E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड

E-Shram Registration: ई-श्रम कार्डद्वारे नोंदणी करून भारतातील असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा उचलता येतो.  आपल्या देशात अनेक क्षेत्रात कामाला असलेल्या असंघटित कामगारांची संख्या खूप आहे. या कामगारांना मुख्यधारेत आणण्यासाठी शासन कामगाराच्या हिताच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्ड काढणे आवश्यक आहे. ई-श्रम कार्डद्वारे तुम्ही असंघटित कामगार असल्याची  नोंद शासनाकडे होते. आज आपण E-Shram Registration कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.ई-श्रम कार्ड नोंदणी

E-Shram Card/ ई-श्रम कार्ड म्हणजे काय ?

भारत सरकारकडून असंघटित कामगारांना दिला जाणारा १ २  अंकी यूएएन नंबर असलेले ओळखपत्र म्हणजे E-Shram Card/ ई-श्रम कार्ड होय. या कार्डवर तुमचा फोटो, तुमचे पूर्ण नाव, तुम्ही राहत असलेला तुमचा पूर्ण पत्ता इत्यादी माहिती बरोबरच  तुम्हाला श्रमिक म्हणून १ २ अंकी यूएएन नंबर दिला जातो.

E-Shram Card/ ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून तुम्ही भारत सरकारच्या असंघटित कामगारासांठी राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता.

✅👉🏻Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे

ई-श्रम कार्डचे फायदे

  • ई-श्रम कार्डद्वारे भारतातील असंघटित कामगारांना २ लाखाचे अपघात विम्याचे सुरक्षा कवच मिळते.
  • भारत सरकारकडून असंघटित कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेचा लाभ मिळविणे ई-श्रम कार्डद्वारे सोपे जाते.
  • कामगारांच्या कौशल्यानुसार नोकरी मिळविण्यास मदत होते.
  • कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक योजनांचा फायदा घेता येतो.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • इतर अनेक सामाजिक सुरक्षा योजना

✅👉🏻 Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

E-Shram Registration/ ई-श्रम नोंदणी प्रक्रिया 

E-Shram Registration/ ई-श्रम नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या https://register.eshram.gov.in या ई-श्रम पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर आल्या नंतर तुम्हाला  Self Registration या पर्यायाला क्लिक करावे लागेल.

Self Registration वर येताच तुमच्या समोर नवीन पेज open होईल. या पेजवर तुम्हाला दिलेल्या रकान्यात विचारलेली माहिती भरायची आहे.

  • पहिल्या रकान्यात तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे. दुसऱ्या रकान्यात दिलेला कॅप्चा भरायचा आहे. त्या खालील दोन पर्यायातून Yes किंवा No ला टिक मार्क करून Send Otp या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • नवीन Open होणारे पेजवर तुम्हाला आधार लिंक असलेल्या मोबाईल वर आलेला Otp प्रविष्ठ करून Submit करायचा आहे.

  • पुढील नवीन पेजवर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून त्याखालील Fingerprint किंवा OTP या चेक बॉक्स ला टिक करून, दिलेला कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्या नंतर I agree to the terms & conditions for registration under eShram Portal या बॉक्स ला टिक करून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
  • Submit बटनावर क्लिक करताच पुढील पेजवर तुम्हाला तुम्ही कोणत्या क्षेत्रात आणि कोणते काम करत आहेत ते निवडायचे आहे. यासाठी तुम्हाला पेज वरील लाल रंगाच्या लिंक वर क्लिक करायचे या लिंक वर क्लिक करताच तुमच्यासमोर एक pdf ओपन होईल त्या मधून तुम्ही करत असलेले काम निवडून ते तुम्हाला पेजवरील रकान्यात भरायचे आहे, त्याबरोबरच ते काम तुम्ही किती दिवसापासून करत आहात ते त्याखालील रकान्यात निवडायचे आहे.
  • पूर्ण माहिती भरून Continue या बटनावर किल्क करताच तुमचे ई-श्रम कार्ड तयार असेल. ते तुम्हाला पेजवरील Download या बटनावर क्लिक करून Download करता येते.

अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलवरून E-Shram Registration करून ई-श्रम कार्ड बनवू शकता.

✅👉🏻 PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड.
  2. बँक पासबुक.
  3. आधार लिंक मोबाईल नंबर.

Conclusion

E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड या लेखात आपण मोबाईल वरून ई-श्रम कार्ड कसे बनवायचे या बद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पहिली. शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या योजनांचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. वरील माहितीद्वारे तुम्ही घरच्या घरी ई-श्रम कार्ड नक्कीच बनवू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top