मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठ नागरिकांना साह्य साधने व उपकरणे खरेदीसाठी अर्थसाह्य

मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठ नागरिकांना साह्य साधने व उपकरणे खरेदीसाठी अर्थसाह्य महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून राज्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांच्या दैनंदिन गरजा त्यांना भागविता याव्यात म्हणून रु. 3000 अर्थसाह्य देण्यात येणार आहे.राज्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक दुर्बलतेवर आणि आजारावर मात करता यावीत, आणि आपले जीवन सुसह्य पने जगता यावेत यासाठी महाराष्ट्र शासन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना अर्थसाह्य करणार आहे. सदरील योजनेतून अर्थसाह्य बरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी सुद्धा सबंधित विभागाकडून घेण्यात येणार आहे. वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना व आवश्यक साधने आणि उपकरणे खरेदी करन्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी शासन मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रात राबवीत आहे. आपण या योजनेची उदिष्ठ आणि पात्रता पाहणार आहोत.मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे

केंद्रसरकारच्या वयोश्री योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केलेली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील वय वर्ष ६५  व त्यावरील नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य नागरीका प्रमाणे जगता यावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वयानुसार येणारे अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना व आवश्यक साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी, मनस्वास्थ   केद्र व योग्य उपचार इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी शासन सदरील योजनेतून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रु. 3000 आर्थिक साह्य देत आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून महाराष्ट्र शासन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयानुसार येणाऱ्या व्याधींनवर मत करण्यासाठी आणि वयोवृद्ध नागरिकांना सर्व सामान्य जीवन जगता यावेत यासाठी या योजनेतून लाभार्थ्याच्या खात्यात DBT द्वारे रु. 3000 हजार अर्थसाह्य करणार आहे. शासनाच्या निमावली नुसार खलील साधने खरेदी करण्यासाठी शासन अर्थसाह्य देणार आहे.

  • चष्मा
  • श्रवणयंत्र
  • ट्रायपॉड
  • स्टिक व्हील चिअर
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नी-ब्रेस
  • लंबर बकेट
  • सर्वाइकल कॉलर

वरील साहित्य/साधने खरेदी करण्यासाठी शासन मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून मदत करते.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून अर्थसाह्य

महारष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांनसाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभार्थ्याला सरळ खात्यावर DBT द्वारे अर्थसाह्य केले जाते.

  • राज्याशासानातर्फे लाभार्थ्याला १००% अनुदानावर अर्थसाह्य केले जाते.
  • शासनातर्फे लाभार्थ्याच्या खात्यावर सरळ DBT द्वारे रु. 3000 हजार अर्थसाह्य केले जाते.

शिबिराचे आयोजन ;-

सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत प्रार्थमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये यांच्या माध्येमातून आरोग्य केंद्राचे जाळे महाराष्ट्र भर पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जावून केले जाते. याचा धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची अंमलबजावणी यंत्रणा

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था ( CPSU ) आणि सामाजिक न्याय व विशेष आर्थिक साह्य विभाग, मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे व जिल्हा स्तरावरील अंमल बजावणी समिती यांच्या सहभाग असेल. सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देख रेख आणि नियंत्रण करतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता व निकष

शासनाच्या सामाजिक कल्याण व सामाजिक न्याय विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणे, लाभार्थ्याचे बँक पासबुक आधार कार्ड नंबर इत्यादी कागदपत्रे जमा करणे हि कामे नोडल एजेन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था ( CPSU ) यांच्या माध्येमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्फत पार पाडण्यात येणार आहे.

👉🏻 CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

  1. लाभार्थ्याने  31/12/2023 च्या अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असावी.
  2. लाभार्थ्याचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे, असे लाभार्थी या योजनेला पात्र आहेत.
  3. लाभार्थ्याच्या आधार कार्ड वर वय वर्ष 65 किंवा त्या पेक्षा अधिक असावे.
  4. शासनाच्या इतर पेन्शन योजनेचा लाभ मिळत असल्यास तसा पुरावा सदर करवा. ( संजय गांधी निराधार , श्रावण बाळ निराधार अशा योजना )
  5. लाभार्थ्याचे सर्व बाजूने मिळणारे उत्पन्न रु. 2 लाखाच्या आत असावे.
  6. सदर योजनेत भाग घेणाऱ्या लाभार्थ्याने माघील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार द्वारे या योजनेत निर्दिष्ठ केलेल्या साधनाचा लाभ घेतलेला नसावा.  तसे स्वयं घोषणा प्रमाणपत्र सादर करावे लागेल. मिळालेले साधन ना दुरुस्त असेल किंवा 3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल तर लाभार्थी अर्ज करू शकतात.
  7. लाभार्थ्याने मिळालेल्या रकमेतून विहित केलेल्या उपकरण खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक ( बिल ) प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत सबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कडून प्रमाणित करून सबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम ( CPSU ) यांच्या मार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करावे. अन्यथा लाभार्थ्याकडून रक्कम वसूल करण्यात येयील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे

  1. लाभार्थ्याचे आधार कार्ड
  2. लाभार्थ्याचे पासबुक
  3. लाभार्थ्याचे पासपोर्ट साईज फोटो
  4. लाभार्थ्याचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र
  5. शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे

वरील प्रमाणे कागदपत्रे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाचा GR  मुख्यमंत्री वयोश्री योजना

CPSU अंतर्गत पोर्टल तयार करण्यात येणार आहे. पोर्टल तयार होताच माहिती updet केली जाईल.

Conclusion

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे, तिचे निकषा, पात्रता आणि कागदपत्रे या बद्दल पूर्ण माहिती आपण सदरील blog मध्ये पहिली आहे. या लेखाच्या मदतीने तुम्ही वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाला लाभ मिळवून देवू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या जवळील मित्रांना अवश्य सेंड करा. अशाच योजनांच्या माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top