best bike back pain:- आपल्या दैनंदिन जिवनात महत्वाचे प्रवासाचे साधन बाईक आहे. आज तरुण वर्गामध्ये बाईकची विशेष क्रेज आहे. प्रत्येकाला वाटते आपल्याकडे आपल्या आवडीची बाईक असावी. तरुणांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्यांना प्रवासासाठी बाईक हे प्रमुख साधन आहे. नोकरदार वर्ग ही प्रवासाठी बाईकला पसंती देतात. पण बाईकच्या नेहमीच्या प्रवासामुळे बऱ्याच जणांना पाठदुखीचा त्रास उद्भवतो आणि एकदा पाठदुखीचा त्रास सुरु झाला की त्यापासून सुटका होत नाही. बऱ्याच अंशी पाठदुखी ही तुमच्या बाईकवर बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे देखील सुरु होते, पण बाईकची बैठक व्यवस्था जर चांगली असेल तर पाठदुखीचा त्रास उद्भवत नाही. आज आपण कोणत्या बाईकच्या प्रवासाने पाठदुखीचा त्रास होत नाही, अशा काही बाईक विषयी माहिती पाहणार आहोत.
Causes of Back Pain / पाठदुखी कशामुळे होते
पाठदुखीची बरीच करणे असू शकतात, त्यामध्ये तुमची बाईकवर बसण्याची पद्दत जर चुकीची असेल तर त्यामुळे ही पाठदुखीचा त्रास सुरु होतो. बाईकचा रोजचा प्रवास जास्तीचा असेल तर अशा वेळेस सतत बाईकवर बसल्यामुळे आणि रोडच्या खड्ड्यावर गाडी आदळल्यामुळे पाठीचे मणके दुखावले जातात. परिणामी कायमस्वरूपी पाठदुखी सुरु होते. पाठदुखीचे खालील काही करणे असू शकतात.
- बाईक चालवत असतांना बाईकची बैठक व्यवस्था जर चांगली नसेल तर कालांतराने पाठदुखीचा त्रास सुरु होतो.
- बाईकची सस्पेन्शन प्रणाली व्यवस्थिती नसेल तर खडतर रस्त्यावर प्रवास करतांना सरळ मणक्यांना झटका बसतो.
- बाईकच्या हॅण्डलबार ची उंची आसन व्यवस्थेशी संलग्न असावी, अतिरिक्त उंची किंवा जास्तीची उंची हँडलबारची नसावी.
- बाईकचे वजन आणि बाईकची स्थिरता योग्य असावी.
- बाईकच्या टायरची रुंदी आणि उंची योग्य असावी.
Best Bike Back Pain: प्रवास करतांना पाठदुखीचा त्रास होऊ नाही, यासाठी बाईक निवडतांना काही महत्वाच्या टिप्स
पाठदुखीच्या त्रासापासून वाचायचे असेल तर नवीन बाईक खरेदी करतांना काही महत्वाच्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. बाईक खरेदी करतांना तुमच्या बजेट नुसार तुम्ही पाठदुखीसाठी आरामदायक असणारी बाईक खरेदी करू शकता. सर्वप्रथम तुम्ही दररोजचा प्रवास किती करता, त्या नुसार तुम्हाला तुमच्या बाईकची निवड करावी लागेल. बाईक निवडतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत.
- आपल्यासाठी सुयोग्य बाईक निवडतांना त्या बाईकची उंची आणि आपली उंची ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे.
- बाईकचे इंजिन किती CC चे आहे हे पाहणे, कारण कमी CC इंजिन बाईक जास्त व्हायब्रेट करते परिणामी पाठीच्या मणक्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.
- बाईकची आसन व्यवस्था योग्य असावी, निवळ सपाट सीट असणाऱ्या बाईकवर पाठीला आणि कमरेला जास्त त्रास होतो.
- बाईकचे हँडलबार योग्य उंचीवर असावे, कमी उंची आणि जास्त उंचीचा विपरीत परिणाम पाठीवर व कमरेवर होतो.
- बाईकचे सस्पेन्शन योग्य असावे, खडबडीत रस्त्यावर बाईकला बसणार दणका आपल्या पाठीला बसू नये, तो सस्पेन्शन मध्ये कमी व्हायला पाहिजे.
- बाईकचे टायर योग्य उंचीचे आणि रुंदीचे असावे, खूप कमी उंचीचे किंवा खूप जास्त उंचीचे नसावे, किंवा कमी जाडीचे नसावेत.
Best Bike Back Pain: प्रवास करतांना पाठदुखीचा त्रास होऊ नाही, यासाठी सर्वोत्तम बाईक
अनेक कंपन्याचे बाईक मॉडेल बाजारात आहेत, प्रत्येक कंपनी आपली बाईक परफेक्ट असल्याचे सांगते. बरेच वेगवेगळे फीचर्स बाईक मध्ये आढळतात. नवीन बाईक विकत घेत असतांना प्रत्येक ग्राहकाचे बजेट वेगवेगळे असते, पण असलेल्या बजेटमध्ये योग्य बाईक निवडणे हे कधीपण शहाणपणाचे ठरते.
काही बाईक्स आहेत ज्यांना पाठदुखीचा त्रास होऊ नये म्हणून ग्राहक पसंती देतेतात, त्या कोणत्या ते आपण पाहू.
Best Bike Back Pain
ग्राहकाच्या पसंतीस उतरणारे काही बाईक मॉडेल खालील प्रमाणे आहेत, जे पाठदुखी सारखे दुखणे उभे राहू देत नाही.
कंपनी | मॉडेल | शोरूम किंमत | इंजिन CC | ऍव्हरेज-मायलेज |
HONDA | Shine SP | 73 हजार | 125 cc | 56 km/liter |
BAJAJ | Platina 100 | 53 हजार | 102 cc | 75 km/liter |
HERO | Super Splender | 74 हजार | 125.7 cc | 55 km/liter |
TVS | Sport | 58 हजार | 109 cc | 73 km/liter |
HONDA | Unicorn | 1.19 (1 लाख 19हजार) | 102.7 cc | 50 km/liter |
BAJAJ | Avenger Cruise 220 | 1.30 ( 1 लाख 30 हजार) | 150 cc | 56 km/liter |
वरील दिलेल्या बाईकच्या किमती या वेगवेगळ्या भागात कमी किंवा जास्त असू शकतात.
Best Bike/सर्वोत्तम बाईक Shine SP (Honda)
होंडा कंपनीची SP Shine ही बाईक बाजारात आहे, होंडा कंपनीची असल्याने एक ब्रांड आहे (Best Bike Back Pain). नवीन बाईक खरेदी करत असतांना बऱ्याच लोकांना ही गाडी आवडते. या गाडीची किंमत परवडणारी आहे, शिवाय तिचा लूक ही छान दिसतो. कंपनीचे हे मॉडेल 125 cc इंजिन क्षमता असणारे आणि चांगले सस्पेन्शन असणारे मॉडेल आहे. या गाडीची आसन व्यवस्था ही चांगली आहे, ज्यामुळे पाठदुखीचा त्रास सहसा होत नाही. ही बाईक सरासरी एक लिटर पेट्रोल मध्ये 56 किलोमीटर चे ऍव्हरेज देते. मार्केट मध्ये शोरूम किंमत 73 हजार रुपये आहे. ( वेगवेगळ्या भागात किंमत बदलत असते.)
Best Bike/सर्वोत्तम बाईक Platina 100 (Bajaj)
102 cc इंजिन क्षमते मध्ये येणारी ही बाईक 75 किलोमीटर चे माईलेज देते. platina 100 ही गाडी तिच्या सस्पेन्शन मुळे बऱ्याच ग्राहकांना आवडते शिवाय किंमत पण परवडणारी आहे. गाडीचे सस्पेन्शन चांगले असल्याकारणाने या गाडीपासून पाठदुखीचा त्रास होत नाही. म्हणून पाठदुखी होऊ नाही त्यासाठी ही बाईक best आहे.
Best Bike/सर्वोत्तम बाईक Super Splender (Hero)
Hero कंपनीची Super Splender ही बाईक स्प्लेंडर या विश्वासाहार्य मॉडेल चे एक नवीन मॉडेल आहे. या गाडीचे इंजिन 125 cc क्षमतेचे येते. तर 55 किलोमीटर पार लिटर मायलेज ही बाईक देते. या बाईकचे सस्पेन्शन उत्कृष्ठ असल्याने लांबचा प्रवास करतांना पाठीचा त्रास होत नाही. बजेट मधील किंमत आणि चालविण्यासाठी दमदार सस्पेन्शन यामुळे बाईक ग्राहकांना आकर्षित करते.
Best Bike/सर्वोत्तम बाईक TVS Sport
TVS Sport ही TVS कंपनीची बाईक आहे, कमी उंची असणाऱ्यासाठी ही बाईक परफेक्ट आहे. 109 cc इंजिन क्षमतेत येणारी ही बाईक 73 किलोमीटर प्रती लिटर चे मायलेज देते. इतर बाईकच्या तुलनेत किंमत कमी असल्याने बजेट कमी असणाऱ्या लोकांना ही बाईक परवडते. या बाईकची आसन व्यवस्था चांगली असल्याने पाठदुखीचा त्रास होत नाही.
Best Bike/सर्वोत्तम बाईक Unicorn (Honda)
Honda या कंपनीची ही बाईक पाठदुखीसाठी सर्वोत्कृष्ठ गणली जाते. 102.7 cc इंजिन क्षमता, उत्कृष्ठ बैठक व्यवस्था आणि मोनो सस्पेन्शन या मुळे या बाईकला मागणी जास्त आहे. परफेक्ट उंची, शानदार लूक, 50 किलोमीटर पर लिटर चे मायलेज इत्यादी गोष्टी या बाईक मध्ये मिळतात. अनेक टेस्ट मध्ये पाठदुखीचा त्रास न देणारी बाईक म्हणून गणली गेलेली आहे. हिची शोरूम किंमत 1 लाख 19 हजार आहे.
Best Bike/सर्वोत्तम बाईक Avenger Cruise 220 ( Bajaj)
Bajaj कंपनीची ही बाईक पाठदुखीसाठी केल्या गेलेल्या सर्वेत सर्वोत्कृष्ठ गणली गेली आहे. 150 cc चे दमदार इंजिन, उत्कृष्ठ सस्पेन्शन, आरामदायक बैठक व्यवस्था, योग्य हॅन्डलबार, शानदार लूक, टायरची जाडी, बाईकची जमिनीवरील पकड अशा सगळ्याच बाबीमध्ये ही बाईक सर्वोत्तम आहे. 56 किलोमीटर पर लिटर मायलेज या बाईकचे आहे. शोरूम किंमत 1 लाख 30 एवढी आहे. लांबच्या प्रवासाला सगळ्यात जास्त पसंती या बाईकला दिली जाते.
NOTE :-
Back Pain/ पाठदुखी ही इतर ही कारणाने होऊ शकते, बसण्याची सवय चुकीची असेल किंवा इतर काही कारण आशु शकतात.
सारांश
Best Bike Back Pain: प्रवास करतांना पाठदुखीचा त्रास होऊ नाही, यासाठी निवडा सर्वोत्तम बाईक या blog मध्ये आपण पाठदुखी होऊ नये यासाठी कोणत्या बाईक चांगल्या आहेत, या बद्दल माहिती पहिली. नवीन बाईक खरेदी करत असतांना उपलब्ध असलेल्या बजेट प्रमाणे वर सांगितलेल्या टिप्स वापरून प्रवासात पाठदुखीचा त्रास न देणारी बाईक खरेदी केली जाऊ शकते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2024-2025 (MAHADBT): 100% अनुदानावर चार्गिंग पंपासाठी असा करा अर्ज
- MAHADBT ट्रॅक्टर योजना: ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ONLINE अर्ज
- वाहनाच्या नंबर प्लेट वरून शोधा वाहन मालकाचे नाव आणि वाहनाचा संपूर्ण तपशील
- Dispute Redressal Mechanism: मोबाईलद्वारे व्यवहार करताना चुकून दुसर्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत कसे मिळवायचे?
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.