मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: शेवटच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली हि योजना कशी आहे

विधानसभेच्या लागणाऱ्या निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि मद्यप्रदेश च्या धर्तीवर महाराष्ट्रात राबविली जाणार आहे. मध्यप्रदेश मध्ये आधीपासून लोकप्रिय असणारी सदरील योजना महाराष्ट्रात चालू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे. मध्यप्रदेश मध्ये सर्वसामान्यामद्ये  अतिशय लोकप्रिय असणारी ही योजना महाराष्ट्रातील जनतेत ही तितकीच लोकप्रिय ठरणार आहे. शासनाच्या नवीन अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात अली आहे. महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सदरील योजना शासन महाराष्ट्रात राबविणार आहे. या योजनेतून महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये लाभ वितरित करण्यात येणार आहे. ही योजना कुणासाठी आहे, या योजनेचे स्वरूप व निकष काय आहेत या विषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मध्येप्रदेश मध्ये लोकप्रिय असलेली ‘लाडली बहेणा’ या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या योजनेतून वयवर्षे २१ ते ६० वर्षा पर्यंतच्या महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महिला मुली आत्मनिरभर व्हाव्यात या साठी सदरील योजना महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतून महिलांना दरमहा १५,०० ( दीड हजार रुपये ) त्यांच्या बँक खात्यामार्फत दिले जाणार आहे.

कुटुंब प्रमुख महिलांना आपले कुटुंब चालवितांना आपल्यावर निर्भर असलेल्या मुला-मुलींचे व्यवस्थित पालन पोषण करता यावे तसेच त्यांचे शिक्षण आणि भवितव्य घडविता यावे यासाठी शासन महिलांना या योजनेतून मदत करणार आहे.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप

शासनाने अर्थसंकल्पात घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही मध्यप्रदेश सरकारमध्ये चालू असलेल्या ‘लाडली बहेणा’ या योजनेला लक्षात ठेवून सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप हे ‘लाडली बहेणा’ या योजने सारखेच आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील कुटुंब प्रमुख महिलेला मासिक १५,०० रुपये महिलेच्या बँक खात्या मार्फत दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, परित्यक्ता महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने च्या माध्यमातून राज्यातील महिलांना इतर लाभा बरोबरच वर्षातून ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील कुटुंब प्रमुख असलेल्या महिला ज्यांची नावे BPL  यादीत आहेत, आणि त्यांचे रेशन कार्ड अन्नपूर्णा योजनेचे आहे अशा महिलांना शासन वर्षा काठी ३ गॅस सिलेंडर मोफत देणार आहे.

✅👉🏻Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता

 • लाभार्थी महिला हि महाराष्ट्राची रहिवाशी असावी.
 • राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता, कुटुंब प्रमुख महिला या योजनेसाठी पात्र आहेत .
 • लाभार्थी महिलांचे वय हे २१ वर्ष ते ६० वर्ष या दरम्यान असावे.
 • लाभार्थी महिलांचे बँक खाते असणे आवश्यक.
 • लाभार्थी महिलांचे एकूण मार्गाने मिळणारे उत्पन्न हे रु. २.५० लाखाच्या आत असावे.

अपात्रता

 • लाभार्थी महिलांचे एकूण उत्पन्न रु. २.५० लाखाच्या वर नसावे.
 • लाभार्थी महिलांच्या कुटुंब सदस्यातून कोण्ही आयकर भारत नसावा.
 • लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत नसावी.
 • लाभार्थी महिलांना शासनाच्या इतर विभागामार्फत रु. १५,०० किंवा अधिकचा लाभ बँक खात्यामाद्य मिळत नसावा.
 • लाभार्थीं महिलांच्या घरातून कोणीही राजकीय पदावर कार्यरत नसावा.
 • महिलांच्या कुटुंबातील सदस्याकडे ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन नसावे.
 • लाभार्थी महिलांच्या कुटुंबाकडे ५ एक्कर पेक्षा जास्त जमीन नसावी.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. लाभार्थी महिला आणि तिच्या कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड.
 2. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला.
 3. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
 4. लाभार्थी महिलेचे बँक पासबुक प्रत.
 5. पासपोर्ट आकाराचा फोटो.
 6. कुटुंबाचे रेशन कार्ड.
 7. योजनेच्या अटी शर्थी मान्य असल्याचे हमीपत्र.

✅👉🏻Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र्र शासनाकडून पोर्टल निर्माण करून देण्यात येणार आहे. पोर्टल निर्माण झाल्या नंतर तुम्ही त्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.

ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त तुम्ही ऑफलाईन अर्ज देखील करू शकणार आहात. तुम्ही तुमच्या अंगणवाडी कार्यकर्ती कडे/तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे/महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडे जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची तारीख

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास १ जुलै २०२४ पासून सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२४ निश्चित करण्यात आलेली आहे. शासन या तारखेत बदल करू शकते.

✅👉🏻पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची यादी: PMEGP उद्योग लिस्ट

Conclusion

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: शेवटच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली हि योजना कशी आहे या Blog मध्ये आपण शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी सविस्तर माहिती पहिली आहे. या योजनेतून कुटुंब प्रमुख महिलांना दरमहा रु. १५,०० ( दीड हजार रुपये ) आर्थिक मदत थेट बँक खात्याच्या मध्येमातून करण्यात येणार आहे. तसेच वर्षाकाठी ३ गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा. आणि शासनाच्या अशाच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top