आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme

 आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme- नमस्कार मित्रानो आज आपण आदिवासी समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या अल्प व्याजदर कर्ज योजने विषयी माहिती पाहणार आहोत. शासन आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी निरनिराळ्या योजना राबवीत असते. आदिवासी समाजाचे राहणीमान व जीवनमान उंचवावे या उद्धेशाने शासन या योजना अमलात आणत असते. मग मुलांच्या शिक्षनासाठी असतील किंवा मग सुक्षीत बेरोजगार तरुणांन च्या भविष्यासाठी असतील. किंवा महिला सशक्ती कारणासाठी असतील. शबरी महामंडळाकडून या योजना राबविल्या जातात. अश्याच प्रकारची एक योजना बेरोजगार तरुणांसाठी व महिला बचत गटांसाठी राबविली जाते, ज्या मधून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा ते स्वतः च्या पायावर उभे रहावीत त्यांचा स्वतः चा उद्योग व्यवसाय असावा. तसेच आदिवासी महिला बचत गटांना व त्यांच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी शासन अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते.आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme

आज आपण ह्या blog मध्ये आदिवासी बेरोजगार व महिला बचत गटांना कर्ज योजने विषयी जाणून घेणार आहोत. सदरील योजनेची पात्रता निकष काय आहेत, या योजनेतून दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर काय आहे, कर्ज फेशायचे कसे या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

✅👉🏻 व्यवसाय कर्ज योजना:वीणा तारण वीणा जामीन मिळवा कर्ज

आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme

आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme ही वयक्तिक लाभासाठी असणारी योजना आहे. या योजनेतून आदिवासी समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मदत केली जाते. शुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळाव व त्याद्वारे त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवा या साठी शासन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत अतिशय अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. कर्जाची परत फेड अतिशय सवलती मध्ये म्हणजे ५ वर्षाच्या कालावधीत करावी लागते. Shabari Loan Scheme योजनेतून करता येणारे व्यवसाय व त्यासाठी उपलब्ध असलेली कर्ज रक्कम खालील प्रकारे आहे.

अ ) लहान उद्योगधंदे ( २ लक्ष रु. पर्यंत ) :-

ग्रामीण किंवा शहरी स्तरावर जे काही छोटे मोठे उद्योग तुम्ही करू शकता जसे किराणा दुकान, पिठाची चक्की किंवा एखादे चहा पाण्याचे हॉटेल इत्यादी साठी सदरील योजनेतून तुम्हाला २ लक्ष पर्यंत रक्कम कर्ज म्हणून दिली जाते.

ब ) हॉटेल, धाबा व तत्सम व्यवसाय ( ५ लक्ष रु.पर्यंत ) :-

शहरी भागात किंवा ग्रामीण भागात मेनरोड ला लागून जर जागा उपलब्ध असेल तर तुम्ही एखादं मोठं हॉटेल किंवा धाबा टाकण्यासाठी सारील योजनेतून ५ लाखा पर्यंत रक्कम कर्ज म्हणून घेवू शकतात.

क ) स्पेअर पार्ट / ग्यारेज/आटो वर्कशोप किंवा तत्सम व्यवसाय ( ५ लक्ष रु.पर्यंत ) :-

एखादं स्पेअर पार्ट दुकान टाकायचं असेल किंवा तुमचा स्वतः चा आटो वर्कशोप चा व्यवसाय असेल तर तुम्ही या योजनेतून ५ लाखा पर्यंत रक्कम कर्ज घेवू शकतात.

ड ) प्रवासी वाहन व्यवसाय ( ९ ते १० लक्ष पर्यंत ) :-

प्रवासी वाहतुकीसाठी आपण या योजने मधून प्रवासी वाहन खरेदी करू शकता. त्यासाठी या योजनेतून ९ते १० लाखा पर्यंत रकाम कर्ज म्हणून घेवू शकता.

ई ) मोठे उद्योग धंदे ( २० ते २५ लक्ष रु. पर्यंत ) :-

शेतमालावर प्रक्रिया करणारा एखादा उद्योग किंवा इतर एखादा प्रक्रिया उद्योग स्थापन करायचा असल्यास आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme योजनेतून २० ते २५ लाखापर्यंत रक्कम कर्ज म्हणून घेता येते.

कर्ज निधीची वर्गवारी

१ ) एन.एस.टी.एफ.डी.सी. कर्ज हिस्सा :- ८०% किंवा ९०%

२ ) शबरी महामंडळ मार्जिन कर्ज हिस्सा :- १०% किंवा ५%

३ ) लाभार्थी वयक्तिक हिस्सा :- १०% किंवा ५%

आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme कर्जाची परत फेड व व्याजदर

आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme योजनेतून घेतलेल्या कर्जाची परत फेड व दिलेली मुदत अत्यंत ही ५ वर्षाची असून, ५ वर्षामध्ये तुम्हाला समान ४ हप्ते करून परत फेड करायची असून वार्षिक व्याजदर हे ५ लक्ष पर्यंत द.सा.द.शे. ६% सरळ व्याज, ५ लक्ष ते १० लक्ष पर्यंत द.सा.द.शे. ८% सरळ व्याज आकारले जाईल. १० लक्ष वरील कर्जास द.सा.द.शे. १०% सरळ व्याज आकारले जाईल. अतिशय सवलतीच्या दारात असून लाभार्थ्याला परवडणारे आहे.

पात्रता व आटी

१ ) लाभार्थी हा आदिवासी समाजाचा आसवा

२ ) लाभार्थ्याचे एकूण कोटुंबीक उत्पन्न मर्यादा ३,०,०००० लक्ष रु. एवढी असावी.

३ ) लाभार्थ्याची वयो मर्यादा १८ ते ४५ च्या दरम्यान असावी.

४ ) सदरील योजनेसाठी लाभार्थ्याकडून ५% ते १५% वयक्तिक हिस्सा अपेक्षित.

५ ) १० लाखा वरील रकमेसाठी द.सा.द.शे. १०% सरळ व्याज आकारले जाईल.

६ ) सदर योनेची परत फेड ५ वर्षात करणे बंधन कारक आहे.

शबरी योजनेच्या आधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

विभागीय शाखा कार्यालयास अधिनस्त असणारी जिल्हे

अ. क्र. विभागीय शाखा कार्यालये अधिनस्त असलेले जिल्हे
1. नाशिक नाशिक
2. जव्हार ( जि. पालघर ) पालघर,ठाणे,रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,मुंबई व उपनगरे
3. जुन्नर ( जि. पुणे ) पुणे,अहमदनगर,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,बीड
4. नंदुरबार नंदुरबार, धुळे
5. यावल ( जि.जळगाव ) जळगाव,औरंगाबाद ,जालना, बुलढाणा
6. धरणी ( जि. अमरावती ) अमरावती,अकोला
7. यवतमाळ यवतमाळ,वाशीम
8. किनवट ( जि. नांदेड ) नांदेड,परभणी,हिंगोली
9. देवरी ( जि. गोंदिया ) भंडारा,गोंदिया
10. चंद्रपूर चंद्रपूर
11. गडचिरोली गडचिरोली
12. नागपूर नागपूर,वर्धा

स्वयंसाह्यता बचतगट योजना

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत राबविल्या जाणाऱ्या आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme मध्ये स्वयंसाह्यता बचतगट साठी अतिशय अल्प व्याजदरात कर्ज योजना ही आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वपूर्ण योजना आहे. बचत गटांना या योजनेद्वारे एखाद्या प्रकल्पाला किंवा मोठ्या उद्योग वेवसायला सुरुवात करता येते त्यासाठी सदरील योजनेमधून ५ लक्ष पर्यंत कर्ज रक्कम उपलब्ध करून दिली जाते. या साठीच्या पात्रता व आटी खालील प्रमाणे आहेत.

कर्ज निधीची वर्गवारी

१ ) एन.एस.टी.एफ.डी.सी. कर्ज हिस्सा :- ९०%

२ ) शबरी महामंडळ मार्जिन कर्ज हिस्सा :- १०%

३ ) लाभार्थी वयक्तिक हिस्सा :- निरंक

पात्रता व आटी

१ ) बचतगट नोंदणी प्रमाणपत्र.

२ ) बचतगट सभासदांची यादी त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र.

३ ) बचतगटाचे कमीत कमी ६ महिन्याचे बँक खात्याचा उतारा.

४ ) ग्रामपंचायत/नगरपालिका नाहरकत प्रमाणपत्र.

५ ) जमीन राहण्यासाठी अध्यक्ष/सचिव यांचे ७/१२ उतारे.

६ ) जो वेवसाय करायचा आहे त्याचे सर्व साहित्याचे कोटेशन.

इत्यादी कागदपत्रे सदरील योनेसाठी बचतगटा कडून घेतली जातात.

सारांश

वरील लेखामध्ये आम्ही आपल्याला आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme विषयी परिपूर्ण माहिती दिलेली आहे, वरील step follo करून तुम्ही सदरील योजेचा लाभ घेवू शकता. माहिती आवडली असल्यास गरजू पर्यंत पोहोचवायला विसरू नका माहिती शेअर करा. अशाच माहितीसाठी आम्हाला subscribe करा. bell बटनावर क्लिक करा, आणि आमच्या whatsapp group मध्ये सामील व्हा. 

2 thoughts on “आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme”

  1. Pingback: मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना/अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

  2. Pingback: Www Mahabocw In Renewal Status: कामगार रिन्यूअल स्थिती चेक करा

Comments are closed.

Scroll to Top