Kamgar Kalyan Scholarship Scheme 2026:- बांधकाम कामगार कल्याण स्कॉलरशिप अर्ज Online

Kamgar Kalyan Scholarship:- शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. महाराष्ट्रात असंघटित स्वरूपात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कामगारांना उपजीविकेसाठी सतत कामाचे ठिकाण बदलावे लागते.Kamgar Kalyan Scholarship

अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी शासनाकडून कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांना विविध इयत्तांमध्ये शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते.

Kamgar Kalyan Scholarship Scheme 2026 / बांधकाम कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना 2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांसाठी तसेच पत्नीसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना (Kamgar Kalyan Scholarship) राबविली जाते. या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना इयत्ता पहिलीपासून पदवी पूर्ण होईपर्यंत दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.

Kamgar Kalyan Scholarship – पात्रता व आवश्यक कागदपत्रे

E01 – इयत्ता 1 ली ते 7 वी आणि 8 वी ते 10 वी

  • शाळेचे 75% उपस्थिती प्रमाणपत्र / मागील वर्षाचा प्रगती अहवाल

  • चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड

  • हमीपत्र

  • रेशन कार्ड

E02 – इयत्ता 10 वी ते 12 वी (किमान 50% गुण आवश्यक)

  • 10 वी / 12 वी गुणपत्रिका

  • शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र

  • चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड

  • हमीपत्र

  • रेशन कार्ड

E03 – 10 वी / 12 वी शैक्षणिक खर्च

  • मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रिका

  • चालू वर्षाची प्रवेश पावती

  • बोनाफाईड प्रमाणपत्र

  • महाविद्यालयाचे ओळखपत्र (पर्यायी)

  • आधार कार्ड

  • हमीपत्र

  • रेशन कार्ड

E04 – पदवी (प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष)

  • मागील वर्षाची गुणपत्रिका

  • चालू वर्षाची प्रवेश पावती

  • बोनाफाईड प्रमाणपत्र

  • पुस्तके व साहित्याची पावती

  • आधार कार्ड

  • हमीपत्र

  • रेशन कार्ड

E05 – वैद्यकीय / अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम

  • मागील वर्षाची गुणपत्रिका

  • चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र

  • ओळखपत्र (ID Card)

  • प्रवेश पावती

  • आधार कार्ड

  • रेशन कार्ड

E06 – पदवी / पदव्युत्तर शिक्षण खर्च

  • मागील वर्षाची गुणपत्रिका

  • प्रवेश पावती

  • बोनाफाईड प्रमाणपत्र

  • ओळखपत्र

  • हमीपत्र

  • रेशन कार्ड

  • आधार कार्ड

E07 – MSC-IT

  • MSC-IT उत्तीर्ण प्रमाणपत्र

  • फी पावती

  • आधार कार्ड

  • हमीपत्र

  • रेशन कार्ड

Kamgar Kalyan Scholarship Online Process / ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

शिष्यवृत्ती अर्ज करण्यापूर्वी पालकाची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे असणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट mahabocw.in वर जा.

  2. होमपेजवर “Construction Worker: Apply Online for Claim” या पर्यायावर क्लिक करा.

  3. “Select Action” मध्ये “New Claim” निवडा.

  4. नोंदणी क्रमांक (Registration No.) टाकून “Proceed to Form” वर क्लिक करा.

  5. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाका.

  6. फॉर्म उघडल्यानंतर “Select Scheme Category” मध्ये “Educational Welfare Scheme” निवडा.

  7. पात्र योजनेची निवड करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  8. अपलोड केल्यानंतर पडताळणीसाठी तारीख निवडा.

  9. निवडलेल्या तारखेला जवळच्या तालुका कामगार कल्याण कार्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घ्या.

  10. अंतिम सबमिट केल्यानंतर पावती क्रमांक मिळेल. त्या क्रमांकाद्वारे अर्जाची स्थिती (Status) तपासता येईल.

सारांश

Kamgar Kalyan Scholarship Scheme 2026 अंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य दिले जाते. या लेखात आपण पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सविस्तर पाहिली.

माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र व नातेवाईकांना नक्की शेअर करा.

अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील व्हा.

हे हि वाचा :-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top