Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

Dairy Farming हा भारतातील भरपूर उत्पन्न आणि मागणीला असलेला व्यवसाय आहे. लोकसंख्याच्या मानाने उपलब्ध असलेली दुधाची आकडेवारी खूप कमी आहे . भारतात आज दुधाचा तुडवडा आहे. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय हा खूप सारा पैसा निर्माण करून देणारा व्यवसाय आहे . कमी लागत मध्ये आणि आपल्या उपलब्ध असणाऱ्या शेतात तुम्हा हा व्यवसाय सुरु करू शकतात. आज ग्रामीण भागात या व्यवसायाला अनुकूल असे वातावरण आहे. आणि शासनाकडून अनेक दूध डेअरी सुरु करण्यात आलेल्या आहेत . त्यामुळे दूध विकण्यासाठी शहराच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आज आपण या blog मधून दुग्ध व्यवसाया विषयीचे सर्व बारकावे समजून घेणार आहोत. Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

Dairy Farming ची सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला त्या व्यवसाया विषयी पूर्ण पूर्ण माहिती असणे असणे आवश्यक आहे.  तुम्ही किती पशु पासून या व्यवसायाला सुरुवात करणार यावर तुमचे नियोजन आणि येणारा खर्च अवलंबून असतो. या व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचे म्हणजे दुग्ध पशूंची निवड करणे. दुधाच्या पशूंची निवड करतांना त्यांची दूध क्षमता आणि लागणार चारा या विषयी माहिती असणे आवश्यक आहे, त्याच बरोबर वातावरणाच्या अनुषंगाने दुधाळ पशूंची निवड करणे हेही खूप महत्वाचे असते. तुमच्याकडील वातावरणात कोणत्या जातीची भरपूर दूध देणारी म्हैस तग धरू शकते, किंवा तुमच्याकडील वातावरण कोणत्या जातीच्या म्हशीला अनुकूल आहे.  हे पाऊणचं त्या जातीची म्हैस निवडणे फायद्याचे ठरते .

आजचा दुधाचा लिटरचा भाव ४ ० ते ५ ० रुपये आहे, हे रेट पहिले तर दुग्ध व्यवसाय भरपूर नफा कमवून देणारा व्यवसाय आहे. अगदी २ ते ३ कामगारांत चालणार हा व्यवसाय तुम्हाला महिन्याला एक लाख ते दीड लाख रुपये कमवून देऊ शकतो.

✅👉🏻 Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

दुग्ध व्यवसायासाठी दूध देण्याची क्षमता आणि वातावरणानुसार म्हैशींची निवड

आपल्या देशात अनेक जातीच्या दूध देणाऱ्या म्हशी आढळतात. वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवून घेऊन दुधाचे उत्पन्न देणाऱ्या म्हशी आहेत, त्यातील काही जातींची माहिती आपण खाली पाहणार आहोत .

१ ) मुर्रा जातीची म्हैस

मुर्रा जातीची म्हैस हि लोकप्रिय असणारी जात आहे , जास्तीत जास्त दूध देणारी आणि सर्व वातावरणात जुळवून घेणारी म्हशींची हि जात आहे.  त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी या जातीच्या म्हशींची विशेष पसंती आहे.

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

  • दुधाची क्षमता : – १ ७ ० ० ली. ते १ ८ ५ ० लिटर
  • भोगौलिक क्षेत्र :- हरियाणा रोहतक , हिसार आणि जिंद जिल्हा ,  पंजाबच्या नभ आणि पटियाला या भागात विशेषतः या म्हशी जास्त प्रमाणात आढळतात .
  • रंग :- गडद काळा
  • शिंगे :- वळली आणि लहान गोलाकार असतात .

✅👉🏻 पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

२ ) पंढरपुरी

महाराष्ट्रात आढळणारी हि म्हशींची जात आहे, उष्णकटिबंध भागात आढळणारी हि जात अतिशय काटक स्वरूपाची असते. १ २ -१ २ महिने दूध देणारी हि म्हशींची जात आहे. कमी आणि मिळेल त्या चाऱ्यावर दुधाचे उत्पन्न देणारी अत्यंत फायदेशीर अशी पंढरपुरी म्हशी ची जात ओळखली जाते.Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

  • भोगौलिक क्षेत्र:- महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी यासारख्या भागात या जातीच्या म्हशी आढळतात. म्हशीचे नाव सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर वरून पंढरपुरी पडले आहे .
  • दूध क्षमता :- १ ७ ० ० ते १ ८ ० ०  लिटर. ३ ० ५  दिवस सलग दूध देणारी जात हे वैशिष्ट्य
  • रंग :- काळा
  • शिंगे :- लांब ४ ५ ते ५ ० से. मी.
  • हवामान :- दुष्काळी व कोरड्या हवामान असलेल्या भागात हि म्हैस उत्तम आहे .

✅👉🏻 आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना

3) मेहसाणा

गुजरात मध्ये आढळणारी मेहसाणा हि म्हशींची जात आहे . हि साधारणतः मुर्रा म्हशी सारखी दिसते, पण या म्हशीचे वजन जास्त असते.Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

  • भोगौलिक क्षेत्र:- गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात आणि गुजरात लगतच्या सीमा क्षेत्रात या जातीच्या म्हशी अढळतात.
  • रंग:- काळा आणि तपकिरी
  • दूध क्षमता:- १४ ० ० ते १ ५ ० ० लिटर
  • शिंगे :- गोलाकार लांब

✅👉🏻 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना

४ ) सुरती म्हैस

जास्ती जास्त दूध देणाऱ्या जाती पैकी एक असणारी सुरती म्हैस हि गुजरात च्या खेडा आणि बडोदा या जिल्ह्यात आढळतात. Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

  • भोगौलिक क्षेत्र:- गुजरात मधील खेडा आणि बडोदा या शहरात आढळते.
  • रंग:- तपकिरी, सिल्वर राखाडी किंवा काळा
  • दूध क्षमता:- १ २ ० ० ते १ ५ ० ० लिटर
  • शिंगे :-शिकल च्या आकाराचे असतात.

५ ) चिलका म्हैस

चिलका हि म्हशींची जात प्रामुख्याने ओडिसा राज्यातील कटक, गंजम, पुरी, आणि खुर्दा या जिल्ह्यात आढळतात. ओडिसा मधील चिलिका तलावावरून या म्हशीचे नाव चिलका असे पडले आहे.Dairy Farming दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

  • भोगौलिक क्षेत्र:- ओडिसा राज्यातील कटक, गंजम, पुरी, आणि खुर्दा या जिल्ह्यात आढळतात.
  • रंग:- तपकिरी काळा
  • दूध क्षमता:- ५ ० ० ते ६ ० ०  लिटर

Dairy Farming: चारा आणि जागेची निवड

दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी चारा आणि जागेची निवड अत्यंत महत्त्वाची असते. योग्य चारा पुरवठा आणि योग्य जागेची निवड केल्यास दूध उत्पादन चांगले होऊ शकते.

1. चारा निवड:

  • हिरवा चारा: हा म्हशीच्या पोषणासाठी अत्यंत आवश्यक असतो. मका, नेपियर गवत, अळशी, ज्वारी इत्यादी हिरवा चारा उत्तम असतो.
  • सुका चारा: पेंढा, चुरका, गवत इत्यादी सुका चारा साठवण्यासाठी आणि म्हशीला चारा देण्यासाठी वापरला जातो.
  • संपूर्ण आहार मिश्रण (TMR): या प्रकारात विविध प्रकारच्या चाऱ्यांचे मिश्रण केले जाते, ज्यामुळे म्हशीला सर्व आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.
  • सिलेज: हे आर्द्रता असलेला चारा लवकर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी साठवला जातो.

2. जागेची निवड:

  • पाणी आणि वीज उपलब्धता: शेतामध्ये पाणी आणि वीज उपलब्ध असणे आवश्यक आहे, कारण म्हशीच्या देखभालीसाठी आणि चारा तयार करण्यासाठी यांची गरज भासते.
  • जागेचा प्रकार: मोकळे मैदान किंवा पाण्याचा निचरा होणारी जागा उत्तम असते. म्हशीला आरामदायक वातावरण मिळावे यासाठी वाऱ्याची खेळती दिशा लक्षात घेऊन जागेची निवड करावी.
  • संपर्क साधने: दूध विक्रीसाठी बाजारपेठ, दुधाच्या डेअरी, औषधं, आणि खाद्य पुरवठा करणाऱ्या संस्थांसोबत संपर्क साधावा लागतो.
  • आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता: आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असावा. म्हशीचे आरोग्य राखण्यासाठी कीटक आणि रोगांपासून दूर राहण्याची व्यवस्था असावी.

यशस्वी दुग्धव्यवसायासाठी योग्य चारा आणि जागेची निवड करणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजनाने हे घटक उत्तम प्रकारे हाताळल्यास, अधिक उत्पादन आणि नफा मिळवता येऊ शकतो.

✅👉🏻 माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

Conclusion

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना या लेखात आपण दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या म्हशीच्या जाती विषयी माहिती पहिली. तसेच चार आणि जागेविषयीचे नियोजन कशे करायचे हेही पहिले. मित्रानो दुग्ध व्यवसायातून तुम्ही योग्य नियोजनाद्वारे महिन्याकाठी लाख रुपयांपर्यंत महिना कमवू शकता . माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top