मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे: मुख्यमंत्री सहायता निधी योजना

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे: मुख्यमंत्री सहायता निधी योजना महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करणे हा मुख्ये उद्देश मुख्यमत्री सहायता निधी योजनेचा आहे. सदरील योजनेमधून राज्यावर एखादे नैसर्गिक इतर संकट ओढवले तर मुख्यमंत्री सहायता निधी मधून या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मदत केली जाते. राज्यात उद्भवनारी पूर परिस्थिती असेल, भूकंपासारखे संकट असेल किंवा दंगलीने होणारे नुकसान असेल अशा परिस्थिती मध्ये शासन मुख्यमंत्री सहायता निधी मधून उद्भलेल्या परिस्थिती मधून जनतेला सावरण्यासाठी या निधीचा उपयोग करते. तसेच राज्याती गरीब कुटुंब ज्यांच्याकडे कुठले हि विमा संरक्षण नाही अशा कुटुंबांना दुर्धर रोगावर उपचारासाठी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून केली जाते. अपान मुख्यमंत्री सहायता योजना काय आहे, या योजनेच्या लाभासाठी कुठली कागदपत्रे लागतात या बद्दल माहिती पाहू.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे

मुख्यमंत्री सहायता निधी योजना

मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख्याने नैसर्गिक आपत्ती जसे कि, पूर,चक्रीवादळ, भूकंप आणि एखादा अनपेक्षित होणारा मोठा अपघात तसेच दंगलीच्या हिंसाचारात बाधित झालेल्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वापरला जातो. या व्यतिरिक्त शासकीय इस्पितळाने ठरवलेल्या रोग उपचारासाठी अत्यंत गरीब कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी वापरला जातो. अपघातामध्ये जर एखाद्या कुटुंबाची करती व्यक्ती मृत पावल्यास अशा व्यक्तीच्या वारसदारास मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत केली जाते. ज्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. अशा कुटुंबांना शासन मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून मदत करते.

राज्यातील गरीब कुटुंबांना दुर्धर आजारावर उपचार घेण्यसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत केली जाते. ज्या कुटुंब दुर्धर आजारावर आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेवू शकत नाही, अशा कुटुंबाना शासन मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत करते.

मुख्यमंत्री सहायता निधी उद्दिष्टे

 • राज्यातील नैसर्गिक आपत्ती मध्ये बाधित व्यक्तींना मदत करणे.
 • जातीय हिंसाचारात दगावलेल्या किंवा दुखापत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक किंवा इतर स्वरुपाची मदत करणे.
 • दहशतवादी मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक वा इतर स्वरुपाची मदत करणे.
 • रुग्णांना उपचार किंवा शत्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा इतर स्वरुपाची मदत करणे.
 • अपघाती मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत करणे ( मोटार, रेल्वे, विमान, जहाज अपघात वगळता).
 • आर्थिक किंवा अन्य स्वरुपाची मदतीची आवश्यकता असणार्या विविध संथांना आर्थिक किंवा इतर स्वरुपाची मदत करणे.
 • शैक्षणिक, सामाजिक, सांकृतिक चर्चासत्रे व संमेलने अयोगीत करण्यासाठी साहाय्य करणे.
 • शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनाच्या इमारती करिता अंशतः आर्थिक किंवा इतर स्वरुपाची मदत करणे.

✅👉🏻 अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

राज्यातील दुर्बल आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरीब कुटुंबांना आजारावरील खर्चासाठी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून केली जाते. एखाद्या कुटुंबातील सदस्याला दुर्धर आजार झाला असेल आणि त्याची आर्थक परिथिती कमकुवत असेल अशा कुटुंबाला सदरील योजनेतून आर्थिक मदत केली जाते. हि मदत लाभार्थ्याच्या खात्यावर न करता ती ज्या इस्पितळात लाभार्थ्याचा इलाज सुरु आहे, अशा इस्पितळाच्या खात्यावर मदत टाकली जाते. हि मदत घेण्यासाठी तुमच्याकडे इस्पितळाचे इलाज चालू असलेले सर्व कागदपत्रे योजनेसाठी अर्ज दाखल करतांना जोडावी लागणार आहेत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी किती मिळतो

 

अंदाजित खर्च अर्थसाह्य
रु. 20,000   पर्यंत  रु. १०,०००
रु. २०,००० ते रु. 49,999 पर्यंत  रु. 15,000 
रु.50,000 ते 99,999 पर्यंत  रु. 20,000
रु.1,00,000 ते 2,99,999 पर्यंत  रु.30,000
रु.3,00,000 ते 4,00,999 पर्यंत रु.40,000
रु.5,00,000 ते त्या पेक्षा जास्त  रु.50,000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे

 1. वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र ( खासगी रुग्णालयातील खर्च १ लक्ष पेक्षा जास्त असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक. )
 2. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून या सदरील योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसल्याबाबतचे वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक.
 3. लाभार्थ्याचे रेशन कार्ड.
 4. राहिअवाशी दाखला.
 5. आधार कार्ड.
 6. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
 7. मोबाईल नंबर.
 8. मा. आमदार/खासदार यांचे शिफारस पत्र.
 9. रुग्णास हि मदत वर्षातून एकदा देण्यात येते.
 10. रुग्णालयाचे बँक पासबुक.
 11. रुग्णालयाचे आय. एफ. एस. एसी कोड.
 12. रुग्णालयाचा e-mail.

✅👉🏻 ग्रामपंचायत निधी माहिती: जाणून घ्या ग्रामपंचायतला किती निधी येतो

मुख्यमंत्री अपघात सहायता निधी

एखाद्या अनपेक्षित अपघाता मध्ये जर कुटुंबातील कर्ती व्यक्ती मृत पावल्यास शासन मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून आर्थिक मदत केली जाते. ज्या कुटुंबातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही,तसेच शासनाकडून किंवा इतर कोणत्याही योजनेतून आर्थिक मदत मिळालेली नाही. अशा कुटुंबांना शासन मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून आर्थिक मदत करते. अपघात हा मोटार, रेल्वे, विमान, जहाज वगळता इतर झालेला अपघात गृहीत धरला जातो.

मुख्यमंत्री अपघात सहायता निधी किती मिळतो

 

पंचनाम्यानुसार नुकसानीचे प्रमाण  मंजूर अर्थसाह्य 
रु. 25,000 पर्यंत  रु. 3,000 
रु. 25,000 ते 49,999 पर्यंत  रु. 5,000 
रु. 59,000 ते 99,999  रु. 10,000 

✅👉🏻PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा 

मुख्यमंत्री अपघात सहायता निधी कागदपत्रे

 1. ज्या कुटुंबाकडे कुठलेही विमा संरक्षण नाही किंवा इतर योजनेतून लाभ मिळालेला नाही.
 2. पोलीस पंचनामा.
 3. शव विच्छेदन अहवाल.
 4. मृत्यू प्रमाणपत्र.
 5. प्रस्ताव पूर्ण करून जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावा लागतो.
 6. जिल्हाधिकारी यांचा स्वयं स्पष्ठ अहवाल.
 7. नुकसानीचा पंचनामा ( महसूल अधिकारी ).
 8. बाधित व्यक्तीचा आर्थिक स्थितीचा अहवाल.

Conclusion 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे: मुख्यमंत्री सहायता निधी योजना या लेखात आपण मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून मिळणारी सहायता या बद्दल आपण पूर्ण माहिती पहिली. सदरील योजना हि राज्यामध्ये नैसर्गिक संकट, किंवा दंगलीतील हिंसाचार किवा अपघात इत्यादी संकटावर मात करण्यासाठी वापरला जातो. दिलेली माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या  सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top