Dispute Redressal Mechanism: मोबाईलद्वारे व्यवहार करताना चुकून दुसर्‍याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत कसे मिळवायचे?

Dispute Redressal Mechanism – मित्रांनो बऱ्याच वेळेस धावपळीत आपल्याला मोबाईलवरून व्यवहार करावा लागतो. अशा वेळेस ज्याला पैसे पाठवायचे त्याला ते पैसे न जाता दुसर्‍यालाच पैसे जाण्याची भीती असते. डिजिटल व्यवहारामुळे जितके व्यवहार सोपे झालेत तितकेच धोकादायक सुद्धा झालेत. एखाद्या वेळेस आपल्याकडून मोबाईलद्वारे व्यवहार करतांना चुकून दुसऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत कसे मिळवायचे या बद्दल आपण या लेखात माहिती मिळवणार आहोत. Dispute Redressal Mechanism

घाबरून न जात काही गोष्टी त्वरित करा 

मोबाईल वरून व्यवहार करतांना जर चुकून पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेल्यास ते पैसे परत मिळवता येतात, त्या मुले घाबरून न जात पुढील गोष्टी त्वरित करा.

  • ज्या खात्यावर चुकून पैसे ट्रान्सफर झाले त्या खात्याची संपूर्ण डीटीएल जसे कि मोबाईल नंबर किंवा  UPI ID लिहून ठेवा.
  • ट्रान्सफर केलेली रक्कम.
  • व्यवहार संधर्भ क्रमांक.
  • व्यवहार दिनांक वेळ इत्यादी ची माहिती लिहून ठेवा.

ज्याच्या खात्यावर चुकीने पैसे ट्रान्सफर झाले त्या लाभार्थ्याशी संपर्क करा

आपल्याकडून चुकून ज्याच्या खात्यावर पैसे गेले त्या लाभार्थ्याशी संपर्क करा. त्याला समजून सांगा आणि आपल्या कडून पाठवलेले पैसे परत करण्यास सांगा. जर तो लाभार्थी पैसे परत करण्यास तयार नसेल तर आपण बँके कडे तक्रार करून किंवा ऑनलाईन तक्रार करून आपले पैसे परत मिळवू शकतो.

सर्वात प्रथम बँकेला संपर्क करा

आपल्याकडून आर्थिक व्यवहार करतांना जर एखाद्याच्या खात्यावर चुकून पैसे गेल्यास प्रथम आपल्या बँकेशी संपर्क करा. बँकेत जाऊन आपल्याकडून झालेल्या चुकीच्या व्यवहाराची माहिती बँकेला द्या. तुमच्या कडे असलेल्या पुराव्याची माहिती बँकेला द्या जसे कि

  • ज्या खात्यावर चुकून पैसे ट्रान्सफर झाले त्या खात्याची संपूर्ण डीटीएल जसे कि मोबाईल नंबर किंवा  UPI ID.
  • व्यवहार संधर्भ क्रमांक.
  • व्यवहार दिनांक वेळ इत्यादी.
  • आपल्या खात्याचा तपशील.

मोबाईलद्वारे व्यवहार करताना चुकून दुसर्‍याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत मिळवण्यासाठी ऑनलाईन तक्रार – UPI Dispute Redressal Mechanism

मोबाईल UPI पेमेंट करतांना आपल्या कडून एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेल्यास आपण ऑनलाईन तक्रार करून आपले पैसे परत मळवू शकतो.

जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा अन्य UPI अँप वापरत असाल, तर त्यामध्ये Help किंवा customer support पर्याय असतो. त्याद्वारे डिस्प्यूट रेजिस्टर करा.

  • अँप हेल्प सेक्शनमध्ये जा.
  • ‘Incorrect Transaction’ किंवा ‘Wrong Beneficiary’ संबंधित पर्याय निवडा.
  • व्यवहाराच्या तपशीलासह तुमची समस्या सांगा.

तुम्ही आपल्या UPI द्वारे किंवा शासनाच्या NPCI पोर्टल वर जाऊन आपल्या कडून चुकून झालेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती देऊन ऑनलाईन तक्रार करू शकता. ती कशी करायची ते आपण पाहू.

सर्वप्रथम तुम्हाला NPCI च्या https://www.npci.org.in या वेबसाईटवर जाऊन पोर्टल ओपन करावे लागेल.

  • पोर्टल ओपन होताच मेनू बार मध्ये असणाऱ्या ‘Whate we do’ या पर्यायावरती क्लिक करा.
  • ‘Whate we do’ या पर्यायांमधून ‘UPI’ या पर्यायावर जा.
  • ‘UPI मध्ये Dispute Redressal Mechanism या पर्याया वर क्लिक करा.
  • ‘Complaint’ मध्ये ‘Transcation’ वर क्लिक करून ‘Person to Person’ असे निवडा.
  • त्या खालील व्यवहार स्वरूप मध्ये ‘Incorrectly Transferral to Another Account’ असे निवडा.

अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. UPI अँप वारू तक्रार करून जर उत्तर मिळाल्यास आपल्या बँक शाखेशी संपर्क करा.

Conclusion

मोबाईलद्वारे व्यवहार करताना चुकून दुसर्‍याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत कसे मिळवायचे? -Dispute Redressal Mechanism या लेखात आपण आपल्याकडून चुकीचे व्यवहार झाल्या नंतर पैसे परत कसे मिळवायचे या बद्दल माहिती पहिली. तुम्ही वरील प्रोसेस द्वारे आपल्या चुकीने झालेल्या व्यवहाराची तक्रार करून आपले पैसे परत मिळवू शकता.

हे ही वाचा:-

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top