राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (RKVY)नमस्कार शेतकरी मित्रानो आजच्या काळात शेती म्हणजे निरनिराळ्या अडचणींना व अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाना तोंड देत ओडत असलेला गाडा,अशी अवस्था शेती व शेतकऱ्याची झाली आहे. भरमसाठ खर्च व त्या मानाने उत्पन्न कमी, त्यात नेहमीच हुलकावण्या देणारा निसर्ग, शेतमालासाठी मिळणारा अल्प बाजारभाव, खत औषदांच्या वाढत्या किमती, अतिरासायनिक खतांच्या वापरणे नापीक झालेली जमीन या सगळ्या गोष्टीने शेतकरी पुरता जेरीस आलेला आहे. दिवसेन दिवस झामिनीचा पोत खालावताना आपल्याला दिसत आहे.खर्चाच्या हिशेबाने उत्पन्न कमी कमी होत चालेलं दिसते आहे.उत्पन्न वाढीसाठी स्पर्धेच्या युगात वेगवेगळे रासायनिक खते व कीटक नाशके शेतीत टाकले जातात, त्याचा दूरगामी परिणाम शेतीवर होताना आज दिसतोय बऱ्याच ठिकाणी शेती नापीक झाली आहे.
त्याच बरोबर याचा मानवी आरोग्यावर ही घातक परिणाम होताना दिसतोय, रसायन मिश्रित अन्न आपल्या पोटात जात आहे. ज्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत.महाराष्ट्र शासनाने या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी सन २०१६-२०१७ पासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना ही गट आधारित शेंद्रिय शेती योजना सुरु केली आहे, हीच योजना आता राष्ट्रीय कृषीविकास योजने अंतर्गत राबविण्यात येत आहे.
चला तर मग आज शेंद्रीय शेती काय आहे, आणि महाराष्ट्र शासनाची राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (RKVY) ही काय आहे, या योजनेची उद्दिष्टे काय आहेत, ही योजना कशी राबविली जाते.
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना
महाराष्ट्र शासनाने २०२३ -२०२४ पासून पूर्वीची परंपरागत कृषी विकास योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राबविण्यास मान्यात दिली आहे. २०२३ -२०२४ मध्ये सुरवातीस ८५० गटाची स्थापना करून या योनेची अमलबजावणी करण्यात येणार आहे. सदरील योजना ही गट आधारित असून २० हेक्टर चा एक गट याप्रमाणे गटाची निर्मिती करून गटांना प्रशिक्षण, मार्गदर्शन योग्य नियोजन करून ३ वर्षाच्या टप्यात शेंद्रिय शेतीची वरील योजनेनुसार अंमलबजावणी होणार आहे. निवडलेला गटाला ३ वर्षाच्या कालवधीत शेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन व वेगवेगळ्या टप्यावर अनुदान दिले जाणार आहे.
योजनेची उद्दिष्ट्ये
महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजने मधून खालील उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा हेतू आहे.
१ ) कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढविणे. |
२ ) व्यावसायिक शेंद्रीय शेतीस व शेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देने. |
३ ) शेंद्रीय प्रमिनीकरण करणे. |
४ ) शेतकऱ्याच्या शेतात शेंद्रीय निविष्ठा तयार करणे. |
५ ) रासायनिक खते व किटक नाशक मुक्त शेतमाल ग्राहकास उपलब्ध करून देने. |
६ ) शेंद्रीय शेती ग्राम विकषित करणे. |
७ ) शेंद्रीय शेतीवर आधारित प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देने. |
८ ) खर्चाच्या मानाने उत्पन्नात वाढ घडवून आणणे. |
वरील प्रमाणे उद्धीष्ठ्ये शासनाची आहेत.
योजनेचे निकष
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना प्रत्येकी २० हेक्टर शेती / शेतकरी यांचा गट तयारकरून शेंद्रीय शेती विषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण या योजने द्वारे देण्यात येणार आहे. शेतीच्या मातीचे नमुने तपासणे ,शेतीची सुपीक जमीन वाहून जाऊ नये म्हणून शेतावर चर काढणे तसेच बांध घालणे.नापीक झालेल्या शेतीला पुन्हा उपजाऊ बंविण्यासाठी व शेतीचा पोत सुधारण्यासाठी शेतातच हिरवळीचे खत तयार करून जमिनीमध्ये मिक्षित करणे. शेतकर्यांना अतिरिक्त खर्चापासून वाचविण्यासाठी शेतातच काम्पोष्ट डेपो तयार करणे.जीवामृत, अमृतपर्णी , बिजामृत दशपर्णी यासारख्या निविष्ठा वनस्पती शेतात तयार करून शेतीच्या शेतीच्या नापिकतेवर मात करणे.
कृषि विभागाकडे आत्मा अंतर्गत स्थापन असलेल्या गटांना ह्या योनेत समाविष्ठ करण्यात येवू शकते.
शेती गटातून शेतकर्यांना देण्यात येणारा लाभ
प्रत्येकी २० हेक्टर शेती गटाला शासनाकडून पुढील ३ वर्षासाठी १० लाखाचे अर्थ साह्य करण्यात येणार आहे. हे अर्थसाह्य शेती गटांना पुढील ३ वर्षासाठी टप्या टप्याने दिले जाणार असून त्या मध्ये सहकारीसंथा मार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, P C S प्रमाणीकरण, दिबितीद्वारे शेतकर्यांना प्रोत्साहन, मुल्यावृधी, विपणन, आणि प्रसिद्धी बाबीसाठी पहिल्या व तिसर्या वर्षासाठी प्रत्यकी १६ हजार ५०० रुपये तर दुसर्या वर्षी १७००० हजार अर्थसाह्य दिले जाणर आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना मातीचे नमुने तपासणी, चर अथवा बांध घालणे, हिरवळीचे खतकाम्पोष्ठ डेपो लावणे, आणि जीवामृत, अमृतपर्णी , बिजामृत दशपर्णी या सारख्या निविष्ठा खरेदीसाठी अर्थसाह्य दिले जाणार आहे.
कार्यन्वित यंत्रणा
राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेकरिता कार्यान्वित असलेल्या यंत्रणेकडून राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना ही योजना राबविली जाणार आहे. त्या मध्ये कृषि संचालक, आत्मा, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य इत्यादींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ग्राम स्थरावर ही योजना राबविली जाणार असल्यामुळे ग्राम स्थरावरील सर्व यंत्रणा या मध्ये समाविष्ठ असणार आहेत.
जमिनीची सुपीकता वाढवून रसायनमुक्त शेतमाल तयार करणे
नापीक झालेल्या जमिनीला सुपीक बनवून शेतकर्याचे आर्थिक उत्पन्न वाढवून घाट्यात असलेल्या शेतीला कमी खर्चात भरघोस उत्पन्ना साठी तयार करणे, त्याचा बरोबर रासायनिक खत व किटक नाशक मुक्त अन्न निर्माण करून ग्राहक पर्यंत पोहचविणे हा या योजनेचा मुख्य उद्धेश आहे. उत्पन्न वाढीसाठी अति प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशक शेतात टाकली जातात. या अति वापरामुळे शेतीमधील जे नेसर्गिक जेविक घटक असतात ते संपुष्टात येत आहेत परिणामी जमीन नापीक होत चालली आहे. शेती मध्ये कितीही खतांचा मारा केला तरी उत्पादन वाढताना आपल्याला दिसत नाही आहे. शिवाय या रासायनिक शेतीमुळे मानवाच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम झालेले दिसत आहेत.
आणि म्हणून या सगळ्या घोष्टीवर मात करायची असेल तर शेंद्रीय शेती शिवाय दुसरा पर्याय आपल्याला राहिलेला नाही. त्यामिले महाराष्ट्र शासनाची अत्यंत उपयुक्त अशी ही राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना 2023-24 (RKVY) योजना आहे.
सदरील योजने विषयी आणखीन जाणून घेण्यासाठी महारष्ट्र शासनाचा GR वाचा
Cunclusion / सारांश
महाराष्ट्र शाशनाकडून राबविल्या जाणारी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (RKVY) योजना आजच्या रासायनिक युगात अत्यंत महतवाची आहे, वरील सगळ्या घोष्टीचा विचार केल्यास आजच्या काळाची गरज आहे असे आपण म्हणू शकतो. शेतकरी व ग्राहक यांना दोन्ही गटांना उपयुक्त अशी शेंद्रीयशेती शेतकऱ्यांकडून केल्यागेली पाहिजे या साठी शासन प्रशिक्षण व आर्थिक अनुदान उपलब्ध करून देत आहे. या योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा. वरील blog मध्ये आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडली असल्यास दुसऱ्या पर्यंत नक्की पोहचावा त्या साठी या पोस्ट ला शेअर करा . आमच्या नवनवीन माहिती साठी बेल बटनावर क्लिक करा. आमचे whatsapp ग्रुप जॉईन करा.
हे ही वाचा :- MAHADBT maharashtra gov.Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान असलेले Portal
Comments are closed.