Bandhkam Kamgar Pension Yojana: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अनेक योजना राबवत असते. आपली उपजीविका पूर्णतः मजुरीवर अवलंबून असणारा बांधकाम कामगार अनेक अडचणींनी ग्रस्त असतो. अशा परिस्थितीत कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर सक्षम करण्यासाठी मदतीचा हात पुढे करते.
आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे बांधकाम कामगार म्हणून काम केल्यानंतर उतारवयात सन्मानाने आयुष्य जगता यावे यासाठी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन सुरू करण्यात आलेले आहे. त्यासंबंधीची अर्ज प्रक्रिया आणि पात्रता आपण या लेखात पाहणार आहोत.
Bandhkam Kamgar Pension Yojana
Bandhkam Kamgar Pension Yojana/बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून नवीन शासन निर्णयानुसार बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांसाठी Bandhkam Kamgar Pension Yojana सुरू करण्यात आली आहे.
या योजनेतून बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांना दरमहा 1,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. नवीन शासन निर्णयानुसार हा लाभ बांधकाम कामगारांना घेता येणार आहे.
Bandhkam Kamgar Pension Yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना पात्रता/निकष
- नवीन शासन निर्णयानुसार Bandhkam Kamgar Pension Yojana अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना काही निकष पूर्ण करावे लागतात. ते निकष कोणते आहेत ते आपण पाहू.
- बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेले आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेले बांधकाम कामगार या योजनेस पात्र असतील.
- बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेले पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्रपणे या योजनेस पात्र असतील.
- पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाचा लाभ जिवंत जोडीदारास मिळत राहील; पण जर मृत्यू पावलेल्या जोडीदारास अगोदरपासून निवृत्ती वेतन मिळत असेल, तर दुहेरी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.
- बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पण सध्या शासकीय नोकरीत असलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.
- बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असावी आणि मागील 10 वर्षांत किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- बांधकाम कामगार म्हणून नोंदणी दरवर्षी नूतनीकरण केलेली असावी.
Bandhkam Kamgar Pension Yojana:बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजनेस अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराने कामगार कल्याणकारी मंडळाच्या https://mahabocw.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे.
- परिपूर्ण भरलेला अर्ज मूळ कागदपत्रांसह बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जमा करायचा आहे.
मंडळाच्या मान्यतेनंतर निवृत्ती वेतन क्रमांक अर्जदाराला दिला जाईल. - पेन्शनधारक लाभार्थ्याने दरवर्षी आपल्या हयातीचा पुरावा मंडळाकडे जमा करावा लागेल.
- मिळणारे पेन्शन लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.
- लाभार्थ्याला बँक खाते बदलायचे असल्यास तसा अर्ज मंडळाकडे करावा लागेल.
NOT:
आम्ही आपल्याला दिलेली माहिती ही शासनाच्या नवीन GR नुसार आहे. GR पाहण्यासाठी https://mahabocw.in या वेबसाइटवर जाऊन शासन निर्णय हा पर्याय निवडा. Bandhkam Kamgar Pension Yojana च्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बांधकाम कल्याणकारी मंडळाला भेट द्या.
निष्कर्ष
Bandhkam Kamgar Pension Yojana: नवीन GR नुसार बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन या लेखात आपण शासनाच्या नवीन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या निवृत्ती वेतनाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खाली सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक करा
