लेक लाडकी योजना : मुलीच्या खात्यावर 1 लाख 1 हजार रुपये

महाराष्ट्र शासनाकडून मुलींचे घटते जन्मदर, आणि शिक्षणातील घटती संख्या या वर उपाय म्हणून लेक लाडकी योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांना हातभार म्हणून शासन सदरील योजना महाराष्ट्रत राबवीत आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणाच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर शासन ठराविक निधी पालकाच्या खात्यावर जमा करते. एकूण 1 लाख 1 हजार रुपये मुलीच्या 18 वर्ष वया पर्यंत शासन खात्यामध्ये जमा करते. 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना हि योजना लागू आहे, दोन अपत्यांनाच हि योजना लागू आहे. दोन्ही मुली असल्यातरी या योजनेचा लाभ घेता येतो, आणि पहिला मुलगा व दुसरी मुलगी असली तरी हि मुलीला या योजनेचा लाभ मिळतो. या योनेचे स्वरूप व कागदपत्रे यांची माहिती आपण पाहू. लेक लाडकी योजना : मुलीच्या खात्यावर 1 लाख 1 हजार रुपये

लेक लाडकी योजना

महाराष्ट्र शासनाकडून 10 आक्टोंबर २०२३  रोजी या योजनेचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत मुलीला तिच्या जन्मा पासून ते वयाच्या 18 व्या वर्षी पर्यंत एक लाख एक हजार रुपये तिच्या नावे पालकाच्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ठराविक रक्कम खात्यावर जमा केली जाते. आपण लेक लाडकी योजना या योजनेचे स्वरूप, कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा हे या लेखा मध्ये पाहणार आहोत.

लेक लाडकी योजनेचे स्वरूप

शासनाच्या ल्र्क लाडकी योजने अंतर्गत मुलीला जन्मा पासून ते वयाच्या 18 व्या वर्षा पर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपये खात्यावर DBT मार्फत टाकले जातात. मुलीला जन्मा पासून वेगवेळ्या टप्प्यावर दिली जाणारी रक्कम

मुलगी जन्माला आल्यानंतर :- पालकाला 5 हजार रुपये खात्यावर दिल्या जातात.

मुलगी पहिलीला गेल्यावर : – 6 हजार रुपये दिले जातात.

मुलगी सहावीला गेल्यावर :- 7 हजार रुपये मुलीच्या किंवा पालकाच्या खात्यावर टाकले जातात.

मुलगी अकरावी ला गेल्यावर :- 8 हजार रुपये मुलीच्या किंवा पालकाच्या खात्यावर टाकले जातात.

मुलगी 18 वर्षाची झाल्यावर :- 75 हजार रुपये मुलीच्या किंवा पालकाच्या खात्यावर जमा केले जातात.

वरील प्रमाणे मुलगी 18 वर्षाची होई पर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जातात. मुलगी आई वडिलांना ओझे वाटू नाही तर मुलीचा अभिमान पालकांना वाटावा म्हणून शासन या योजनेच्या माध्यमातून पालकांना हातभार लावत आहे. मुलीच्या शिक्षण ते तिच्या लग्नाला हि आर्थिक मदत करून शासन मुलींना तिच्या पायावर भक्कमपने उभे राहण्याचे शिकवत आहे. या योजनेमुळे गोरगरीब पालक आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत, त्या सोबतच वयाच्या 18 वर्षी मिळणाऱ्या 75,000 हजार रुपया मुळे तिच्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेतून काही अंशी निश्चित होणार आहेत.

हे हि वाचा 👉🏻 बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits

लेक लाडकी योजनेचा उद्देश 

आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या पालकाकडून मुलीच्या शिक्षणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते परिणामी मुलगी शिक्षणापासून वंचित राहते. आणि शिक्षण चालू नसल्यामुळे लवकरच मुलीचे लग्न लावून दिले जाते. मुलगी मनाने व शरीराने परिपक्व नसताना तिच्या मनाच्या विरोधात पालक निर्णय घेतात. अशा परिस्थितीत मुलीचे शिक्षण व्हावे ती मनाने व शरीराने परिपक्व व्हावी यासाठी शासन लेक लाडकी योजना राबवीत आहे. मुलगी नुसती पालकांचीच लाडकी नुसून ती आता शासनाची हि लाडकी झाली आहे. मुलीच्या जन्मा पासून ते तिच्या वयाच्या 18 व्या वर्षी पर्यंत शासन तिला शिक्षणासाठी भरघोस मदत या योजनेद्वारे करणार आहे. जेणे करून मुलगी शिकून आत्मनिर्भर होईल आणि तिच्यात समाजात निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात निर्माण होईल.

लेक लाडकी योजना पात्रता

  • शासनाच्या निकषानुसार 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना हि योजना लागू आहे.
  • लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कडे पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • कुटुंब प्रमुखाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रु. या पेक्षा जास्त नसावे.
  • पालकाची दोन अपत्या नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेली असावी.
  • पालक आई किंवा वडील शासकीय आणि निमशासकीय शेवेत नसावे.
  • लाभार्थी महाराष्ट्राचा कायम रहिवाशी असावा.
  • मुलीचे स्वतः चे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे.
  • मुलीचे शिक्षण चालू असावे, योजनेचे हप्ते उचलतांना तसे शाळेचे पुरावे कागदपत्रा बरोबर जोडावे.

लेक लाडकी योजने अंतर्गत वरील पात्रता निकषात तुम्ही बसायला हवेत. फक्त मुलींसाठीच हि योजना आहे. पहिली व दुसरी मुलगी असेल तरी दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो, पहिल्या दोन अपत्यापैकी पहिली मुलगी असली तरी आणि दोन्ही मुली असल्यातरी लाभ घेता येतो. तसेच दोन अपत्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर फक्त मुलीलाच योजनेचा लाभ मिळू शकतो. पहिल्या दोन जुळ्या मुली असल्यास दोन्ही मुली व जुळे मुलगा आणि मुलगी असल्यास फक्त मुलीला या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र तिसरे अपत्य मुलगी असल्यास या योजनेत लाभ घेता येत नाही.

हे हि वाचा 👉🏻 संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

लेक लाडकी योजनेसाठी कागदपत्रे 

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  1. मुलगी जन्माला आल्यावर तिचा जन्म दाखला.
  2. मुलीचे आधार कार्ड ( पहिल्या हप्त्यासाठी नाही पण नंतरच्या हप्त्यासाठी आधार असणे आवश्यक.)
  3. पालकाचे आधार कार्ड.
  4. पालकाचा रहिवाशी दाखला.
  5. पालकाचे बँक पासबुक.
  6. पालकाचे राशन कार्ड.
  7. शासकीय निमशासकीय शेवेत नसल्याचे स्वयं घोषणापत्र.
  8. पालकाचे दोन अपत्या नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र.
  9. मुलीचे शाळेचे बोनाफाईट किंवा शाळेचा दाखला.
  10. मुलीचे पासबुक शेवटच्या हप्त्यावेळी असणे आवश्यक.
  11. मुलीचे दोन पासपोर्ट साईज फोटो.

हे हि वाचा 👉🏻 दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना

लेक लाडकी योजना 2023 अर्ज कुठे करायचा 

लेक लाडकी योजना हि महारष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी सध्या शासनाची online साईट उपलब्ध नाही मात्र अंगणवाडी शिक्षिका किंवा आशाताई यांच्याकडे लेखी स्वरुपात तुम्ही अर्ज करू शकतात. शासनाकडून सदरील योजने विषयीचे नियोजनात्मक काम प्रगतीपथावर आहे. लवकरच साईट वर Online अर्ज करता येतील.

Conclusion

लेका लाडकी योजना हि महारष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विभागा मार्फत राबविणार आहे. आम्ही आपल्याला योजनेची सविस्तर अशी माहिती दिली आहे. योजने विषयी काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्स मध्य तुम्ही विचारू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, आम्हाला फॉलो करा. आमच्या telegram ग्रुप मध्य सामील व्हा, आम्हील लेक लाडकी योजनेचे नवीन अपडेट आपल्या पर्यंत नक्की पोहचवू त्यासाठी आमच्या blog ला subscrib करा bel बटनावर क्लिक करा.

FAQ

1 ) लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा ?

= लेक लाडकी योजनेसाठी अजून शासनाची online साईट उपलब्ध नाही, पण तुम्ही अंगणवाडी शिक्षिकेकडे अर्ज करू शकता.

2 ) लेक लाडकी योजना कागदपत्रे ?

= लेक लाडकी योजने साठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. 1. मुलीच्या जन्माचा दाखला. 2. मुलीचे व पालकाचे आधार कार्ड. 3. बँकेचे पासबुक. 4. रेशन कार्ड. 5. मुलीचा शाळेचा दाखला. 6. पालकाचे दोन अपत्या नंतर कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र.

3 ) लेक लाडकी योजना पात्रता ?

= 1. लाभार्थी कायमस्वरूपी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. 2. एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळणार 2. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे पिवळे राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड असावे. 3. कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top