बेकरी व्यवसाय प्रशिक्षण योजना : बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन सुरू करा स्वतः चा व्यवसाय

bakery business: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) ‘अमृत’ अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेच्या मार्फत बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आणि तरुणी यांच्यासाठी सदरील योजना सुरू करण्यात आलेली आहे.bakery business

बेकरी व्यवसाय प्रशिक्षण योजना (bakery business)

अमृत बेकरी व्यवसाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील तरुण आणि तरुणी यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी ‘अमृत’ (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training ) अंतर्गत बेकरी उत्पादनावर आधारित व्यवसायाचे मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील बेरोजगार तरुण आणि तरुणी यांना (bakery business) उद्योगासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना हातभार लावणे हा उद्देश यामागचा आहे.

अमृत बेकरी प्रशिक्षण पात्रता

या योजनेच्या लाभासाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहेत.

  1. अर्जदार हा अमृतच्या लक्षित गटातील असावा .
  2. लाभार्थ्याचे एकूण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपेक्षा कमी असावे, तसा संबंधित अधिकार्याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
  3. अर्जदार हा कायमस्वरूपी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  4. अर्जदार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असेल तसेच किमान पदवी शिक्षण चालू असणे किंवा 12 वी पास असणे आवश्यक.
  5. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे तर जास्त 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
  6. अर्जदार हा स्वतः व्यवसाय करण्यास तयार असावा.
  7. सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये लाभार्थी पूर्ण वेळ हजर असणे आवश्यक आहे.
  8. या अगोदर लाभार्थ्याने या किंवा अशा स्वरूपाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

प्रशिक्षण चालू असताना लाभार्थ्यांना मिळणारे लाभ

  1. सदर शिक्षण 18 दिवसांचे असून या कालावधीत लाभार्थ्याला राहणे व खाणे हे निशुल्क असेल.
  2. या प्रशिक्षणामध्ये पहिले 12 दिवस Technical Inputs (Theory & Practical) हे असून पुढील 6 दिवस Entrepreneurship Development Inputs हे असतील.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ

उद्योग/व्यवसाय (bakery business) उभारणीसाठी आवश्यक मदत तसेच लाभार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष उद्योग/व्यवसाय उभारणीसाठी खालील बाबतीत Handholding च्या माध्यमातून खालील बाबतीत मार्गदर्शन करण्यात येईल.

  •  जागेची निवड
  •  मशिनरीची निवड
  • प्रकल्प अहवाल तयार करणे
  • आवश्यक परवाने
  • उद्योग नोंदणी
  • कर्ज प्रस्ताव तयार करणे
  • कच्चा माल खरेदी
  • उत्पादित माल विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन

प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना देण्यात येणारे उद्योग व्यवस्थापन मार्गदर्शन

प्रशिक्षणानंतर प्रशिक्षनार्थी आपले उद्योग निश्चित करतील व त्यानंतर उद्योग उभारणीसाठी लागणारे भांडवल शासनाच्या विविध कर्ज/अनुदान योजनेशी सांगड घालून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कर्ज प्रकरण करणे ही प्रशिक्षनार्थींची व्यक्तिगत जबाबदारी राहील व ते करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सहकार्य करेल.

लाभासाठी कुठे करायचा अर्ज

वरील अटी व शर्तींचे पालन करणाऱ्या लाभार्थ्यांनी विहित नमुन्यामध्ये संकेतस्थळावर स्थळावर उपलब्ध करून दिलेला अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्वाक्षांकित करून संबंधित महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (MCED) कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक राहील.

अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या :- www.mahaamrut.org.in

सारांश

बेकरी व्यवसाय प्रशिक्षण योजना : बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन सुरू करा स्वतः स्वतःचा व्यवसाय या लेखात आपण बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृतच्या प्रशिक्षण योजनेबद्दलची माहिती पाहिली. (bakery business) बेकरी व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असणार्‍या लाभार्थ्यांनी अमृत अंतर्गत मोफत प्रशिक्षण मिळवून आपल्या व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन व भागभांडवल मिळवण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

हे ही वाचा :

आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील ग्रुप लिंक वर जा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top