Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती

Bandhkam Kamgar MSCIT: महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. असुरक्षित क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश शासनाचा आहे. या अनुषंगाने अनेक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगाराच्या पत्नी व दोन मुलांना शिष्यवृत्ती शैक्षणिक योजनेतून राबविली जाते. बांधकाम कामगाराच्या पत्नी आणि दोन पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत MS-CIT (Bandhkam Kamgar MSCIT) करण्यासाठी येणारा खर्च पालकांना शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून परत केला जातो. त्याबद्दल माहिती आपण आज पाहणार आहोत.Bandhkam Kamgar MSCIT

बांधकाम कामगार

बिल्डींग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना बांधकाम कामगार म्हणतात. मिस्त्री काम, बिगारी काम, सेनट्रिंग काम इत्यादी स्वरूपाचे बिल्डींग लाईनमध्ये काम करणारे मजूर बांधकाम कामगार म्हणून संबोधले जातात. महाराष्ट्र शासनाने या असंघटित कामगारांसाठी एक स्वतंत्र मंडळाची निर्मिती केलेली आहे, ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ.’ या मंडळाच्या साह्याने बांधकाम कामगारांच्या हिताच्या अनेक योजना शासन राबवीत असते. या मंडळामार्फत कामगाराच्या पत्नी किंवा दोन पाल्यांना MS-CIT करण्यासाठी लागणारी फीस शासनाकडून परत केली जाते.

बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना

बांधकाम कामगाराच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना अंत यावे यासाठी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगाराच्या पत्नी आणि दोन पाल्यांसाठी शिक्षणाच्या विविध टप्प्यावर शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते.

———————— बांधकाम कामगार शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना ————————

 

E01 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्षी रु.2500 व 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी रु.5000 दिले जातात.

E02 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 10 वी 12 वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास रु.10,000 दिले जातात.
E03 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. 10,000 दिले जातात.
E04 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्य व पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिवर्षी रु.20,000 दिले जातात.
E05 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना व पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु. 1,000,000 लक्ष रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. 60,000 दिले जातात.
E06 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना शासनमान्य पद्विकेकरिता प्रतिवर्षी रु. 20,000 व पदयुत्तर पद्विकेकरिता रु. 25,000 प्रतिवर्षी दिले जातात.
E07 – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण MS-CIT करिता शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते.

Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती

बांधकाम कामगार शैक्षणिक शिष्यवृत्ती अंतर्गत इतर शिष्यवृत्ती योजनांबरोबरच बांधकाम कामगाराच्या पत्नी किंवा पाल्यांना MS-CIT (Bandhkam Kamgar MSCIT) या कॉम्पुटर कोर्ससाठी लागणारी फीस पालकाच्या खात्यावर परत केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला कामगार मंडळाच्या mahabocw.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असल्यास तुम्हाला अर्ज करता येतो. पाल्याचे MS-CIT कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळालेले प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करून आणि कागदपत्रे पडताळणीनंतर सदरील रक्कम पालकाच्या खात्यावर जमा होते.

सारांश

Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती या लेखात आपण Bandhkam Kamgar MSCIT च्या कोर्ससाठी येणाऱ्या खर्चाची परिपूर्ती पालकाच्या खात्यावर केली जाते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

हे हि वाचा :

आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर जा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top