Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा

Bandhkam Kamgar Mobile Number Change:- महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार विभागामार्फत असंघटीत बांधकाम कामगारांसाठी अनेक फायद्याच्या योजना राबवीत असते. यासाठी कामगार विभागाच्या वेबसाईट वर बांधकाम कामगारांना आपली online नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्याला आपला मोबाईल नंबर लिंक करावा लागतो. लिंक केलेल्या मोबाईल नंबर आधारे तुम्ही तुमची बांधकाम कामगाराची प्रोफाईल लॉगीन करावी लागते. बांधकाम कामगार विभागाची OTP या नंबर वर येत असते. कामगार विभागाकडे असलेला मोबाईल नंबर आपल्या कडून बंद पडला किंवा हरवला तर आपण बांधकाम कामगार विभागाच्या पोर्टल ला लॉगीन करू शकणार नाहीत. मग हा मोबाईल नंबर कसा बदलायचा या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.Bandhkam Kamgar Mobile Number Change

बांधकाम कामगार नोंदणी

बांधकाम कामगार विभाग असंघटीत कामगारांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा अनेक योजना राबवीत असते. बांधकाम कामगार समाजाच्या मुख्य घटकात यावे यासाठी सदरील योजना कामगार विभागामार्फत राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांकडे कामगार विभागाकडे आपली नोंदणी करणे गरजेचे असते.

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी कामगार म्हणून तुमच्या कडे 90 दिवस काम केल्याचे ग्रामशेवक किंवा गुत्तेदार यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते, तसेच तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमचे बँक पासबुक, कुटुंब सदस्याचे आधार कार्ड आणि आपले दोन फोटो आणि आपला मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतात. बांधकाम कामगाराच्या https://mahabocw.in या वेबसाईट वर जावून नोंदणी करावी लागते.

Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा

बांधकाम कामगार विभागात नोंदणी करत असतांना लाभार्थ्याला आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो, दिलेल्या मोबाईल नंबर वर कामगार विभागाची OTP येते जी तुम्हाला लॉगीन करतांना वापरावी लागते. दिलेला मोबाईल नंबर कामगार विभागाकडून तुमच्या प्रोफाईल शी जोडला जातो.

जर एखाद्या वेळेस तुमचा मोबाईल नंबर बंद पडला किंवा हरवला तर आपल्याला बांधकाम कामगार विभागाच्या वेबसाईट वर जावून लॉगीन करता येणार नाही, मग हा नंबर कसा बदलायचा हे आपण पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या https://iwbms.mahabocw.in/change-mobile-number या लिंक वरती जावे लागेल.
  • लिंक वरती गेल्या नंतर तुमची प्रोफाईल ओपेन होईल वरती जावून पुढील प्रोसेस करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता.

बांधकाम कामगार कौटुंबिक तपशील माहिती अद्ययावत करणे

बांधकाम कामगार विभागाकडे ऑनलाईन नोंदणी केल्या नंतर जर कुटुंबात एखाद्ये मुल जन्मले किंवा एखाद्या सदस्याचे नाव जोडायचे राहिले तर त्या मुलाचे किंवा कुटुंब सदस्याचे नाव तुम्हाला कामगार विभागाकडे नोंदविता येते. त्यासाठी त्या मुलाचे किंवा कुटुंब सदस्याचे आधार कार्ड असणे आवश्यक असते. तुम्ही खालील लिंक वर जावून नवीन जन्मलेल्या मुलाचे नवा जोडू शकता https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/update-details

सारांश

Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा या लेखात आपण बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा आणि आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव कसे जोडायचे या बद्दल माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा :-

आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

4 thoughts on “Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा”

  1. Mahabocw.in ह्या वेब साइट वर ऑनलाइन फॉर्म भरलेले आहे तरी एका मोबाइल नंबर वर दोन फॉर्म भरलेले आहेत दोनिही फॉर्म त्रुटि मधे काढलेत त्रुटि अपलोड होत नाही मोबाइल नंबर चेंज कस करायच

    1. https://bit.ly/41GWJwc
      हा ब्लॉग वाचा या मध्ये मोबाईल नंबर कसा बदलायचा या बद्दल पूर्ण माहिती दिली आहे.
      तुम्ही तुमच्या तालुक्याच्या कामगार ऑफिस वर जाऊन सुध्धा मोबाईल नंबर बदलू शकता.

      1. Subhash Gadakh

        Sir mala family members add karayache aahe yar mobile madhun add karta yeil ka bandhkam kamgar office la jave lagel..

        1. Subhash Gadakh शासनाच्या बांधकाम कामगार विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्य जोडता येतात. त्यासाठी बांधकाम कामगार ऑफिस ला जाण्याची आवश्यकता नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top