महारष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दिले जाणारे रेशन कार्ड हे दैनंदिन जीवनातील अतिशय महत्वपूर्ण दस्तावेज झाले आहे. आज प्रत्येक ठिकाणी राशन कार्ड ची आवश्यकता आपल्याला भासते. शासकीय योजना असो किंवा इतर शासकीय कामे असोत, प्रत्येक ठिकाणी रेशन कार्ड ची आवश्यकता असते. रेशन कार्डद्वारे शासन विविध सवलती उपलब्ध करून देत आहे. तुमच्या कुटुंबाची ओळख म्हणून रेशन कार्ड एक मुख्य कागदपत्रात गणल्या जाते. केंद्र सरकार corona काळापासून मुफ्त धान्य रेशन कार्ड द्वारे लोकांना वाटत आहे, या सर्वे गोष्टीसाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. वेग वेगळ्या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळे रेशन कार्ड दिले जातात.
या सर्व रेशन कार्ड विषयीची माहिती आपण आजच्या रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र या लेखात पाहणार आहोत. आणि ऑनलाइन राशन कार्ड कसे काढायचे या बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात रेशन कार्ड किती प्रकारचे आहेत
महारष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाकडे राशन कार्ड असावे, यासाठी वेगवेगळे निकष लावून रेशन कार्ड लाभार्थ्याला दिले जातात. महाराष्ट्रात प्रामुख्याने ( तिहेरी शिधापत्रिका ) तीन योजने अंतर्गत रेशन कार्ड उपलब्ध आहेत. याला तिहेरी शिधा पत्रिका धोरण असे म्हणतात. या सर्व रेशन कार्ड विषयी माहिती खालील प्रमाणे आहे.
पिवळे रेशन कार्ड/ BPL राशन कार्ड (Below Poverty Line)
पिवळे रेशन कार्ड हे अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना दिले जाते, ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अतिशय कमी आहे. आणि ज्यांच्या कडे उदरनिर्वाहाचे कुठले हि भक्कम साधन नाही. ज्यांची उपजीविका हि मोल-मजुरी करून चालते अशा दुर्बल घटकांना महाराष्ट्र शासन पिवळे रेशन कार्ड वाटप करते. आता पर्यंत १९९८ च्या दारिद्र्ये रेषे खालील लाभार्थ्यांना पिवळे रेशन कार्ड वाटप करण्यात आलेले आहेत.
पिवळे रेशन कार्ड (BPL) निकष
- १९९८ च्या दारिद्र्ये रेषे मध्ये नाव असणारे लाभार्थी या योजनेत पात्र आहेत.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २१००० हजार रु. पेक्षा कमी आहे.
- लाभार्थ्यांच्या नावे कुठली हि स्थावर मालमत्ता नाही अशे लाभार्थी.
पिवळे रेशन कार्ड (BPL) पात्रता
- लाभार्थ्याचे घराचे नमुना न. 8.
- लाभार्थ्याच्या कुटुंबाच्या सर्व सदस्याचे मतदान कार्ड.
- लाभार्थ्याच्या कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड.
- उत्पन्न २१००० हजार रु. एकूण कुटुंबाचे.
- कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक.
- दारिद्र्ये रेषे मध्ये नाव असणे आवश्यक.
वरील प्रमाणे कागदपत्रे पिवळ्या रेशन कार्डसाठी आवश्यक आहेत. सध्या दारिद्र्ये रेषे खालील यादी संपुष्टात आणल्याने नवीन पिवळे रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिले जात नाहीत.
APL रेशन कार्ड (Above Poverty Line)
दारिद्र्ये रेषेवरील सर्व कुटुंबाचा समावेश या रेशन कार्ड योजनेत होतो. जी कुटुंबे BPL रेशन कार्ड मध्ये नाहीत ती या योजनेत समाविष्ठ करता येतात. या राशन धारकाला महिन्याला १० kg. ते २० kg. धान्य मिळते.
APL रेशन कार्ड पात्रता
- लाभार्थ्याचे एकूण उत्पन्न ५०,००० हून अधिक नसावे.
- लाभार्थ्याचे घर नमुना न. 8 असावा.
- लाभार्थ्याच्या एकूण कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
- लाभार्थ्याच्या सर्व कुटुंबातील सदस्यांचे मतदान कार्ड.
- कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक.
केशरी रेशन कार्ड ( अन्नसुरक्षा योजना ) (PHH-Priority House Hold Scheme )
महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या रेशन कार्ड पैकी एक आहे. केशरी रेशन कार्ड मध्ये समाविष्ठ होणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. BPL आणि APL च्या निकषा पेक्षा वेगळे निकष केशरी रेशन कार्डसाठी असल्या मुळे सर्वात जास्त लाभार्थी या रेशन कार्ड मध्ये समाविष्ठ आहेत.
केशरी रेशन कार्ड निकष
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४४,००० रु. पेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कुठला हि व्यक्ती शासकीय शेवेत नसावा.
- कुटुंबातील कोणाकडे चार चाकी वाहन नसावे.
- कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत नसावी.
- कुटुंबाकडे दोन हेक्टर पेक्षा जास्त जिरायत किंवा बागायत जमीन नसावी.
अंतोदय रेशन कार्ड (AAY-Antyodaya Anna Yojna)
महाराष्ट्र शासनाकडून अतिशय गरीब कुटुंबातील लाभार्थ्यी ज्यांच्या कुटुंबात कमावता पुरुष नाही, आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अतिशय कमी आहे. ज्यांचे गरिबी रेषेच्या खाली नाव आहे अशा दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना अंतोदय रेशन कार्ड दिले जाते.
अंतोदय रेशन कार्ड पात्रता आणि निकष
- आर्थिक दुर्बल घटक म्हणून दारिद्र्ये रेषे खालील कुटुंब.
- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१,००० रु. पेक्षा कमी.
- घर नमुना न.8.
- कुटुंब सदस्याचे आधार कार्ड.
- कुटुंब सदस्याचे मतदान कार्ड.
- कुटुंब प्रमुख यांचे बँक पासबुक.
अंतोदय योजनेतून लाभार्थ्याला महिन्याला ३५ kg धान्य दिले जाते .
शेतकरी रेशन कार्ड ( FL)
शासनाकडून जे लाभार्थी APL, BPL, AAY,PHH, BPL या राशन कार्ड च्या निकषा मध्ये जे लाभार्थी बसत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी आणि वेशेष करून शेतकऱ्यांसाठी सदरील योजनेतून रेशन कार्ड दिले जातात. ज्या शेतकऱ्यांना ५ एकर पेक्षा कमी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना सदरील योजनेतून रेशन कार्ड देले जातात.
शेतकरी रेशन कार्ड पात्रता व निकष
- लाभार्थी हा शेतकरी असावा.
- लाभार्थ्याकडे ५ एकर पेक्षा जास्त जमीन नसावी.
- लाभार्थी बागायतदार नसावा.
- लाभार्थ्याकडे घर न. 8 असावा.
- लाभार्थ्याचे बँक पासबुक.
- कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड.
- कुटुंबातील सदस्यांचे मतदान कार्ड.
- लाभार्थ्याचे एकूण वार्षिक उत्पन्न ४४,000 हजार पेक्षा कमी.
इत्यादी पात्रता आणि निकष सदरील योजनेच्या लाभार्थ्याचे आहेत.
प्राधान्य कुटुंब योजना रेशन कार्ड (NPH-Non Priority Household)
प्राधान्य कुटुंब योजने ते लाभार्थी येतात ज्यांची नावे इतर रेशन कार्ड मध्ये शासकीय निकषा नुसार बसू शकत नाहीत. अशा लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ दिला जातो. पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड या योजनेतून दिले जातात.
प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड योजनेचे निकष
- लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- लाभार्थ्याचे एकूण कुटुंब वार्षिक उत्पन्न ४४,000 हजार रु. पेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे मतदान कार्ड.
- कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक.
या रेशन कार्ड धारकाला सद्या राशन मिळत नसले तरी भविष्यात यांना राशन मिळू शकते.
प्राधान्य कुटुंब योजना रेशन कार्ड ( NPHH)
NPHH अंतर्गत येणाऱ्या कार्ड धारक लाभार्थ्याला कुठल्याही प्रकारचे राशन मिळत नाही. NPHH रेशन कार्ड धारकाला फक्त ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येतो.
प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड योजनेचे निकष
- लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- लाभार्थ्याचे एकूण कुटुंब वार्षिक उत्पन्न ४४,000 हजार रु. पेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे मतदान कार्ड.
- कुटुंब प्रमुखाचे बँक पासबुक.
👉🏻 Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे
रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र
महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या लाभार्थ्यांना समाविष्ठ करण्यासाठी अनेक रेशन कार्ड योजना आहेत, ज्या आपण वर पहिल्या आहेत. या योजनांमधून रेशन कार्ड च लाभ घेण्यासाठी तुम्हाला Ofline किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावून Online अर्ज सादर करावा लागतो.
Online अर्ज सादर कसा करायचा हे आपण खली पाहणार आहोत.
नवीन रेशन कार्ड ऑनलाइन असे काढा
महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट वर जावून कुटुंब प्रमुख नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी online अर्ज करू शकतात. तसेच रेशन कार्ड दुरुस्ती आणि नवीन सदस्यांची नावे add करू शकतात, त्या साठी तुम्हाला शासनाच्या https://rcms.mahafood.gov.in वेबसाईट वर जावे लागेल.
सर्व प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या NATIONAL FOOD SECURITY PROGRAM या पोर्टल वर जावे लागेल, या पोर्टल वर गेल्या नंतर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला Singin/Rejister ला क्लिक करून Public Login ला टच करा. Public Login ला टच केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज open होईल, SELF SERVICE FOR RATION CARD या पेज वर गेल्या नंतर New User! Sing Up Here ला क्लिक करा.
New User! Sing Up Here ला क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज Open होईल Register New Ration Card User या पेज वरती तुम्हला ३ पर्याय दिसतील, त्या पर्याया पैकी नवीन रेशन कार्ड साठी तुम्हाला तिसरा पर्याय निवडावा लागेल. I Want To Apply For New Ration Card या पर्यायाला टिक मार्क करा. टिक मार्क केल्या नंतर एक Format तुमच्या समोर उघडेल ते तुम्हाला पूर्ण भरायचे आहे.
Format open झाल्यावर त्या मध्ये तुम्हाला तुमचे आधार नुसार नाव, तुमचा आधार नंबर, तुमचे Gender, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा इमेल आणि अग्ल्यात शेवटी तुमचा Login id आणि Password टाकून Captcha भरायाचा आहे. या नंतर open होणार फॉर्म तुम्हाला पूर्ण भरून सबमिट करायचा आहे.
अशा पद्धतीने तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी online अर्ज करू शकता.
ऑफलाइन रेशन कार्ड प्रोसेस
ऑफलाइन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा बिभागाला जावून अर्ज करावा लागेल. त्या साठी लागणारा अर्ज घेवून तो पूर्ण भरून, तुमच्या राशन दुकानदाराचे प्रमाणपत्र जोडून आणि आपले सर्व कागदपत्र जोडून स्वतः तहसील कार्यालयाला नेवून द्यावा लागेल.
रेशन कार्डमध्ये तुमचे नाव आणि इतर सदस्याचे नाव ऑनलाइन चेक करा
रेशन कार्ड मध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे तुम्ही online चेक करू शकता. त्या साठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin लॉगीन करावे लागेल. त्या नंतर उजव्या कोपऱ्यातील Singin/Rejister ला क्लिक करून Public Login ला टच करा. Public Login ला टच केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज open होईल, SELF SERVICE FOR RATION CARD या पेज वर गेल्या नंतर New User! Sing Up Here ला क्लिक करा.
New User! Sing Up Here ला टाचा केल्या नंतर दिसणाऱ्या ३ पर्याय पैकी पहिले पर्याय निवडायचे आहे. पहिल्या पर्यायावर ( I Have a Valid Ration Card) क्लिक करून तुम्हला तुमच्या कुटुंबाचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या नंतर तुमच्या रेशन कार्ड ची डिटेल open होईल, तुमच्या सदस्यांची नावे आणि मिळणारे रेशन इत्यादी ची माहिती असेल.
रेशन कार्ड विषयीच्या इतर ऑनलाइन सुविधां मिळवा
रेशन कार्ड विषयीच्या इतर सर्व सुविधांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईट वर तुम्हाला जावे लागेल. या वेब साईटवर तुम्हाला रेशन कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यासाठी तुम्हाला शासनाच्या https://mahafood.gov.in/ साईटवर जावे लागेल.
ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली
महारष्ट्र शासनाच्या https://mahafood.gov.in/ वेबसाईट वर गेल्या नंतर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची रेशन कार्ड विषयीची तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला राशन कमी मिळत असेल किंवा तुमचे रेशन तुम्हाला महिन्याच्या महिन्याला दिले जात नसेल तर तुम्ही या साईटवर जावून सदरील पर्यायाला निवडून रेशन दुकानदार विरोधात तक्रार करू शकता.
ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली या पर्यायाला क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज open होईल त्या पेज वर
- तक्रार नोंदवा
- आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पहा
- अहवाल
वरील पर्याय पैकी पहिला पर्याय निवडून तुम्ही तुमच्या रेशन कार्ड विषयी किंवा मिळणाऱ्या राशन विषयी तक्रार शासनाकडे करू शकता, त्याचा बरोबर केलेल्या तक्राराची स्थिती तपासू शकता. तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुम्ही केलेल्या तक्रारीचा अहवाल तुम्हाला शासनाकडून दिला जातो.
Conclusion
रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र या लेखा मध्ये आपण ऑनलाइन रेशन कार्ड कसे काढ्याचे किंवा राशन कार्ड विषयीच्या असलेल्या ऑनलाइन सेवा या बद्दल पूर्ण माहिती पहिली त्या सोबतच महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने नागीरीकांना उपलब्ध करून दिलेली सर्व राशन कार्ड आणि त्यांचे पत्रात व निकष या बद्धल माहिती पहिली. रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र या लेखाच्या साह्याने तुम्ही तुम्ही तुमच्या राशन कार्ड विषयीच्या सर्व समस्या सोडवू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.