मुख्यमंत्री योजना दूत योजने अंतर्गत महाराष्ट्रात भरल्या जाणार ५ ० हजार जागा

मुख्यमंत्री योजना दूत योजने अंतर्गत महाराष्ट्रात भरल्या जाणार ५ ० हजार जागा महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण व शहरी भागात राबविल्या जाणाऱ्या योजना या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या करिता, मुख्यमंत्री योजना दूत हि नवीन योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री योजना दूत ही एक सरकारी योजना आहे, ज्या अंतर्गत विविध योजना आणि धोरणांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांची ‘योजना दूत’ म्हणून निवड केली जाते. या योजनेंतर्गत योजना दूतांवर लोकांना जागरुक करून शासकीय योजनांच्या लाभांची माहिती देण्याचे काम सोपविण्यात येणार आहे .मुख्यमंत्री योजना दूत योजने अंतर्गत महाराष्ट्रात भरल्या जाणार ५ ० हजार जागा

मुख्यमंत्री योजना दूत योजने अंतर्गत महाराष्ट्रात भरल्या जाणार ५ ० हजार जागा

ग्रामीण आणि शहरी भागात बऱ्याच वेळेस शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्व सामान्य लोकांना होत नाही. शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरु केलेल्या योजनांचा लाभ सर्व सामान्यांना व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असते. मात्र केवळ माहिती नसल्यामुळे लोक या योजनांपासून वंचित राहतात. यासाठी शासनाने प्रत्येक गाव स्तरावर एक योजना दूत नेमण्याचे ठरविले आहे. नेमलेला योजना दूत हा गावातील लोकांना शासनाच्या सर्व योजनांविषयी सविस्तर माहिती देणार आहे. त्यातून गोरगरीब लोकांना शासनाच्या योजनांचा फायदा घेता येणार आहे.

मुख्यमंत्री योजना दूत पात्रता

  • महाराष्ट्राचा आणि ज्या गावात निवड होणार आहे ,  त्या गावाचा रहिवाशी असावा .
  • लाभार्थ्याला सामाजिक कामाची आवड असावी .
  • लाभार्थी हा पूर्ण वेळ देणारा असावा .
  • गावातील सर्वसामान्य लोकांना योजना समजून सांगण्याचे कोशल्य त्याच्याकडे असावे .
  • लाभार्थी कमीत कमी १ २  वि पास असावा या पेक्षा जास्त शिक्षण असेल तर प्राधान्य .
  • मुख्यमंत्री योजना दूत या योजनेत निवडल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांचे वय १ ८  ते ३ ५  वर्षाच्या दरम्यान असावे .

✅👉🏻 मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी करा अर्ज Online

मुख्यमंत्री योजना दूत निवड प्रक्रिया

मुख्यमंत्री योजना दूत म्हणून निवडला जाणारा लाभार्थी हा गावातील रहिवाशी असावा लागतो . लाभार्थ्यांची निवड हि ग्रामीण भागात ग्रामपंचायत मार्फत होणार आहे तर शहरी भागात नगर पालिका, नगर पंचायत यांच्या मार्फत होणार आहे. निवड झालेल्या लाभार्थी हा निवड झालेल्या क्षेत्रात तेथील स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत बॉडी यांना जिम्मेदार राहणार आहे. तर शहरी भागात नगर पालिका, नगर पंचायत च्या अधिकाऱ्यांना आणि लोकनियुक्त पदाधिकार्यांना जबाबदार असणार आहे .

✅👉🏻 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024: 7.5 HP कृषी पंपांना मोफत वीज मिळणार

मुख्यमंत्री योजना दूत कालावधी

सदरील योजनेअंतर्गत निवडल्या जाणाऱ्या योजना दूत यांचा कालावधी हा निवड झाल्यापासून ६ महिन्याचा असणार आहे. या कालावधी मध्ये लाभार्थ्याला शासनाच्या योजनांविषयीची इथंभूत माहिती हि नागरिकांना देणे बंधनकारक असणार आहे . ह्या कालावधी मध्ये कामकारणारे लाभार्थी  हा फक्त ६  महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहेत .

मुख्यमंत्री योजना दूत मानधन

मुख्यमंत्री योजना दूत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून मासिक रु . १ ० ,० ० ०  हजार मानधन शासनाकडून देण्यात येणार आहे . हा निधी शासनाच्या वार्षिक नियोजनानुसार वाटप करण्यात येणार आहे .

✅👉🏻 Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा

Conclusion

मुख्यमंत्री योजना दूत योजने अंतर्गत महाराष्ट्रात भरल्या जाणार ५ ० हजार जागा या blog मध्ये आपण शासनाच्या मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल सविस्तर माहिती पहिली . ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांना शासनाच्या विविध लोकहितवादी योजनांची माहिती मिळावी , आणि त्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचाव्यात हा उद्देश शासनाचा या माघे आहे . माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा . अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा .

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top