भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: मिळवा फळबाग योजनेचा लाभ

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना , महाराष्ट्र शासनाने २०१८-१९ या वर्षापासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बागायतदार शेतकऱ्यांसाठी सुरु केलीली आहे.जे बागायतदार शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घेवू शकत नाहीत ते शेतकरी सदरील योजनेतून फळबाग योजनेचा लाभ घेवू शकतात.या योजनेतून मंजूर झालेल्या अनुदान मधून शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50% अनुदान निधी तर दुसऱ्यावर्षी ३०% अनुदान निधी आणि तिसऱ्या वर्षी २०% अनुदान निधी दिला जातो. शेतकर्यांना दुसऱ्या व तिसऱ्या अनुदान हप्त्या साठी ८०% जीवित झाडांची संख्या ठेवावी लागते, झाडांची मरतुक झाल्यास स्वखर्चाने ती लावून वरील टक्केवारी राखावी लागते. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकर्यांकडे कमीत कमी २० गुंठे तर जास्तीत जास्त ६ हेक्टर ची मर्यादा आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून लाभ घेण्यासाठी अनुदान किती आहे, व या पात्रता आणि निकष काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.सदरील योजना MAHADBT द्वारे राबविली जाते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना , जे शेतकरी या योजनेतून लाभ घेणार आहेत त्या शेतकर्यांना ठिबक सिंचनासाठी १००% अनुदान दिले जाते. इतर बाबीसाठी च्या अनुदान रकमे साठी, निरनिराळ्या फळ पिकांसाठी दिले जाणारे अनुदान हे पुढील pdf मध्ये बघा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पात्रता

१ ) लाभार्थ्यांना फळबाग लागवडीसाठी ठिबकसिंचन बसवणे आवश्यक.

२ ) वयक्तिक शेत्कार्यानाचा लाभ घेता येतो.

3 ) शेतकऱ्याच्या नवे ७/१२ असणे आवश्यक आहे, संयुक्त मालकी असल्यास सामातीपत्र देने आवश्यक.

४ ) इतर योजनेतून लाभ घेतला असल्यास ते क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात लाभ घेता येयील.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कागदपत्रे

१ ) ७/१२ व नमुना ८ अ प्रमाणपत्र.

२ ) संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे समतीपत्र.

३ ) S.C. , S. T. साठी जात प्रमाणपत्र आवश्यक.

अधिक माहितीसाठी :- MAHADBT maharashtra gov.Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान असलेले Portal

ही MAHADBT ची कृषी अनुदान योजना आहे. जी या पोर्टल मार्फत राबविली जाते.

1 thought on “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: मिळवा फळबाग योजनेचा लाभ”

  1. Pingback: अल्पभूधारक शेतकरी योजना

Comments are closed.

Scroll to Top