शेतकरी ओळखपत्र नसेल तर नाही मिळणार कृषी विभागाच्या योजनांचा लाभ

Farmer id Maharashtra : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ओळख म्हणून शेतकरी ओळखपत्र (Farmer id) सुरु केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालकीच्या जमिनीचा ओळख क्रमांक मिळणार आहे, आणि शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शेतकरी ओळखपत्र (Farmer id) आवश्यक असणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून योजनांचा लाभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने शेतकऱ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात अॅग्रीस्टॅक योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer id Maharashtra) अविवार्य असणार आहे.Farmer id Maharashtra

Farmer id Maharashtra/ शेतकरी ओळखपत्र

अॅग्रीस्टॅक योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या शेतीच्या आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती (Crop Sown Registry) आणि शेतीचा भू-संदर्भित नकाशा (Geo Referenced Land Parcel) हे सर्व माहिती संच एकत्रितपणे तयार करण्यात येत आहेत. या मध्ये शेतकऱ्यांची माहिती तयार करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन, त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक या माहितीशी जोडला जात आहे. त्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला आणि त्यांच्या शेतांसह एकत्रितपणे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer id Maharashtra ) देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना विविध योजना जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी एक सोपी व स्पष्ट पद्धत विकसित करण्याच्या उद्देशाने, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित (AgriStack) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतकरी ओळख क्रमांक (Farmer id Maharashtra ) चा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

Farmer id Maharashtra/ फार्मर आयडी विषयी नवीन शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाने शेतकरी ओळखपत्रा विषयी नाविन शासन निर्णय काढून प्रत्येक शासकीय योजनेत शेतकरी ओळखपत्र (Farmer id Maharashtra) अनिवार्य केले आहे. नवीन शासन निर्णयानुसार शासनाने कोणत्या आटी आणि नियम ठरवून दिले आहेत, या बद्दल आपण खाली माहिती पाहू.

  1. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक (Farmer id Maharashtra ) दिनांक 15.04.2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे.
  2. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने संबंधित पोर्टल्स, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादींमध्ये आवश्यक त्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्त यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.
  3. शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न असलेला डेटा म्हणजेच जमीन विषयक माहिती (Geo Referenced Parcel Data) आणि त्यावर घेतलेली पिकांची माहिती (DCS)  हे सर्व कृषी विभागामार्फत वापरल्या जाणाऱ्या विविध ऑनलाईन प्रणालींशी Application Programming Interface (API) च्या माध्यमातून AgriStack या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त (जमाबंदी) तथा संचालक भूमीअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आयुक्त कृषी यांच्यासोबत समन्वय साधून करावी.
  4. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) साठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना तातडीने संबंधित पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC (Common Service Centers) तसेच क्षेत्रीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी.
  5. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक आहे, याबाबत आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृती करण्यात यावी. हवे असल्यास, यासाठी एक जनजागृतीपर संदेश, सोशल मीडिया पोस्ट, किंवा पोस्टर या मार्फत करण्यात यावी.

शेतकरी ओळखपत्र (Farmer id Maharashtra) के काढायचे

महाराष्ट्र शासनाने राज्यात अॅग्रीस्टॅक योजना सुरु केलेली आहे या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र (Farmer id) काढणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. शेतकऱ्याचा सातबारा हा आधार कार्डशी सलग्न करण्यात येणार आहे. तसेच इथून पुढे प्रत्येक शासकीय योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र हे अनिवार्य असणार आहे.

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी जवळील CSC सेंटर अवर जावून अॅग्रीस्टॅक च्या वेबसाईट वर नोंदणी करा. किंवा स्वतः लाभार्थी आपल्या मोबाईल वरून अॅग्रीस्टॅक च्या वेबसाईट वर जावून नोंदणी आकृ शकतो.

मोबाईलद्वारे नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर जा – https://mhfr.agristack.gov.in

आपल्या मोबाईलद्वारे शेतकरी ओळखपत्र नोंदणी अशी करायची हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर जा – शेतकरी ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

सारांश

शेतकरी ओळखपत्र नसेल तर नाही मिळणार कृषी विभागाच्या योजनांचा लाभ या लेखात आपण शासनाच्या शेतकरी ओळखपत्र या विषयी निघालेल्या नवीन शासन निर्णयाविषयी माहिती पहिली. नवीन शासन निर्णयानुसार आता शासनाच्या प्रत्येक योजनेला शेतकरी ओळखपत्र (Farmer id Maharashtra ) अनिवार्य करण्यात आलेले आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा ;-

आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मिडिया आयकॉन वर टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top