मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल: पोर्टलवर ऑनलाईन तक्रार कशी करायची, संपूर्ण माहिती

mukhyamantri portal – महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांसाठी आपल्या समस्या आणि तक्रारी राज्याच्या मुख्यमंत्री पर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केलेली आहे. या पोर्टल अंतर्गत राज्यातील नागरिक आपली तक्रार सरळ मुख्यमंत्री यांच्या पर्यंत करू शकतात. बऱ्याच वेळेस शासकीय कामामध्ये अधिकारी किंवा तत्सम विभागाच्या कर्मचाऱ्याकडून हलगर्जीपणा केला जातो, अशा वेळेस संबंधित विभागाची तक्रार ही राज्याच्या मुख्यमंत्री यांना करून त्या विभागाला जाब विचारता येतो. मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल वर ऑनलाईन तक्रार अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती आपण खालील लेखात पाहणार आहोत.mukhyamantri portal

Mukhyamantri Portal/ मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल

महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सेवा पोर्टल वरती राज्यातील नागरिकांसाठी त्यांच्या प्रशासनाविषयी असलेल्या अडचणी बाबतीत तक्रार सोडविण्यासाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे. mukhyamantri portal या पोर्टल च्या साह्याने राज्यातील नागरिकांना आपल्या तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाला करता येणार आहे. mukhyamantri portal वर ऑनलाईन तक्रार कशी करायची याची माहिती आपण पाहणार आहोत.

मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल: पोर्टलवर ऑनलाईन तक्रार कशी करायची, संपूर्ण माहिती

आपल्या समस्या विषयीची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाला करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले सेवा केंद्र च्या पोर्टल वरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. आणि नंतर आपल्या समस्या विषयीचा तक्रारीचा अर्ज करावा लागेल. मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल वर नागरिक नोंदणी कशी करायची हे आपण पाहू.

Mukhyamantri Portal/ नागरिक नोंदणी

  • सर्वप्रथम mukhyamantri portal वर आल्या नंतर तक्रार नोंदवा या पर्यायाला क्लिक करावे लागेल. या पर्यायाला क्लिक केल्या नंतर खाली दिसणाऱ्या नागरिक नोंदणी या वरती क्लिक करायचे आहे.
  • आपण भारतीय आहोत हे निवडायचे आहे, त्या नंतर मोबाईल नंबर टाकून आलेला OTP खालील रकान्यात भरायचा आहे. कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • नागरिक नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्या नंतर समोर ओपन होणाऱ्या नवीन पेज वर विचारलेली वैयक्तिक माहिती भरायची आहे, जसे की नोंदणी करणार्याचे संपूर्ण नाव, जन्म तारीख, व्यवसाय, पूर्ण पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड नंबर, मोबाईल नंबर इत्यादी वैयक्तिक माहिती भरायची आहे.
  • विचारलेली माहिती भरल्या नंतर आपली आयडी आणि पासवर्ड तयार करून, तो पुढे वापरायचा आहे.
  • वरील माहिती भरल्या नंतर नागरिक नोंदणी पूर्ण होईल. या नंतर तक्रार नोंदणी या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • तक्रार नोंदणी पर्यायाला क्लिक केल्या नंतर आपली वैयक्तिक माहिती चेक करून आपला e-mail , मोबाईल नंबर टाकून खालील तक्रारीचा तपशील भरायचा आहे.
  • तक्रारीचा तपशील यामध्ये तक्रारदार यांचा जिल्हा, तालुका, गाव, तसेच ज्या विभागाच्या सबंधित तक्रार आहे, तो विभाग निवडायचा आहे.
  • तक्रारी संबंधीचे कार्यालय निवडायचे आहे.
  • तक्रारीचे स्वरूप निवडायचे आहे, आणि तक्रारीचा तपशील मध्ये तुमची तक्रार काय आहे हे थोडक्यात लिहायचे आहे.
  • त्या नंतर तक्रारी विषयीच्या प्रतिमा आणि कागदपत्रे योग्य साईज मध्ये अपलोड करायची आहे.
  • कॅप्चा टाकून पूर्वावलोकन करायचे आहे, आणि नंतर तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

सारांश

मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल: पोर्टलवर ऑनलाईन तक्रार कशी करायची, संपूर्ण माहिती या लेखात आपण मुख्यमंत्री पोर्टल वर आपल्या प्रशासकीय कामा विषयीची तक्रार कशी करायची या बद्दल माहिती पहिली. नागरिक तक्रार मध्ये आपण आपल्या प्रशासकीय कामाविषयीची तक्रार mukhyamantri portal वर जावून करू शकतो. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.

हे ही वाचा ;-

अशाच माहिती मिळविण्यासाठी आमच्या शोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा, ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top