रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र  रेशन कार्ड हा शासकीय कामामध्ये लागणारे एक महत्वाचे दस्तावेज झाले आहे. आज प्रत्येक शासकीय कामात तुम्हाला रेशन कार्ड विचारले जाते. तसेच शासन ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबाला धान्य उपलब्ध करून देते. महाराष्ट्र राज्यामध्ये दि. १/फेब्रुवारी/२०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला २ रु.किलो गहू आणि ३ रु. किलो तांदूळ या किमती मध्ये धान्य दिले जाते. केंद्र सरकारने २०१४ पासून म्हणजे कोरोना काळापासून या योजनेला सुरुवात केली आहे. तर bpl कुटुंबाला मोफत धान्य दिले जाते.रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र

Table of Contents

आज आपण या blog च्या माद्यमातून रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी आणि नवीन रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी /Ration Card New Name Registration Process

शासनाच्या विविध योजनासाठी राशन कार्ड लागत असल्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक बाब झाली आहे. तसेच शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियांची सुरुवात झाल्यापासून दारिद्र्ये रेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य शासनाकडून दिले जात आहे. बऱ्याच वेळेस रेशन कार्ड काढायचे कसे हे माहित नसल्यामुळे बरीच कुटुंब शासनाच्या योजनांन पासून वंचित राहतात. चला तर मग रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी कशी करायची हे जाणून घेवू.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी शिधापत्रिका पात्रता व निकष 

केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या काढून तीन शिधापत्रिका योजना ( तिहेरी शिधापत्रिका योजना ) राबविल्या जातात.

A)  पिवळ्या रेशन कार्डसाठी निकष :-

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना ( बी.पी.एल. ) पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डसाठी निकष खालील प्रमाणे आहेत.

१ )  दारिद्र्य रेषेच्या २००२ च्या सर्वे यादीत असणे आवश्यक आहे, तसे प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे.

२ )  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५००० रु पेक्षा जास्त नसावे.

३ )  कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील किंवा शासकीय नोकरीत नसावी.

४ )  कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी.

५ )  कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे.

६ )  कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायत किंवा बागायत जमिनीच्या जास्त नसावी.

B)  केशरी रेशन कार्डसाठी निकष :-

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना ( ए.पी.एल. ) केशरी रंगाच्या शिधापत्रिकेसाठी निकष खालील प्रमाणे आहेत.

१ )  कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. १५००० हजारा पेक्षा जास्त परंतु १ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त नसावे.

३ )  कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून ४ हेक्टर बागायती किंवा त्यापेक्षा जास्त जमीन नसावी.

प्राधान्य गटातील रेशन कार्डसाठी निकष :-

ज्या लाभार्थ्यांनी सन २०११ मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कोटुंबीक उत्पन्न नमूद केले आहे.त्या उत्पन्न नुसार शहरी भागात कमाल रु. ५९००० पर्यंत वार्षिक कोटुंबीक उत्पन्न असणारे लाभार्थी पात्र समजले जातील. तर ग्रामीण भागात रु. ४४००० हजार वार्षिक कोटुंबीक उत्पन्न असणारे लाभार्थी पात्र समजले जातील. सदर लाभार्थ्यांच्या केशरी शिदापात्रीकेवर उजव्या कोपर्यात प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी असा शिक्का मारला जातो.

C)  अंत्योदय रेशन कार्ड लाभार्थी निकष :-

केंद्र शासनाने दि. २५/१२/२००० रोजी अंत्योदय योजनेची सुरुवात करण्यात आली.सदर योजने अंतर्गत गरीबातील गरीब कुटुंबाना ३५ किलो धान्य गहू- २ रु. व तांदूळ-३ रु. प्रती किलो या दराने वितरीत करण्यात येते.

१ )  ज्या कुटुंबातील प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा अपंग किंवा ६० वर्ष वयावरील वृद्ध आहेत आणि ज्यांना उदरनिर्वाहाचे निचित सदन नाही, ज्यांना सामाजिक आधार नाही असे लाभार्थी.

२ )  एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त / अपंग/विधवा/६० वर्षावरील वृद्ध, ज्यांना कोटुंबीक व सामाजिक आधार अथवा कायम स्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही .

३ )  आदिम आदिवासी कुटुंबे ( माडिया,कोलम,कातकरी ).

४ )  भूमिहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार,चांभार,मोची,विणकर,सुतार,लोहारतसेच झोपड पट्टीतल रहिवाशी विशिष्ठ क्षेत्रात रोजदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल रिक्षा चालविणारे, हातगाडी वरून मालाची ने-आण करणारे,फळ व फुले विक्रेते,गारुडी,कचर्यातील वस्तू गुल करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तीची कुटुंबे.

५ )  कुष्टरोगी/ बरा झालेला कुष्ठरोगी कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे.

D)  शुभ्र शिधा ( पांढरे रेशन कार्ड ) पत्रिकासाठी निकष :-

ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून वार्षिक उत्पन्न रु १ लक्ष किंवा त्या पेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्ती कडे चार हेक्टर पेक्षा जास्त बारमाही बागायती शेत जमीन असेल अशा कुटुंबाना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येते. 

✅👉🏻 Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात

नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस काय आहे ते आपण पाहू, ज्या कुटुंबाचे किंवा कुटुंब प्रमुखाचे कुठल्याही रेशन कार्ड मध्ये नाव नाही अशा कुटुंबाला नवीन रेशन कार्ड काढता येते. रेशन कार्ड प्रत्येकाकडे असणे हि गरज झाली आहे. जर एखाद्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नसेल तर त्यांना नवीन रेशन कार्ड काढता येते, त्या साठीचा फॉर्म आणि प्रोसेस खाली दिली आहे.

    नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

    १ )  कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड सोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.

    २ )  कुटुंबातील ज्या व्यक्तींचे मतदार यादीमध्ये नाव आहेत त्या सर्व व्यक्तींचे मतदार ओळखपत्र.

    ३ )  कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न.

    ४ )  नमुना न. ८/ किंवा ७/12 उतारा.

    ५ )  कुटुंब प्रमुख दारिद्र्य रेषेखाली असेल तर प्रमाणपत्राची झेरोक्स प्रत.

    ६ )  कुटुंबातील सर्व सदस्याचे पासपोर्ट साईज फोटो.

    ६ )  रेशन दुकानदाराचे नवीन रेशन कार्ड साठी प्रमाणपत्र .

    ७ )  कुटुंब प्रमुखाचे दोन पासपोर्ट साईज फोटो.

    ८ )  कुटुंब प्रमुखाचे बँकेचे पासबुक प्रत.

    ९ )  घर पट्टी-नळ पट्टी ग्रामपंचायत.

    ✅👉🏻आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme

    नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी Offline प्रोसेस 

    रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी तुमचे कुठल्या हि दुसऱ्या रेशन कार्ड मध्ये तुमचे नाव नसावे. जर नाव असेल तर तुम्हाला नवीन रेशन न काढता विभक्त रेशन कार्ड करावे लागेल. आणि जर कुठल्याच रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस करू शकता. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वरील दिल्या प्रमाणे सगळे कागदपत्रे जमा करून फॉर्म पूर्ण भरून, गावातील रेशन दुकानदाराचे प्रमाणपत्र जोडून तहसील कार्यालयात अन्न पुरवठा विभागात दाखल करावा लागेल. अर्ज दाखाल केल्या नंतर तुमचे नवीन रेशन कार्ड तयार होईल.

    नवीन रेशन कार्ड नोंदणी अर्ज  👉 Pdf FORM

    Note :-Offline रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अर्ज प्रोसेससाठी वरील प्रमाणे कागदपत्रे लागतात. अधिक माहितीसाठी आपल्या तहसिल कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाला भेट द्यावी.

    रेशन कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र

    नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला online अर्ज करू येतो. शासनाच्या वेबसाईट वर जावून तुम्ही नवीन रेशन कार्ड साठी online अर्ज करू शकतात. तुम्हाला शासनाच्या National Food Security Program या पोर्टल वर जावून अर्ज करावा लागेल.

    • सर्व प्रथम पोर्टल वर वूज्व्या कोपऱ्यात असलेल्या Sing in/ Rejister वर क्लिक करून Publik Login हा पर्याय निवडावा लागेल. 
    • नंतर New User! Sing Up Here वर क्लिक करून Open झालेल्या पर्याया पैकी I Want To Apply For New Ration Card हा पर्याय निवडावा लागेल. 
    • नंतर तुमच्या समोर एक फॉर्म open होईल तो तुम्हाला भरायचा आहे. तुमचे मराठीत नाव, इंग्रजीत नाव, तुमचे लिंग ( स्त्री अथवा पुरुष ), तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे e mail हि माहिती भरायची आहे.रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र 
    • शेवटला उजव्या बाजूने तुम्हाला तुमची लॉगीन id बनवायची आहे. तुम्ही तुमचे e mail वापरू शकता.
    • id टाकल्यानंतर check availability क्लिक करून नंतर पासवर्ड टाकायचा आहे.
    • नंतर पुन्हा एकदा पासवर्ड टाकून कॅप्चा vherify करायचा आहे. 
    • शेवटी OTP वर क्लिक करायचे आहे. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे. आलेली OTP  प्रविष्ठ केल्या नंतर नवीन फॉर्म open होईल तो तुम्हाला पूर्ण भरून सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने प्रोसेस पूर्ण होईल.रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र

    नवीन रेशन कार्ड Online अर्ज करण्यासाठी

    नवीन रेशन कार्ड च्या Online Process साठी शासनाने वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे, या वेबसाईट द्वारे तुम्ही नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतात. त्याच बरोबर रेशन कार्ड मध्ये नवीन नाव add करण्यासाठी नाव दुरुस्त करण्यासाठी आणि इतर दुरुस्तीसाठी देखील Online अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईट   https://rcms.mahafood.gov.in/  ला भेट द्या.

    रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

    कुटुंबाच्या रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी मध्ये एखाद्या नवीन सदस्याच्या नावाची नोंद करावी लागते जसे कि, एखादं मुल घरात जन्माला आले तर त्या मुलाचे आधार कार्ड तयार झाल्यानंतर त्या मुलाचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडता येते. तसेच घरात नवीन सून आल्यास घरातील सदस्य वाढतात, नवीन सुनेचे नाव टाकण्यासाठी तिचे वाडीला कडील आधार कार्ड बदलून पतीच्या नावाने करावे लागते. पतीच्या नावाने आधार कार्ड तयार झाल्यास तिचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडता येते. त्या साठी वडिलाकडील रेशन कार्ड मधले नाव कमी करावे लागते. कुटुंबात वाढलेल्या नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी पुढील कागदपत्रे व फॉर्म आवश्यकता असते.

    रेशन कार्ड मध्ये नवीन नाव नोंदणीसाठी कागदपत्रे

    कुटुंबात एखादे नवीन वाढल्यास त्या सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये अॅड करावे लागते, समजा कुटुंबात एखादे बाळ जन्मास आल्यास त्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकावे लागते किंवा नवीन लग्न होवून एखादी सून घरात आल्यास तिचे नाव कुटुंबाच्या रेशन कार्ड मध्ये जोडावे लागते. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते. 

    रेशन कार्ड मध्ये मुलाचे नाव जोडायचे असल्यास

    • अ )  कुटुंब प्रमुखाचे रेशन कार्ड.
    • ब )  मुलाचे जन्म प्रमाणपत्र.
    • क )  आई- वडिलाचे आधार कार्ड.
    • ड )  मुलाचे आधार कार्ड असल्यास सोबत जोडावे.

    रेशन कार्ड मध्ये नवीन सुनाचे नाव जोडायचे असल्यास

    • अ )  महिलेचे पतीच्या नावाचे आधार कार्ड.
    • ब )  पतीचे आधार कार्ड.
    • क )  कुटुंबाचे रेशन कार्ड.
    • ड )  तसेच मुलीचे तिच्या पित्याकडील रेशन कार्ड मधून नाव काढून टाकलेले प्रमाणपत्र.

    रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अर्ज 👉 pdf form

    रेशन कार्ड नवीन नाव नोंदणीसाठी वरील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता नवीन नाव रेशन कार्ड मध्ये नोंद करताना असते.

    रेशन कार्ड  विषयी Online सर्व सुविधांसाठी शासनाच्या पुढील साईट ला भेट दया. https://rcms.mahafood.gov.in/

    रेशन कार्ड ऑनलाइन दुरुस्ती

    रेशन कार्ड विषयीच्या इतर सुविधा बरोबरच तुमच्या रेशन कार्ड मध्ये झालेल्या चुका शासनाच्या पोर्टलवर जाऊन दुरुस्त करता येतात. रेशन कार्ड दुरुस्ती मध्ये तुम्ही तुमच्या चुकलेल्या नावाची, चुकलेल्या पात्याची, तसेच चुकीच्या वयाची दुरुस्ती करता येते. रेशन कार्ड दुरुस्तीसाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेब पोर्टलवर जावे लागेल. https://rcms.mahafood.gov.in या पोटलवर जाऊन तुम्ही रेशन कार्ड ऑनलाइन दुरुस्ती करू शकता.

    रेशन कार्ड धारकला महिन्याला किती रेशन मिळते ते ऑनलाइन चेक करा 

    रेशन कार्ड धारकला प्रत्येक महिन्याला रेशन येते. कोरोना काळापासून शासन मोफत रेशन देत आहे. रेशन कार्ड वर दिल्या जाणाऱ्या रेशन ला शासन कुठली हि किंमत आकारत नाही आहे. रेशन कार्ड वर नोंद असलेल्या सदस्यांच्या संखे नुसार रेशन धारकाला रेशन मिळते, पण कधी-कधी रेशन दुकानदाराच्या चलाखीने आपल्याला आलेले पूर्ण रेशन दिले जात नाही, आणि कमीच आले अशी करणे दिली जातात किंवा रेशन पावती लपविली जाते. मग अशा वेळेस आपल्याला आलेले रेशन माहित असले पाहिजे, ते ऑनलाईन कसे चेक करायचे ते आपण पाहू.रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र

    महाराष्ट्र्र शासनाच्या https://mahafood.gov.in या वेबसाईट शासनाने तुमच्या रेशन विषयीच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुम्हाला महिन्याला येणारे रेशन चेक करू शकता. 

    ऑनलाईन रेशन चेक कसे करायचे 
    • महाराष्ट्र्र शासनाच्या mahafood.gov.in या वेबसाईट वर गेल्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला उजव्या बाजूला ऑनलाईन रास्तभाव दुकाने या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
    • नंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. त्या पेज वर धान्यपुर्ती आणि AePDS-सर्व जिल्हे हे दोन पर्याय असतील त्या मधून तुम्हाला दुसऱ्या म्हणजे AePDS-सर्व जिल्हे या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
    • या पर्यायावर क्लिक केल्या नंतर ओपन झालेल्या पेज वर महिना, वर्ष आणि तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. हे टाकताच तुम्हाला तुमचे महिन्याचे येणारे एकूण रेशन दिसेल.

    अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला मिळणारे महिन्याचे रेशन ऑनलाईन चेक करू शकता.

    सारांश

    शासनाच्या विविध योजनासाठी राशन कार्ड लागत असल्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक बाब झाली आहे. रेशन कार्ड काढायचे कसे हे माहित नसल्यामुळे बरीच कुटुंब शासनाच्या योजनांन पासून वंचित राहतात. रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र या लेखामध्ये रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी विषयी आपल्याला परिपूर्ण माहिती दिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही नवीन रेशन कार्ड काढणे तसेच नवीन नाव ऍड करणे यासाठीची Process करू शकतात. वरील माहितीचा फायदा निश्चितच तुम्हाला होईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा. बेल बटनावर क्लिक करा.

    FAQ :

    १ . नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात ?

    :- नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.

    १ )  कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड सोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.

    २ )  कुटुंबातील ज्या व्यक्तींचे मतदार यादीमध्ये नाव आहेत त्या सर्व व्यक्तींचे मतदार ओळखपत्र.

    ३ )  कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न.

    ४ )  नमुना न. ८/ किंवा ७/12 उतारा.

    ५ )  कुटुंब प्रमुख दारिद्र्य रेषेखाली असेल तर प्रमाणपत्राची झेरोक्स प्रत.

    ६ )  कुटुंबातील सर्व सदस्याचे पासपोर्ट साईज फोटो.

    ६ )  रेशन दुकानदाराचे नवीन रेशन कार्ड साठी प्रमाणपत्र .

    ७ )  कुटुंब प्रमुखाचे दोन पासपोर्ट साईज फोटो.

    ८ )  कुटुंब प्रमुखाचे बँकेचे पासबुक प्रत.

    ९ )  घर पट्टी-नळ पट्टी ग्रामपंचायत.

    २ . मी माझे नाव रेशन कार्डमध्ये ऑनलाईन कसे जोडू शकतो ?

    :-  जर तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड असेल आणि त्या मध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्ही तूच नवे रेशन कार्ड मध्ये जोडू शकता, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नाव जोडणीचा फॉर्म भरून तो तुमच्या तहसील कार्यालयाला नेवून द्यवा लागेल, त्यासोबत तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे.

    ३ . रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे ?

    : –  तुमच्याकडे जर पूर्वी पासून रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे ऑनलाईन रेशन कार्ड असेल तर तुम्ही शासनाच्या महाफूड या वेबसाईटवर जाऊन तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.  https://rcms.mahafood.gov.in 

    ४ . रेशन कार्ड हरवले तर काय करायचे ?

    : – तुमच्या कंदील रेशन कार्ड हरवले असेल आणि तुमच्याकडे त्याचा ऑनलाईन नंबर असेल तर शासनाच्या महाफूड https://rcms.mahafood.gov.in  या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हरवलेले रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. आणि तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर नसेल तर मग तुम्हाला तहसील कार्यालयाला जाऊन आधार नंबर देऊन रेशन कार्ड प्रिंट काढता येते.

    👉 हे ही वाचा :- Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

    4 thoughts on “रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र”

    1. Pingback: Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

    2. Pingback: Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

      1. पाहिल्या रेशन कार्ड मद्य नाव नसल्यास तुम्हाला नवीन रेशन कार्ड कडता येते, आणि पहिल्या रेशन कार्ड मद्य नाव असल्यास तुम्ही विभक्त रेशन कार्ड करू शकता आधिक माहितीसाठी आमचा विभक्त रेशन कार्ड हा ब्लॉग वाचवा

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top