NSP Scholarship Last Date 2024: राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल अंतर्गत अर्ज सुरू

NSP Scholarship Last Date 2024: राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल अंतर्गत अर्ज सुरू:- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल NSP अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. राष्ट्रीय प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती 2024-2025 आणि राष्ट्रीय पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती 2024-2025 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोर्टल वरती जाऊन अर्ज करून घ्यावे. पोर्टल वरती दिलेल्या वेळा पत्रकात अर्ज सादर करायचा आहे. राष्ट्रीय पोर्टल NSP अंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्ती समाजातील सर्व घटकांना दिली जाते. वेगवेगळ्या विभागाकडून दिली जाणारी विध्यार्थी शिष्यवृत्ती NSP पोर्टल वर उपलब्ध करून दिलेली आहे. या पोर्टल वरून सर्व समाज घटकातील विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. NSP Scholarship Last Date

NSP Scholarship Portal/ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल

NSP हे एक राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल आहे. या पोर्टल वरून माध्यमिक, तांत्रिक तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिक द्रष्ट्या दुर्बल समाज घटकातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना उच्च आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने शासन सदरील NSP पोर्टल वरून शिष्यवृत्ती प्रदान करते. शासनाच्या खालील विभागाकडून विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल अंतर्गत दिली जाते.

  1. ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेकनिकल एजुकेशन
  2.  अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग
  3. उच्च शिक्षण विभाग
  4. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग
  5. सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग
  6. गृह मंत्रालय
  7. कामगार आणि रोजगार मंत्रालय
  8. रेल्वे मंत्रालय ( रेल्वे बोर्ड )
  9. आदिवासी व्यवहार मंत्रालय
  10. नॉर्थ ईस्ट कॉन्सील ( NEC ), DONER.
  11. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय
  12. यूजीसी

इत्यादी विभागाकडून NSP अंतर्गत शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते.

NSP Scholarship Last Date 2024-2025/ अर्ज करण्याची शेवटची तारीख

NSP अर्ज सुरू झाल्याची तारीख – 01/ जुलै/2024

NSP अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 31/ ऑक्टोबर /2024

NSP शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज

NSP राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल अंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी या पोर्टल वरती जाऊन अर्ज करावा लागेल. NSP Scholarship Last Date NSP अर्ज सुरू झाल्याची तारीख – 01/ जुलै/2024 तर NSP अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 31/ ऑक्टोबर /2024

  • सर्व प्रथम तुम्हाला नस NSP च्या अधिकृत वेबसाईट https://scholarships.gov.in वर जावे लागेल.
  • या वेबसाईटवर आल्यावर तुम्हला इतर पर्याय मधून विध्यार्थी हा पर्याय निवडावा लागेल.
  • ओपन झालेल्या नवीन पेज वरती तुम्ही जर नवीन लाभार्थी असाल तर तुम्हाला OTR ( One Time Registration ) नंबर मिळवावा लागेल. आणि पहिल्या पासून नोंदणी असल्यास तुम्ही सरळ लॉगिन करू शकता.
  • OTR नंबर टाकून तुम्ही तुमची NSP शिष्यवृत्ती अर्ज भरू शकता.

NSP OTR नंबर कसा मिळवायचा ( One Time Registration Number )

NSP शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे OTR Registration असणे आवश्यक आहे. OTR Registration Number मिळवण्यासाठी तुम्हाला NSP पोर्टल वर येऊन डाव्या बाजूला  4 लाईनींग वरती क्लिक करायचे आहे. या लाईनींग वरती क्लिक केल्या वरती Apply For One Time Registration ( OTR ) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि स्टेप बाय स्टेप माहिती भरायची आहे. NSP Scholarship Last Date

  • Apply For One Time Registration ( OTR ) वरती क्लिक केल्या नंतर ओपन होणाऱ्या पेज वर Login with Aadhaarखाली असणार्‍या  New user? Register yourself या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • New user? Register yourself वरती क्लिक केल्या नंतर नवीन फॉर्म ओपन होईल.
  • ओपन होणार्‍या फॉर्म वर खाली दिसणाऱ्या दोन चेक बॉक्स मध्ये टिक करायचे आहे, आणि NEXT वरती क्लिक करायचे आहे.
  • 2 स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि Get OTP वरती क्लिक करायची आहे.
  • आलेला OTP टाकून, त्या खालील कॅप्चा कोड भरून Verify या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • Verify बटनावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला पुढील पेज वर तुमच्या कड इधर असेल तर तुमचा आधार किंवा पालकांचा आधार नंबर टाकून Get OTP वर क्लिक करून आलेला आधार OTP भरून त्या खालील कॅप्चा टाकून Verify या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर ओपन होणार्‍या पेज वर तुमचे आधार डीटीएल दिसेल, आणि खाली तुम्हाला तुमच्या आई चे नाव, वडीलांचे नाव, ई मेल आयडी आणि कॅप्चा कोड टाकून FINISH या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • FINISH बटनावर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर eKYC ची येईल, तिला क्लिक करून तुम्हाला LIVE eKYC पूर्ण करावी लागेल.
  • eKYC पूर्ण केल्या नंतर तुम्हाला FINISH बटनावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला NSP OTR नंबर मिळून जाईल.

NSP शिष्यवृत्ती योजना यादी

आदिवासी मंत्रालय –

  1. नॅशनल फेलोशिप आणि सेंट विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – शिष्यवृत्ती (अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी औपचारिकपणे उच्च श्रेणीचे शिक्षण).

अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग –

  1. अपंग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणीतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  2. अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
  3. अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय –

  1. व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती Cs
  2. अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  3. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक Cs

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग –

  1. नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप

गृह मंत्रालय –

  1. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्ससाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना
  2. दहशतवादी/नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना

रेल्वे मंत्रालय ( रेल्वे बोर्ड )-

  1. रेल्वे मंत्रालयासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना

ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेकनिकल एजुकेशन

  1. Aicte – स्वनाथ शिष्यवृत्ती योजना (तांत्रिक डिप्लोमा)
  2. Aicte – स्वनाथ शिष्यवृत्ती योजना (तांत्रिक पदवी)
  3. Aicte – मुलींच्या विद्यार्थ्यांसाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना (तांत्रिक पदवी)
  4. Aicte – मुलींच्या विद्यार्थ्यांसाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना (टेक्निकल डिप्लोमा)
  5. Aicte – विशेष सक्षम विद्यार्थ्यांसाठी सक्षम शिष्यवृत्ती योजना (तांत्रिक डिप्लोमा)
  6. Aicte – विशेष सक्षम विद्यार्थ्यांसाठी सक्षम शिष्यवृत्ती योजना (तांत्रिक पदवी)

यूजीसी-

  1. पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीजसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती
  2. नेरसाठी इशान उदय विशेष शिष्यवृत्ती योजना

नॉर्थ ईस्ट कॉन्सील ( NEC ), DONER.-

  1. नेरच्या विद्यार्थ्यांना उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य (Nec मेरिट स्कॉलरशिप)

सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग –

  1. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणीतील शिक्षणाची केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती

कामगार आणि रोजगार मंत्रालय – 

  1. बीडी/सिने/आयओएमसी/एलएसडीएम- प्री मॅट्रिकच्या वार्डांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
  2. बीडी/सिने/आयओएमसी/एलएसडीएम- पोस्ट मॅट्रिकच्या वार्डांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य

सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग – 

  1. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये उच्च श्रेणीतील शिक्षणाची पीएम यशस्वी केंद्रीय क्षेत्र योजना
  2. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील उच्च श्रेणीतील शिक्षणाची पीएम यशस्वी केंद्रीय क्षेत्र योजना
Conclusion

NSP Scholarship Last Date 2024: राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल अंतर्गत अर्ज सुरू या लेखात आपण NSP शिष्यवृत्ती या बद्दल माहिती पहिली.NSP शिष्यवृत्ती योजना यादी, OTR नंबर कसा मिळवायचा, त्याच बरोबर NSP Scholarship ऑनलाईन अर्ज कसा करायचा या बदल माहिती पाहिली. महती आवडली असेल तर आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

संबंधित लेख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top