Household Item Kit Distribution :- महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तुसंच वाटप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात येते.
पूर्वी या योजनेचा लाभ ऑफलाईन पद्धतीने घेताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे कामगारांना अधिक सोयीस्करपणे लाभ मिळावा, यासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यासाठी नवीन वेबसाईट विकसित करण्यात आली आहे.
Household Item Kit Distribution – गृहपयोगी वस्तुसंच वाटप योजना
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबविण्यात येत आहे. सध्या या योजनेचे स्वरूप बदलण्यात आले असून, लाभार्थ्यांना पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
कामगार महिलांना मिळणार १ रुपयात धान्य कोठी व ३० भांडी
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
नोंदणी प्रक्रिया व आवश्यक अटी
बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ’ येथे ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगारांनी मंडळाकडे कामगार म्हणून नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी लाभार्थ्याने किमान ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी लाभार्थ्याने ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका यांच्याकडून घेणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर मंडळाकडून १४ अंकी नोंदणी क्रमांक दिला जातो. हा क्रमांक मिळाल्यानंतर मंडळाच्या सर्व योजनांसाठी अर्ज करता येतो.
नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ
या वेबसाईटवर नोंदणीसाठी फक्त १ रुपया शुल्क आकारण्यात येते. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क शासनाकडून आकारले जाणार नाही.
गृहपयोगी वस्तुसंच व धान्य कोठीसाठी अर्ज कुठे करायचा?
नवीन गृहपयोगी वस्तुसंच वाटपासाठी शासनाने स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. या वेबसाईटवर जाऊन लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया (Household Item Kit)
“नवीन अर्ज करा” या पेजवर आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.
नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर ‘SEND OTP’ वर क्लिक करा.
आलेला OTP टाका.
जवळील कॅम्प सेंटर निवडा.
त्यानंतर तारीख निवडा.
अर्ज पूर्ण झाल्यानंतर Appointment Letter प्रिंट करून स्वतःसोबत ठेवा.
अधिकृत संकेतस्थळ
https://hikit.mahabocw.in/appointment
Essential Kit (धान्य कोठी) साठी अर्ज प्रक्रिया
धान्य कोठी (Essential Kit) मिळवण्यासाठीही वरीलप्रमाणे नोंदणी क्रमांक टाकून OTP घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर जवळील कॅम्प ठिकाण व तारीख निवडायची आहे.
अर्ज केल्यानंतर Appointment Letter प्रिंट करून घ्यायचे आहे.
अधिकृत संकेतस्थळ
https://kitdist-v2.mahabocw.in/appointment
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थ्याचे आधार कार्ड
लाभार्थ्याचा नोंदणीकृत मोबाईल नंबर
Appointment Letter (प्रिंट)
निष्कर्ष (Conclusion)
कामगार महिलांना फक्त १ रुपयात धान्य कोठी व ३० भांडी या योजनेअंतर्गत मिळत आहेत. या लेखामध्ये आपण Household Item Kit आणि Essential Kit साठी अर्ज कसा करायचा, याची सविस्तर माहिती पाहिली.
वरीलप्रमाणे अर्ज करून लाभार्थी अगदी १ रुपयात या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ही माहिती उपयुक्त वाटल्यास ती आपल्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा.
अशाच नवीन व उपयुक्त माहितीसाठी आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा.
हे हि वाचा :-
- household item kit distribution: बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तुसंच ऑनलाइन अर्ज सरू
- Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती
- बांधकाम कामगार घरकुल योजना: बांधकाम मजुरांना घरकुलसाठी अनुदान मिळणार दोन लाख रुपये
- Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
- Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा
