श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना 2023-2024

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी रज्य व केंद्र शासन विविध योजना राबवीत असते, अशाच स्वरुपाची वृद्ध आणि निराधार लोकांसाठी शासन निवृत्ती वेतन योजना राबविते जेणेकरून निराधार वृद्धांना त्यांचे जगणे सुसह्य होईल. परिस्थितीने गरीब किंवा स्वतः च्या कुटुंबाकडून दुर्लक्षित असलेल्या वय वृद्ध नागरिकांची हेळसांड होऊ नये, त्यांना त्यांचे जीवन स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शासन श्रावणबाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना राबल्या जातात. या योजने मधून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कढून एक ठराविक रकमेचे मासिक वेतन निराधार, अपंग, विधवा, दिव्यांग यांना दिले जाते. या वेतनातून त्यांच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागवा आणि त्यांचे जगणे सुसह्य व्हावे या उद्देशाने शासन सदरील योजना राबवीत आहे.श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना 2023-2024

श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना काय आहे ,या योजनेची पात्रता काय आहे, कुठली कागदपत्र लागतात, अर्ज कुठे करावा लागतो, या योजनेसाठी संपर्क कार्यालय कोणती आहेत या सर्व बाबी विषयी आज जाणून घेणार आहोत.

श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना 2023-2024

शासनाकडून वृद्ध,अपंग,विधवा,निराधार आणि दिव्यांग निराधार अशा नागरिकांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना शासनाच्या सामाजिक आणि विषेस साह्य विभागाकडून राबविल्या जातात. श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजनेद्वारे आर्थिक दुर्बल घटकांना ज्यांना त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यासाठी इतरांनवर अवलंबून राहण्याची वेळ येवू नये व त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने अशा निराधार व आर्थिक दुर्बल घटकांना शासन प्रतीमः निवृत्ती वेतन देते, किंवा सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक मदत करते. ज्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांचे मुलबाळ नाही किंवा जे आपल्याच कुटुंबाकडून दुर्लक्षित आहेत अशा वयोवृद्ध व्यक्तीसाठी शासन श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना राबवीत आहे. या योजनेतून दोन श्रेणी मधील नागरिकांना वेगवेगळ्या निकषात बसवून अनुदान दिले जाते.

योजनेची उद्दिष्ट्ये

  • आर्थिक दुर्बल घटकांना ज्यांना त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यासाठी इतरांनवर अवलंबून राहण्याची वेळ येवू नये अशा निराधार व आर्थिक दुर्बल घटकांना शासन या योजनेद्वारे आर्थिक मदत करते.
  • ज्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांचे मुलबाळ नाही किंवा जे आपल्याच कुटुंबाकडून दुर्लक्षित आहेत अशा वयोवृद्ध व्यक्तीसाठी शासन श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजनेतून लाभ देते.
  • स्वतः च्या कुटुंबाकडून दुर्लक्षित असलेल्या वय वृद्ध नागरिकांची हेळसांड होऊ नये, त्यांना त्यांचे जीवन स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शासन श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना राबवीत असते.

श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान :- गट अ

श्रावणबाळ योजने अंतर्गत गट अ श्रेणी मध्ये जे लाभार्थी २००२ च्या यादी प्रमाणे दारिद्र्य रेषेखाली येतात अशा लाभार्थ्यांना गट अ अंतर्गत त्यांची निवड करून त्यांना लाभ दिला जातो. गट अ मध्ये पात्र होण्यासाठी तुमचे नाव २००२ च्या दारिद्र्य रेषेखालील झालेल्या सर्वे अंतर्गत त्या यादीत असणे आवश्यक आहे. किंवा कुटुंबाच्या प्रपत्रब मध्ये तुमचे नाव असयास हवे आहे. अनुदानाच्या अर्जासोबत तुम्हाला प्रपत्रब ची साशंकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान :- गट ब

श्रावणबाळ योजने अंतर्गत गट ब मध्ये ते लाभार्थी अर्ज करू शकतात, ज्यांचे नाव २००२ च्या दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये समाविष्ठ नाहीत. अशा लाभार्थ्यांना गट ब मध्ये अर्ज करता येतो पण त्यासाठी लाभार्थ्याचे एकूण कुटुंबाचे उत्पन्न २१००० रु. असावयास हवे. तसे उत्पन्न प्रमाणपत्र लाभार्थ्याला अर्जासोबत जोडावे लागेल.

श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतून मिळणारे अनुदान

शासनाच्या श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतून गट अ आणि गट ब मधून केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन अंतर्गत नवीन निकषा नुसार प्रती माह ६०० रु. दिले जातात. तर राज्यशासनाच्या विभागाकडून ४०० रु. दिले जातात. असे एकूण १००० रु. मासिक अनुदान सदरील योजनेतून लाभार्थ्यांना दिले जाते. संजय गांधी निराधार योजनेतून अपंगासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम या पेक्षा वेगळी असते त्यांना २०० रु. जास्तीचे अनुदान दिले जाते.

लाभार्थी पात्रता/कागदपत्रे

  • श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना गट अ :-

१ ) लाभार्थ्याचे वय ६५ वर्षापेक्षा कमी नसावे.

२ ) लाभार्थ्याचे रहिवाशी १५ वर्षापासुनचे वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र जोडले असावे.

३ ) आधार कार्ड

४ ) राशन कार्ड

५ ) २००२ च्या सर्वेनुसार दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र

६ ) प्रपत्रब मध्ये नाव असल्याची साक्षाकीत प्रत.

७ ) वेध्यकीय अधिक्षक किंवा तत्सम आदिकार्याचे वयाचे आरोग्याचे प्रमाणपत्र.

८ ) हयात प्रमाणपत्र तत्सम अधिकार्याचे.

८ ) शासकीय निमशासकीय शेवेत नसल्याचे प्रमाणपत्र.

९ ) दोन पासपोर्ट साईज फोटो.

  • श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना गट ब :-

१ ) लाभार्थ्याचे वय ६५ वर्षापेक्षा कमी नसावे.

२ ) लाभार्थ्याचे रहिवाशी १५ वर्षापासुनचे वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र जोडले असावे.

३ ) आधार कार्ड

४ ) राशन कार्ड

५ ) कुटुंबाचे एकूण उत्पन्न २१०००रु. असल्याचे तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र.

६ ) भूमिहीन असल्याचे स्वयं घोषित प्रमाणपत्र.

७ ) वेध्यकीय अधिक्षक किंवा तत्सम आदिकार्याचे वयाचे आरोग्याचे प्रमाणपत्र.

८ ) हयात प्रमाणपत्र तत्सम अधिकार्याचे.

८ ) शासकीय निमशासकीय शेवेत नसल्याचे प्रमाणपत्र.

९ ) दोन पासपोर्ट साईज फोटो.

असा करा अर्ज

श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील दिलेल्या माहिती प्रमाणे आपण प्रस्ताव अर्ज तयार करू शकता. खालील लिंक वरून तुम्ही अर्ज pdf download करावा.

अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर सदरील अर्ज ग्रामपंचायत कडे दाखल करून ग्रामशेवक किंवा तत्सम अधिकार्याच्या अर्जावरील सर्व प्रमाणपत्रावर सहीशिक्का झाल्या नंतर तो अर्ज तलाठी कार्यालयाला दाखल करणे, तलाठी कार्यलायातून तपासणी झाल्या नंतर सदरील अर्ज गावातील किंवा इतर आपले सरकार केंद्रावर जावून Online करणे आवश्यक आहे. Online झाल्यानंतर सदरील अर्जाला Online पावती जोडून तो अर्ज आपल्या तहसील कार्यालयाला दाखल करून पोहोच पावती घेणे आवश्यक आहे.

सदरील अर्ज तहसील कार्यालयाला दाखल केल्यानंतर या योजनेंतर्गत नेमलेल्या समिती समोर अर्ज सदरील विभागाकडून तपासणीसाठी ठेवला जातो. या समितीचे सचिव तहसीलदार साहेब असतात. या समितीच्या मासिक मिटींगमध्ये अर्ज पारित झाल्यास तुमचा अर्ज मंजूर होतो. तसे पत्र तहसील कार्यालयाकडून तुम्हाला पाठविले जाते.

संपर्क कार्यालय

  • ग्रामपंचायत कार्यालय
  • तलाठी कार्यालय
  • तहसील कार्यालय

👉 श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना प्रस्ताव अर्ज pdf download करा.

👉MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

सारांश

श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना आपण संबधित blog मध्ये या योजनेविषयी परिपूर्ण माहिती दिलेली आहे, ज्या द्वारे अर्ज तयार करून तुम्ही गरजवंताची मदत करू शकता. शासनाची अत्यंत महत्वपूर्ण योजना आर्थिक दुर्बल घटकासाठी राबविली जाते.आर्थिक दुर्बल घटकांना ज्यांना त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यासाठी इतरांनवर अवलंबून राहण्याची वेळ येवू नये अशा निराधार व आर्थिक दुर्बल घटकांना शासन या योजनेद्वारे आर्थिक मदत करते. ज्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांचे मुलबाळ नाही किंवा जे आपल्याच कुटुंबाकडून दुर्लक्षित आहेत अशा वयोवृद्ध व्यक्तीसाठी शासन श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजनेतून लाभ देते. शासनाच्या श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतून एकूण १००० रु. मासिक अनुदान सदरील योजनेतून लाभार्थ्यांना दिले जाते.

सदरील माहिती आवडली असल्यास गरजवंता पर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहचवा त्यसाठी या लेखाला शेअर करा. या नंतरच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माहितीसाठी व pdf अर्जासाठी आम्हाला subscribe करा आमच्या whatsapp group मध्ये सामील व्हा.

👉 हे ही वाचा :- Shabari Loan Scheme/आदिवासी बेरोजगार व महिला बचत गटांना कर्ज योजना

Scroll to Top