mahajyoti tab registration 20242026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना शासनाकडून विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET (Batch 2024–2026) साठी महाज्योती योजनेअंतर्गत मोफत टॅब वाटप केले जाते. १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील JEE/NEET/MHT-CET परीक्षेच्या तयारीसाठी या योजनेतून ऑनलाइन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब दिले जातात.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने शासन या योजनेतून परीक्षा पूर्व प्रशिक्षण आणि ऑनलाइन अभ्यासासाठी टॅब उपलब्ध करून देते. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना महाज्योती पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
या योजनेची पात्रता, नियम आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.
विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप – महाज्योती योजना
शासनाकडून महाज्योती योजनेतून दरवर्षी JEE/NEET/MHT-CET परीक्षेच्या तयारीसाठी मोफत टॅब वाटप केले जाते. राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना महाज्योती पोर्टलमार्फत राबविली जाते.
या योजनेतून विद्यार्थ्यांना:
- एक मोफत टॅब
- दररोज ६ GB डेटा
- तसेच परीक्षा पूर्व प्रशिक्षण
दिलं जातं.
Mahajyoti Tab Registration 2024–2026
महाज्योती मार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी तुम्हाला महाज्योतीच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- सर्वप्रथम महाज्योती पोर्टल उघडा.
- Notice Board मध्ये जा.
- “Application for JEE/NEET/MHT-CET Batch 2026 Training” या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा.
- शेवटी आवश्यक कागदपत्रे स्पष्ट प्रतिमेत अपलोड करा.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट:
https://mahajyoti.org.in/
थेट अर्ज लिंक:
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
महाज्योती योजनेसाठी पात्रता
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी इतर मागास, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर गटातील असावा.
- विद्यार्थी २०२४ मध्ये १०वी उत्तीर्ण झालेला असावा.
- पुढील शिक्षणासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- निवड १०वीच्या गुणांच्या टक्केवारीनुसार होईल:
- शहरी भाग: किमान ७०%
- ग्रामीण भाग: किमान ६०%
- ग्रामीण/शहरी वर्गीकरण आधार कार्डवरील पत्त्यानुसार केले जाईल.
महाज्योती योजनेसाठी आरक्षण
- महिलांसाठी ३०% जागा आरक्षित
- दिव्यांगांसाठी ४% जागा आरक्षित
- अनाथांसाठी १% जागा आरक्षित
महाज्योती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- १०वीची गुणपत्रिका
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास प्रमाणपत्र
Conclusion
Mahajyoti Tab Registration 2024–2026 या योजनेअंतर्गत इतर मागास, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दररोज ६ GB डेटा दिला जातो. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मोठी मदत होते.
ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. अशाच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील व्हा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खाली क्लिक करा.

