निकष आणि नियमात बदल करून योजना आणखीन सुलभ करण्यात आलेली आहे.

माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

राज्य शासनाने योजनेच्या सुरुवातीला Ofline अर्ज करण्याचे सांगितले होते, पण आता मात्र तुम्हाला ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर अर्ज करू शकता. माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही शितू सुविधा केंद्रावर रांग लावून उभे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून या योजनेसाठी अर्ज करू शकता.

✅👉🏻 बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी Online अर्ज कसा करायचा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा Online अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक अँप डाउनलोड करावा लागेल, तो म्हणजे Narishakti Yojna Doot  (नारी शक्ती योजना दूत ) या अँप ला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड केल्या नंतर प्रथमतः तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ठ करायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्या नंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल ती तुम्हाला त्या खालील रकान्यात भरायची आहे.

OTP टाकल्या नंतर तुम्हाला त्या पुढील पेजवर तुमचे संपूर्ण नाव तुमचा जिल्हा, तुमचे गाव इत्यादी माहिती पूर्ण भरायची आहे. अशीच माहिती समोर येणाऱ्या पेजवर स्टेप बाय स्टेप भरायची आहे.

पूर्ण माहिती भरल्या नंतर तुम्हाला तुमच्या जवळील कागद पत्रे समोरील पर्यायांमधेय अपलोड करायची आहेत.

माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे

  1. लाभार्थी आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. डोमोसाईल किंवा १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला इत्यादी पैकी एक.
  4. उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड या पैकी एक.
  5. अर्जदार हमी पत्र.
  6. अर्जदाराचा लाईव्ह फोटो.

इत्यादी कागदपत्रे माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष आणि नियमांनुसार लागतात.

✅👉🏻 Ration Card Status: Maharashtra, रेशन कार्डची ऑनलाईन स्तिथी तपासा

माझी लाडकी बहीण योजना अँप डाउनलोड करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने सुरु केलेल्या मोबाईल अँप ला डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक टच करा.

👉🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

Conclusion

माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून या Blog मध्ये आपण माझी लाडकी बहीण योजनेचा Online फॉर्म कसा करायचा या बद्दल माहिती पहिली, राज्य शासनाच्या सदरील योजनेचा फॉर्म आता तुम्ही तुमच्या मोबाईल अँप वरून भरू शकता. त्यासाठी तुम्हाला आता सेतू शेवा सुविधा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मद्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Scroll to Top